20 मार्च 2020 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना धनलाभ

20 मार्च 2020 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना धनलाभ

मेष - मेष राशीच्या लोकांना धनलाभ

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सुख साधनांमध्ये वाढ होईल. वयस्कर लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत व्यावसायिक प्रवासाला जाल. रचनात्मक कार्यात मन रमेल


कुंभ - एखाद्या खास व्यक्तीशी भेट

आज तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात यश मिळेल. कौटुंबिक समस्यांमधून सुटका होईल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. सामाजिक मानसन्मान वाढेल. 


मीन- विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल

आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव जाणवणार आहे. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.  

 
वृषभ - नवीन कामे रखडण्याची शक्यता

आज एखाद्या कामात दुर्लक्ष केल्यामुळे ते रखडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. जोडीदाराची साथ मिळेल. 


मिथुन - पोटाच्या समस्या त्रासदायक ठरतील

आज बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका. पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. 


कर्क - आज प्रिय व्यक्तीसोबत भेट होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रिय व्यक्तीशी भेट होऊ शकते. दिवस उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तणाव कमी जाणवेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. 

 

सिंह - करिअरमध्ये यश मिळेल

आज तुमच्या मनात एखादी व्यावसायिक कल्पना असेल तर त्वरीत ती साकारण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आज यश नक्कीच मिळणार आहे. अधिकाऱ्यांच्या सहकार्यांने कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत काळ सुखाचा असेल. 


कन्या - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे

कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत वाद घालणे टाळा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोर्ट- कचेरीत समस्या येण्याची  शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्याने बिघडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील रस वाढणार आहे. 


तूळ -दीर्घ आजारपणात सुधारणा होईल

आज तुमच्या जीवनशैलीत केलेल्या बदलांमुळे आरोग्यावर चांगला परिणाम होईल. दीर्घ आजारपणातून सुटका मिळेल. एखादी चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. आत्मविश्वास वाढणार आहे. 


वृश्चिक -  नवीन ओळखींंमधून धोका 

आज तुमच्या जीवनात प्रेमाचा त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ओळखींमधून धोका मिळू शकतो. आर्थिक बाबींबाबत सावधपणे निर्णय घ्या. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. वादविवादांपासून दूर राहा. 

 

धनु - मौल्यवान भेटवस्तू मिळतील

आज तुमच्या आईवडीलांकडून भेटवस्तू मिळतील. अचानक बाहेरगावी जाण्याची योजना होईल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. मनात चांगल्या भावना निर्माण होतील. 


मकर -  आरोग्याच्या समस्या जाणवणार आहेत

आज तुम्हाला दिवसभर काही समस्या जाणवण्याची शक्यता आहे. आळस आणि चिडचिड होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी असल्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. जुन्या मित्रांच्या भेटी गाठी होतील. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'