26 मार्च 2020 चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना मिळणार व्यवसायात नफा

26 मार्च 2020 चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना मिळणार व्यवसायात नफा

मेष -आरोग्य सुधारेल

आज तुमच्या आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सावध राहा. एखादे अर्धवट राहीलेले काम पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराची साथ मिळेल. वाहन चालवताना सावध राहा.


कुंभ -  कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल

आज विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. अभ्यासात विद्यार्थ्यांचे मन रमणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीसाठी चांगला योग आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. रखडलेली कामे पूर्ण करणे शक्य होईल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. 


मीन-  कौटुंबिक खर्च वाढणार आहेत

आज एखाद्या खास व्यक्तीमुळे तुमच्या कौटुंबिक खर्चात वाढ होईल. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन साधन मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाणे सध्या टाळा. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. 


वृषभ - मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता

आज एखाद्या शुल्लक गोष्टीवरून मित्रमैत्रिणींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.


मिथुन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता 

आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणातील रस वाढणार आहे. बिघडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता निर्माण होईल. 


कर्क - आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज बाहेरचे खाद्यपदार्थ मुळीच खाऊ नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी कौतूक करणार आहेत. मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


सिंह - व्यवसायात भावंडांची साथ मिळेल

आज व्यवसायात तुमच्या भावंडांची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढेल. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. परदेशी जाण्याची  शक्यता आहे. 


कन्या - नवीन आव्हाने समोर येण्याची शक्यता

आज कामाच्या ठिकाणी तुमच्यासमोर नवीन आव्हाने येण्याची शक्यता आहे. सहकारी तुमच्या योजनांमध्ये अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. सध्या प्रवासाला जाणे टाळा. सासरच्या लोकांकडून आनंदाची बातमी मिळेल. 


तूळ- व्यापारात फायदा होईल

आज तुम्हाला व्यापारात चांगला फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता मिळेल. रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. जोडीदारासोबत खरेदीला जाण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाला जाण्याचा योग आहे.


वृश्चिक - दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल

आज तुमच्या दुर्लक्षपणामुळे एखादी चांगली संधी हातातून निसटणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा रोष सहन करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची साथ आणि सहकार्य मिळेल.


धनु - डोकेदुखी जाणवेल

आज तुमची कामानिमित्त दगदग होणार आहे. डोकेदुखी जाणवणार आहे. महत्त्वाच्या योजना रखडण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. करिअरसाठी उत्तम काळ आहे. 


मकर -सामाजिक मानसन्मान मिळेल

आज तुमच्या सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होणार आहे. जोडीदाराचा तणाव दूर होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी कराल. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात