28 मार्च 2020 चं राशीफळ, मिथुन राशीला उत्तम आरोग्याचा लाभ

28 मार्च 2020 चं राशीफळ, मिथुन राशीला उत्तम आरोग्याचा लाभ

मेष - विद्यार्थ्यांना परिक्षेत यश 

विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. मार्केटिंग व्यवसायातील लोकांना त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात यश मिळेल. व्यवसायातील भागिदारीतून लाभ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 


कुंभ - तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज मानसिक चिंतेमुळे तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. वाहन चालवताना सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


मीन- एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल

आज तुमच्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण होणार आहेत. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल. जोडीदारासोत नाते मजबूत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. 

 

वृषभ - विनाकारण खर्च वाढेल

आज वाढणाऱ्या खर्चामुळे तुम्ही निराश होणार आहात. पैशांबाबत समस्या जाणवण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वाहन चालवताना सावध राहा. देणी घेणी सांभाळून करा. 


मिथुन - आरोग्याची काळजी घ्या

आज दिवस चांगला जाईल. आरोग्य सुधारणार आहे. दिवसभर फ्रेश वाटेल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी बद होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


कर्क - कौटुंबिक समस्या येण्याची शक्यता 

आज तुमच्या घरातील समस्या वाढण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वाद विवाद होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामांसाठी दगदग होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल. 


सिंह -  प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे

आज तुमचे रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. वाद घालणे टाळलेलेच बरे राहील. वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहा. घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे.


कन्या -  मन निराश राहण्याची शक्यता

आज तुमचे मन निराश राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काम करणे कठीण जाईल. व्यवसायातील योजना यशस्वी होतील. देणी घेणी सावधपणे करा. 


तूळ - विवाहाचा योग आहे

आज अविवाहितांसाठी काळ अनुकूल आहे. विवाह ठरण्याची शक्यता आहे.  मनातील गोष्टी मनात ठेवू नका. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या ठिकाणी  जाण्याचा बेत आखाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


वृश्चिक - अधिकाऱ्यांसोबत वाद होतील

आज कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकारी वर्गाशी वाद होणार आहेत. योग्य सुविधा न मिळाल्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. मित्रांसोबत प्रवास सुखाचा असेल. कोर्ट कचेरीसाठी दगदग करावी लागेल. 


धनु -  पैशांबाबत आनंदाची बातमी मिळेल

आज तुम्ही भागिदारीत नवीन व्यवसायाला सुरूवात करू शकता. पैशांबाबत एखादी आनंदाची बातमी मिळेल. प्रवासाला जाताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.


मकर -  महत्त्वाचे निर्णय लगेच घेणे टाळा

कामाच्या ठिकाणी एखादी छोटीसाठी चुक तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय लगेच घेणे टाळा. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात