30 मार्च 2020 चं राशीफळ, सिंह राशीसाठी दिवस उत्साहाचा

30 मार्च 2020 चं राशीफळ, सिंह राशीसाठी दिवस उत्साहाचा

मेष - आईची तब्येत बिघडण्याची शक्यता 

आज तुमच्या आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश राहील. जुन्या मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या खर्चामुळे मन निराश होणार आहे. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाला जाणे टाळा. 


कुंभ - प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला वारसाहक्काने एखादी प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. विरोधकांचा त्रास कमी होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रेमात त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता आहे.


मीन- नवीन कामाला सुरूवात

आज एखादे नवे काम तुम्ही सुरू करणार आहात. व्यवसायात चढ- उतार येण्याची शक्यता आहे. एखादे काम टाळण्यामुळे समस्या वाढू शकतात. सामाजिक मानसन्मान आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होईल. 

 

वृषभ - आज दिवस प्रेमाचा 

आज प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांचे ध्येय साध्य होणार आहे. नात्यातील कटूपणा दूर होईल. जोडीदारासोबत मौजमस्तीचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी एखादी मनाप्रमाणे जबाबदारी मिळेल. आर्थिक समस्या दूर होणार आहेत. 


मिथुन - नवीन रोजगार मिळेल

आज तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. नवीन रोजगाराची संधी मिळेल. राजकारणातील सक्रीयता वाढणार आहे. रचनात्मक कार्यातून प्रसिद्धी मिळणार आहे. आईवडीलांचे चांगले सहकार्य मिळेल. 


कर्क  अचानक खर्च वाढण्याची शक्यता

आज अचानक तुमचा खर्च वाढणार आहे. सावध राहिलेले योग राहील. आर्थिक समस्या जाणवणार आहेत. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याची  शक्यता आहे. जोडीदारासोबत एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. 


सिंह - मन उत्साहित राहील

आज तुमच्या कामातील जुने अडथळे कमी होतील. काही तरी नवीन करण्याचा उत्साह राहील. दिवसभर फ्रेश वाटेल. पैशांच्या अडचणी दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळेल.

 

कन्या - वाद वाढण्याची शक्यता

आज तुमचा कौटुंबिक वाद वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायातील निर्णय सावधपणे घ्या. राजकारणात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. देणी घेणी सावधपणे करा. 

 

तूळ - एखादी मौल्यवान वस्तू भेट मिळेल

आज सासरच्या लोकांकडून एखादी महागडी वस्तू भेट मिळेल. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळणार आहे. मित्रांकडून आनंदवार्ता समजेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.


वृश्चिक - वातावरणात बदल झाल्याने समस्या निर्माण होतील

आज वातावरणात झालेल्या बदलांमुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मन निराश होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे साधन मिळणार आहे. जुने मित्र भेटणार आहेत. कामाच्या ठिकाणी वाद दूर होतील. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


धनु - जुन्या समस्या सुटतील

आज तुम्ही मित्रांना दिलेले वचन पूर्ण कराल. जुने वाद मिटणार आहेत. आत्मविश्वासाने कोणत्याही समस्येवर मात कराल. जोडीदाराच्या नात्यातील गोडवा वाढणार आहे. एखादी आनंदाची बातमी मिळेल. राजकारणातील सहकार्य वाढण्याची शक्यता आहे.


मकर - नवीन योजना सध्या टाळा

आज एखादी नवीन योजना सुरू करणे पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी तुमचे वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. राजकारणातून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली