4 मार्च 2020 चं राशीफळ, कन्या राशीला धनलाभ

4 मार्च 2020 चं राशीफळ,  कन्या राशीला धनलाभ

मेष - भावंडासोबत असलेला वाद संपेल

आज तुमचे भावंडासोबत चांगले जमणार आहे. चांगल्या कार्याने समाजात स्वतःची प्रतिमा तयार कराल. एखाद्या संस्थेद्वारा सन्मान मिळेल. कामाच्या  ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल.


कुंभ - व्यवसायात चढ - उतार येण्याची शक्यता

आज व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. धुर्त लोकांपासून सावध राहा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. 

 

मीन- दुखापत होण्याची शक्यता

आज तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दुखापत होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


वृषभ -  लाभाची संधी मिळेल

आज तुम्हाला करिअरमध्ये यशाची संधी मिळेल. व्यवसायात नवीन सहकाऱ्यांची ओळख वाढेल. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस वाढेल. धार्मिक कार्यात मन रमवाल.


मिथुन - देणी घेणी करताना सावध राहा

आज धनसंपत्तीबाबत तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता आहे. अचानक खर्च वाढणार आहे. प्रॉपर्टीबाबत समस्या येण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते मजबूत असेल. धार्मिक कार्यात मन रमवाल.  


कर्क - आरोग्य चांगले राहील

जीवनशैलीत बदल होण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी चांगला काळ आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे मस्तीचे वातावरण आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

 

सिंह -  जोडीदाराकडून तणाव मिळण्याची शक्यता

कुटुबांतील विश्वास नसलेल्या व्यक्तीपासून सावध राहा. जोडीदाराचा तणाव वाढणार आहे. राजकारणातील वाढ जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


कन्या -  संपत्ती खेरदीचा योग आहे

आज चल-अचल संपत्ती खरेदीचा योग आहे. नवीन कामे मिळण्याची  शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यात वाढ होईल. 


तूळ - छोटी मोठी आजारपणे वर येतील

आज तुमच्या तब्येतीच्या तक्रारी वाढणार आहेत. आहाराबाबत सावध राहा. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल.  


वृश्चिक -  नातेसंबंध मजबूत होतील

नातेसंबंधातील गैरसमज दूर होतील. जवळच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. अधिकाऱ्याची मदत मिळेल. गुंतवणूक करण्याचा निर्णय टाळा. राजकारणातील रस वाढणार आहे. महत्त्वाची बिघडलेली कामे पूर्ण कराल. 


धनु -  आळसाचा त्याग करा

आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी जाणवेल. विद्यार्थ्यांचा आळस वाढणार आहे. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य आणि मानसन्मानाबाबत सावध राहा. 


मकर -  महागड्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून महागड्या भेटवस्तू मिळतील. धनसंपत्तीबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवहार करताना सावध राहा. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. वाहन चालवताना सावध राहा. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'