आपल्या राशीप्रमाणे कोणती व्यक्ती किती वेळात पडते प्रेमात, जाणून घ्या

आपल्या राशीप्रमाणे कोणती व्यक्ती किती वेळात पडते प्रेमात, जाणून घ्या

काही व्यक्तींना प्रेमात पडायला वेळ लागतो तर काही व्यक्ती अगदी सहज एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिरतात.  पण हे नक्की कसं घडतं. ज्योतिषशास्त्रामध्येही याचा अभ्यास करण्यात आला आहे. काही राशींंच्या व्यक्ती या पटकन प्रेमात पडतात तर काही राशीच्या व्यक्तींना समोरच्याला समजून घेतल्याशिवाय प्रेमात पडणे योग्य वाटत नाही. प्रेमाच्या बाबतीत सगळंच वेगळं असतं. काही जण काहीही विचार न करता बिनधास्त प्रेम करतात. तर काही जण प्रेमात पडल्यावर विचार करतात. तर काही राशीच्या व्यक्ती या विचार करून प्रेम करतात. अर्थात त्याचं प्रेम असतं पण त्यात प्रॅक्टिकल गोष्टींचा विचारही असतो. आम्ही या लेखात अशा राशींबद्दल सांगणार आहोत जे प्रेमाच्या बाबतीत जलदही आहेत आणि काही जण आहेत स्लो. या लेखातून आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. तुम्ही यापैकी नक्की कोणत्या राशींचे आहात आणि तुमचा अनुभव काय आहे सांगा बरं. 

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना जन्मापासूनच त्यांच्या  आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा अनुभव असतो आणि त्यापैकी काही जण तर लीडर्स असतात. प्रेमाच्या बाबतीतीही मेष राशीच्या व्यक्ती फारच विचारपूर्वक निर्णय घेत असतात. त्यांचे मत कोणीही बदलू शकत नाही. जरी विचार निर्णयपूर्वक असला तरीही या राशीच्या वक्ती पटकन प्रेमात स्वतःला झोकून देतात. जितक्या लवकर हे प्रेमात स्वतःला झोकून देतात तितक्यात लवकर ते प्रेमाच्या विळख्यातून बाहेरही येतात. 

वृषभ

या राशीच्या व्यक्ती कधीही कोणाच्याही लवकर प्रेमात पडत नाहीत. या राशीच्या व्यक्ती अतिशय प्रॅक्टिकल असून मनाने विचार न करता डोक्याने जास्त विचार करणाऱ्या असतात. पहिल्या अथवा दुसऱ्या भेटीत कधीही वृषभ राशीच्या व्यक्तींना कोणीही व्यक्ती आवडली आहे असं होत नाही. कोणत्याही व्यक्तीला जाणून घेण्यासाठी या राशीच्या व्यक्ती थोडा वेळ घेतात आणि त्यानंतरच नात्यामध्ये अडकण्यासाठी तयार होतात. पण एकदा प्रेमात असतील तर या व्यक्ती प्रेमाप्रती स्वतःला झोकून देतात. 

मिथुन

बऱ्याचदा मिथुन राशीच्या व्यक्ती या दोन्ही प्रकारच्या तुम्हाला आढळतात. त्या प्रेमात असतातही आणि नसतातही. पण जेव्हा या व्यक्ती प्रेमात असतात तेव्हा त्यांच्या मनाप्रमाणेच सर्व काही असतं.  तसंच या व्यक्ती फारच लवकर कोणत्याही गोष्टीला कंटाळतात. त्यांच्या बौद्धिक पातळीशी जर कोणी मॅच होत असेल तर या राशीच्या व्यक्ती पटकन प्रेमात पडतात. अन्यथा मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणं हा एक मोठा टास्क आहे. 

कर्क

अतिशय संवेदनाशील असणारी ही रास आहे. प्रेमाला या राशीच्या व्यक्ती खूपच घाबरतात. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कुटुंब हे नेहमीच पहिल्या स्थानावर असते.  त्यामुळे कोणाच्या तरी प्रेमात पडून त्यांना सतत प्राधान्य देणं या राशीच्या व्यक्तींना जमत नाही. प्रेमात पडायला या व्यक्तींची ना नसते. पण या व्यक्तींना प्रेमात पडायला वेळ लागतो. पण जर समोरची व्यक्ती त्यांच्याइतकीच भावनाप्रधान आणि संवदेनशील असेल तर या व्यक्ती पटकन जोडल्या जातात. 

सिंह

सिंह राशींच्या व्यक्तींमध्ये सहनशक्ती फारच कमी असते आणि या व्यक्ती कोणताही निर्णय पटकन घेतात. प्रेमाच्या बाबतीतही वेगळं काहीच नाही. सूर्याची रास असणारी ही व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरते.  त्यामुळे कोणालाही पटकन प्रेमात पाडणाऱ्या या व्यक्ती असतात. या व्यक्ती प्रेमात पटकन पडतात पण समोरची व्यक्ती योग्य आहे की नाही हे कळायला त्यांना वेळ लागतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना प्रेमात धोका मिळतो. 

कन्या

कन्या राशींच्या व्यक्ती या जन्मालाच येतात त्या परफेक्शनिस्ट म्हणून. यांची स्वतःची अशी तत्व असतात. या व्यक्तींना तुम्ही पटकन प्रेमात पाडू शकत नाही. प्रेमात पडण्यासाठीही या व्यक्ती खूपच वेळ घेतात. आपली तत्व समजणारी व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत या व्यक्ती प्रेमात पडत नाहीत. इतर गोष्टींप्रमाणे त्यांना प्रेमातही सगळं काही परफेक्ट लागतं. त्यामुळे या व्यक्तींना प्रेमासाठी खूपच वाट पाहावी लागते. 

तूळ

ही रास म्हणजे प्रेमाचा एक संपूर्ण ग्रहच आहे असे  म्हणावे लागेल. या व्यक्ती खऱ्या अर्थाने रोमँटिक असतात. या राशीच्या व्यक्ती पटकन प्रेमात पडतात. तसंच या व्यक्ती खूपच फ्लर्ट असतात आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीही पटकन त्यांच्याकडे आकर्षित होतात. पण या व्यक्तींना कोणत्याही गोष्टींसाठी आपल्याकडे वळवणं ही कठीण गोष्ट आहे. त्यामुळे बऱ्याचदा या व्यक्ती प्रेमात पडतील की नाही हे सांगणं कठीणही होतं. 

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती

वृश्चिक

आपल्याच वृत्तीच्या प्रेमात शक्यतो या राशीच्या व्यक्ती पडतात.  कारण प्रेम हे या राशीच्या व्यक्तींसाठी सर्वस्व आहे. प्रेमात पडण्यासाठी  या राशीच्या व्यक्ती वेळ घेतात पण एकदा समोरच्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम केलं की या व्यक्ती कधीही मागे हटत नाहीत. या राशीच्या व्यक्तींच्या प्रेमात असणं म्हणजे एक प्रकारे साहसच आहे. या राशीच्या व्यक्तींना कोणीही सहज प्रेमात पाडू शकत नाही.  कारण या राशीच्या व्यक्तींना आपलंसं करून घेणं खूपच कठीण आहे. 

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना कोणत्याही माणसाच्या प्रेमात पडण्याची गरज भासत नाही.  कारण त्यांचं आयुष्यावर इतकं भरभरून प्रेम असतं की, त्यांना कोणत्याही माणसाने आपल्या आयुष्यात घाईघाईने प्रवेश करावा असं वाटत नाही. आपला जोडीदार निवडण्यासाठी या राशीच्या व्यक्ती बराच काळ वाट पाहू शकतात. साहसी गोष्टी या राशीच्या व्यक्तींमध्ये सर्वात आधी येतात आणि त्यानंतर प्रेमाला प्राधान्य. आपल्या स्वांतत्र्यावर गदा येणार नाही अशाच व्यक्तीच्या या व्यक्ती प्रेमात राहू शकतात. अन्यथा प्रेम नाही मिळालं तरी त्यांना फरक पडत नाही. 

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

मकर

आपल्या जबाबदारी आणि कामावर या राशीच्या व्यक्तींचं अधिक प्रेम असतं. ज्या व्यक्ती त्यांच्याप्रमाणे असतात त्यांच्यावर या व्यक्ती  जास्त प्रेम करतात. मकर राशीच्या व्यक्ती या सहसा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांच्या प्रेमात पडतात. त्यांना त्याच्यापेक्षा मोठ्या महिलांचे जास्त आकर्षण असतं. पण प्रेम व्यक्त  करण्यासाठी मात्र या व्यक्ती बराच वेळ घेतात. प्रेमाच्या बाबतीत घाई करणं यांना मान्य नाही. 

कुंभ

धनु आणि मेष या राशीच्या व्यक्तींप्रमाणेच आपल्याला कोणी पूर्ण करण्यासाठी प्रेमाची गरज आहे असं या राशीच्या व्यक्तींना वाटत नाही. त्यांच्यासाठी मैत्री आणि इतर गोष्टी या प्रेमाच्या आधी येतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती प्रेमात पडण्यासाठी इतर राशीच्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक वेळ घेतात. त्यांच्या तत्वांशी मिळत्याजुळत्या व्यक्तीच्या प्रेमातच या व्यक्ती पडू शकतात. त्याच्या विरोधाभासात जर समोरची व्यक्ती असेल तर त्यांचं जास्त पटत नाही.

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

मीन

मीन राशीच्या व्यक्ती या जन्मापासूनच स्वप्न पाहणाऱ्या असतात आणि प्रेमात पडणं या व्याख्येच्याच या व्यक्ती प्रेमात असतात. त्यांच्या आयुष्यात रोमान्सच भरलेला असतो. त्यामुळे या व्यक्ती खूपच लवकर प्रेमात पडतात. पण त्यामुळे या व्यक्तींना त्रासही फार लवकर होतो. शिवाय या व्यक्ती एकदाच प्रेमात पडतील असं नाही तर एका व्यक्तीच्या प्रेमातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला यांना वेळ लागत नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.