तुमच्या बाळासाठी नाव निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी

तुमच्या बाळासाठी नाव निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी

आपल्या काळजाच्या तुकड्याला 9 महिने गर्भात ठेवल्यानंतर ते बाळ जेव्हा डॉक्टर हातात देतात. तो क्षण कोणत्याही आईबाबांच्या मनावर कोरला जातो. आपल्या या बाळाचं नाव काय ठेवायचं हा प्रत्येक घरातला कुतूहलाचा विषय असतो. जर तुम्हीही बाळासाठी नाव निवडत असाल तर खालील गोष्टी नक्की लक्षात घ्या. सध्या सर्वात जास्त मागणी आहे ती 'स' अक्षराला. स वरून मुलांची नावे तुम्हाला आमच्या लेखात मिळू शकतात. 

Shutterstock

पूर्वीची प्रथा

कोणत्याही मातेला मातृत्वाची चाहूला लागताच मनात पहिला विचार येतो तो बाळाचं नावं काय ठेवायचं याचा. त्यामुळे बरेचदा आईबाबांनी होणाऱ्या बाळासाठी काही नावं निवडून ठेवलेली असतातच. पण पूर्वी मात्र देवाचं नाव, पूर्वजांचं नाव किंवा आत्त्याने ठरवलेलं नावं ठेवण्याची प्रथा होती. त्यामुळे बरेचदा बारश्याच्या वेळी काय नाव टेवायचं हे आधीचं ठरलेलं असे. पण आजकाल मात्र नवा ट्रेंड पाहायला मिळतो. जसं बॉलीवूड स्टार्सच्या नावावरून, त्यांच्या मुलांचा नावावरून किंवा बाळासाठी आलेलं अक्षर इतरांना सांगून त्यांच्याकडूनही पर्याय जाणून घेतला जातो. तसंच नामकरण आमंत्रण संदेश ही पाठवले जातात

युनिक नावं ठेवण्याचा ट्रेंड

गेल्या काही वर्षापासून बाळाचं युनिक नाव ठेवण्याचाही ट्रेंड आहे. मग ते र अक्षर असो वा अजून वेगळं पण युनिक नाव म्हणजे जे इतरांपेक्षा वेगळं, ज्याचा चांगला अर्थ असेल आणि जे ऐकायलाही छान वाटेल असं असावं. बरेचदा युनिक नाव ठेवण्याच्या नादात कठीण नाव ठेवलं जातं. ज्याचा उच्चार आपल्यालाच येत नाही तर मुल मोठ झाल्यावर कसं घेणार. काहीजण तर आडनावाला मॅच होणार नावही बाळासाठी निवडतात. लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, भविष्यात बाळाला त्याचं नाव व्यवस्थित उच्चारता आलं पाहिजे आणि आवडलंही पाहिजे.

नावाचं उच्चारण (Pronounciation Test)

तुम्हाला एखादं नाव आवडलं. ते छानही असेल पण ते फायनल करण्याआधी एका कागदावर लिहून घरातल्या सदस्यांना आणि मित्रपरिवाराला उच्चारण्यास सांगा. जर जास्त लोकांना त्याचा उच्चार करणं योग्यरितीने जमलं तर ते नाव ठरवा. नाहीतर दुसरं एखादं नाव शोधा. 

टोपणनाव (Nickname Test)

तुम्ही बाळासाठी एखादं मोठं नाव निवडलंत तर हमखास लोकं त्याचं टोपणनाव किंवा निकनेम करतील. अनेक वेळा तरही निकनेम अगदी वाईट असतात. त्यामुळे नाव ठेवताना पुढे जाऊन त्याची खिल्ली उडणार नाही याचीही काळजी घ्या. 

नावाचा अर्थ 

अनेकवेळा नाव चांगलं असतं पण आईबाबांना त्या नावाचा अर्थच माहीत नसतो. असं करू नका. कोणतंही नाव बाळासाठी निवडताना त्याचा अर्थही जाणून घ्या. नाव निवडताना गुगल सर्चमध्ये ते टाकून त्याचा अर्थ आणि उत्पत्ती किंवा दुसऱ्या भाषांमधील अर्थ जाणून घ्या.

मग तुम्हीही बाळासाठी नाव निवडताना वरील गोष्टींची काळजी घ्या. कारण बाळाचं तुम्ही केलेलं नामकरण हे त्याच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.