भारंभार मेकअप कशाला ‘न्यूड’ मेकअपनेही दिसाल सुंदर (How To Do Nude Makeup)

भारंभार मेकअप कशाला ‘न्यूड’ मेकअपनेही दिसाल सुंदर (How To Do Nude Makeup)

मेकअपने सौंदर्य खुलते हे काही सांगायला नको. पण सतत मेकअप करुन तोच तोच लुक करायचा कंटाळा येतो. शिवाय समोरच्या व्यक्तीलाही तुमचा सतत तोच तोच मेकअप पाहून कंटाळा आलेला असतो. तुम्हाला तुमच्या रोजच्या मेकअपची स्टाईल थोडी बदलायची आहे का? म्हणजे मेकअप तर करायचा आहे. पण तो थोडा हटके आणि वेगळा. मग तुम्ही सध्याच्या ट्रेंडनुसार ‘न्यूड मेकअप’ करायला हवा. नो मेकअप लुक देणारा असा हा मेकअपचा प्रकार याची अधिक माहिती आपण आज घेऊया.

Table of Contents

  न्यूड मेकअप म्हणजे काय? - What is Nude Makeup

  Instagram

  न्यूड मेकअप म्हणजे असा मेकअप जो तुम्ही चेहऱ्यावर केला आहे असा पटकन दिसून येणार नाही. यालाच इंग्रजीमध्ये No Makeup Look असे म्हणतात. अगदी सौम्य स्वरुपातील हा मेकअप तुम्हाला कुठेही कधीही करता येतो. तो फार दिसत नसल्यामुळेच याला न्यूड असे म्हटले जाते. या मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिक, ब्लशरच्या शेड्सदेखील वेगळ्या असतात. हल्ली हा मेकअपचा प्रकार आणि मेकअपचे साहित्य फारच ट्रेंडमध्ये आहेत. न्यूड मेकअपचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत. पण यामध्ये एक गोष्ट सर्वार्थानेसारखी आहे ती म्हणजे हा मेकअप लाईट असायला हवा.

  तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे जाणून घेण्यासाठी वाचा या टीप्स

  न्यूड मेकअपसाठी लागणाऱ्या मेकअप प्रोडक्टची निवड - Products For Nude Makeup

  न्यूड मेकअप काय हे जाणून घेतल्यानंतर आता या मेकअपसाठी प्रोडक्टची निवड कशी करायची हे आता आपण जाणून घेणार आहोत. कारण या मेकअप प्रोडक्टची योग्य निवड केलीत तरच तुमचा मेकअप खुलून दिसेल. करुया सुरुवात

  1. फाऊंडेशन आणि कन्सिलर

  मेकअपची सुरुवात ज्या गोष्टीने ती गोष्ट म्हणजे फाऊंडेशन आणि कन्सिलर. याची निवड अत्यंत महत्वाची असते. न्यूड मेकअपमध्ये फाऊंडेशन हे कधीच ग्लॉसी असता कामा नये ते नेहमीच मॅट असायला हवे. शिवाय तुमचा शेडही अगदी परफेक्ट असायला हवा.कन्सिलरही तुमच्या चेहऱ्याला  पांढरे करणारे नसावे. तर ते तुमच्या त्वचेमध्ये ब्लेंड होणारे असावे. 

  Make Up

  Smashbox - Studio Skin Full Coverage 24 Hour Foundation

  INR 3,300 AT Smashbox

  2. ब्लशरचे शेड्स

  गालांना चमकवणारे ब्लूशर आणि ब्रॉन्झर शेड्स न्यूड मेकअपमध्ये फार महत्वाचे असतात. न्यूड शेडच्या पॅलेटमध्ये तुम्हाला न्यूडचे वेगळे शेड मिळू शकतील. जे तुमच्या चेहऱ्यावर लावल्यासारखेही वाटत नाहीत.

  Blusher + Bronzer + Illuminator

  INR 850 AT Makeup Revolution

  3. लिपस्टिकच्या शेड्स

  गडद लाल रंग न्यूड शेडमध्ये येत नाही. हल्ली न्यूड शेडचे वेगळे पॅलेटच तुम्हाला मिळते. तुम्ही नव्याने लिपस्टिक घेण्याच्या विचारात असाल तर कोणत्याही ग्लॉसी रंगाच्या मेकअपची निवड करु नका. तर मॅट रंग निवडा. फिक्कट गुलाबी ते फिकट चॉकलेटी अशा रंगाची निवड करा. अनेक चांगल्या ब्रँडमध्ये तुम्हाला या लिपस्टिक मिळतात. लिक्विड लिपस्टिकमध्येही तुम्हाला असे शेड्स मिळतात. या लिपस्टिक लावल्यानंतर त्या मॅट होतात.

  फाऊंडेशन आधी चेहऱ्याला प्राईमर लावणे म्हणून असते आवश्यक

  Make Up

  M.A.C Satin Lipstick - Mocha

  INR 1,700 AT MAC

  4.आयशॅडोची निवड

  आयशॅडो हा डोळ्यांच्या मेकअपचा फारच महत्वाचा भाग आहे. जर तुम्हाला न्यूड रंगाचे आयशॅडो हवे असेल तर ग्लॉसी आयशॅडो टाळा. त्याऐवजी मॅट रंगाचे आयशॅडो निवडा.यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या शेड्स मिळतील. याचा वापर करताना तुम्हाला जपून करायचा आहे ही गोष्ट लक्षात असू द्या.

  Maybelline The Nudes Eye Shadows Palette

  INR 895 AT Maybelline

  5. काजळ आणि मस्कारा

  काजळ आणि मस्काराबाबत फार असे काही नियम नाहीत. तुम्ही लाँग लास्टिंग आणि  स्मज फ्री असे काजळ आणि मस्कारा निवडा. कारण याचा वापर तुम्हाला फारसा करायचा नसतो. त्यामुळे तुमच्याकडे असलेले कोणतेही काजळ किंवा मस्कारा तुम्ही वापरु शकता. त्यामुळे यासाठी तुम्हाला खास काही खर्च करण्याची गरज नाही. 

  Make Up

  Maybelline New York Volum Express Hyper Curl Mascara

  INR 217 AT Maybelline

  असा करा न्यूड मेकअप - How To Do Nude Makeup (Step-by-step)

  shutterstock

  न्यूड मेकअपसाठी लागणारे साहित्य पाहिल्यानंतर आता आपण सुरुवात करुया मेकअपला. जाणून घेऊया कसा करतात हा मेकअप 

  Step 1: कोणत्याही मेकअपची सुरुवात करताना तुम्हाला चेहरा हायड्रेट करणे फारच गरजेचे असते. यासाठीच तुम्ही तुमच्या चेहऱ्याला चांगल्या प्रतीचे मॉश्चरायझर लावा. 

  Step 2: आता वेळ आहे ती फाऊंडेशनची. तुमच्या स्किनटोननुसार तुम्ही परफेक्ट फाऊंडेशन निवडणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला फाऊंडेशनची निवड कळत नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करु शकतो असा व्हिडिओ पाहू शकता. एक मोठा ब्रश घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फाऊंडेशन लावून घ्या. जर तुमच्याकडे कन्सिलर नसेल तर तुम्ही फाऊंडेशनचा उपयोग अंडर आय किंवा डोळ्यांवरही लावू शकता. 

  Step 3: जर तुमच्याकडे कन्सिलर असेल तर तुम्ही ते अगदी व्यवस्थित लावून घ्या. तुमच्या चेहऱ्यावरील कन्सिल करण्यासारखे भाग म्हणजे डोळे, ओठांच्या कडा यांना कन्सिलर लावून घ्या.

  Step 4: फाऊंडेशन व्यवस्थित सेट करण्यासाठी तुम्ही लुझ पावडरचा वापर करा. डोळ्यांच्या खालीदेखील ही पावडर लावा. 

  Step 5: काजळ पेन्सिल किंवा तुमच्याकडे आयब्रोज गडद करणाऱ्या पेन्सिल असतील तर त्याचा वापर करुन घ्या. कारण तुमच्या आयब्रोजमुळे तुमच्या लुकमध्ये बराच फरक पडतो. 

  Step 6: आता वेळ आहे तो डोळ्यांचा मेकअप करण्याची खरंतरं अशा प्रकारच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा फार हेव्ही मेकअप केला जात नाही. म्हणजे काजळ, आयलायनर, आयशॅडो यांचा खूप वापर होत नाही.त्यामुळ डोळ्यांचा मेकअप करताना तुम्ही न्यूड रंगाचे पॅलेट निवडा. यामध्ये तुमच्या स्किनटोनला साजेसे असे रंग असतात. ते अगदी हलक्या हाताने लावून घ्या. यामध्ये तुम्हाला शेड्सची गरज नसते. एक सिंगल शेड पुरेशी आहे. आयशॅडो लावल्यानंतर जर तुम्हाला अगदी लायनर लावण्याची इच्छा असेल तर ते एकदम बारीक लावा. जर तुम्ही न्यूड मेकअप म्हणताय आणि जाड लायनर लावताय तर तुमच्या या लुकला  काहीच अर्थ नाही. 

  Step 7: तुम्हाला डोळे अधिक बोलके करायचे असतील किंवा ते फार फटफटीत दिसू द्यायचे नसतील तर मग तुम्हाला गरज आहे ती म्हणजे मस्काराची तुम्ही तुमच्या पापण्यांना मस्कारा लावून घ्या. डोळ्यांच्या खाली काजळ लावण्याऐवजी आयशॅडोचा ब्रश तुम्ही डोळ्यांच्या बाहेरील बाजूस कडांना लावू शकता. त्यामुळे तुमचे डोळे खुलून दिसतील. 

  Step 8: आता वेळ आहे ती ब्लशरची. मेकअप जितका नॅचरल तितका तो अधिक चांगला दिसेल हे लक्षात घेत तुम्ही लाईट ऑरेंज, लाईट पिंक अशा शेडची निवड ब्लशर म्हणून करा. अगदी हलक्या हाताने तुमच्या चीक बोनवर ब्लशर लावा. ब्लशर नाकाचे टोक, हनुवटीवर लावायला अजिबात विसरु नका. 

  Step 9: आता सगळ्यात शेवटी वेळ येते ती म्हणजे लिपस्टिक लावण्याची साधारण तुमच्या ओठांच्या रंगाना साजेशी अशी लिपस्टिक शेड निवडा. कारण तरच ती न्यूड शेडमध्ये येते. ओठांच्या कडांना पेन्सिल फिरवून तुम्ही अगदी एक ते जास्तीत जास्त दोन स्ट्रोक इतकीच लिपस्टिक लावा. तुमच्या अशा लुकमध्ये तुम्ही खूप जास्त लिपस्टिक लावणे अपेक्षित नसते. 

  Step 10: सगळ्यात शेवटी तुमच्या चेहऱ्यावर एक्स्ट्रा झालेले पिग्मेंट काढून टाका. कारण ते तुमचा मेकअप लुक खराब करु शकतात.

  न्यूड मेकअप करताना टाळा या चुका - Mistakes To Avoid While Doing Nude Makeup

  न्यूड मेकअप करताना आपण काही अशा चुका करतो की, त्या आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत पण त्याकडे तुम्ही लक्ष देणे फारच गरजेचे असते या चुका कोणत्या ते आता जाणून घेऊया. 

  • न्यूड मेकअप हा हलका आणि वरच्या वर करण्यासारखा मेकअप असतो. त्यामुळे जर तुम्ही फाऊंडेशनचे थर चेहऱ्यावर चढवत असाल तर तो मेकअप न्यूड मेकअप असूच शकत नाही. कारण तुमच्या चेहऱ्यावरील फाऊंडेशन हे थोड्यावेळाने फुटण्याची शक्यता असते. 
  • Contouring हा मेकअपमधील फार महत्वाचा भाग आहे. पण न्यूड मेकअपमध्ये आपण तो करत नाही. त्यामुळे contouring करायला जाऊ नका. 
  • लिपस्टिक शेडची निवड यामध्ये फार महत्वाची असते. एखाद्याला गुलाबी रंगामधील एखादा शेड चांगला दिसत असेल तर तुम्ही तो रंग घेऊ नका. स्वत:च्या स्किनटोनचा विचार करा. तुमच्या ओठांच्या रंगाचा विचार करा. सगळ्यांचे ओठ गुलाबी नसतात.काहींच्या ओठांचा रंग हा थोडासा चॉकलेटीकडे झुकणारा असतो. त्यामुळे तुम्हाला ओठांना उठाव देईल असा रंग निवडायचा आहे. पण असे करताना तो खूप डार्क किंवा खडूसारखा दिसणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे.
  •  गाल लाल दिसावे म्हणून जर तुम्ही खूप ब्लशर लावण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ते टाळा कारण तुम्ही गालाला ब्लशर लावले आहे हे अगदी सहज लक्षात येईल.
  • डोळ्यांचा मेकअप करताना खूप गडद आयशॅडो लावू नका. लाल, निळा, करडा असे काही रंग निवडणे तुम्ही टाळा. कारण ते न्यूड मेकअपचा भाग नाहीत.

  तुम्हाला पडलेत का प्रश्न - FAQ

  Shutterstock

  न्यूड लिपस्टिक म्हणजे काय?
  हल्ली बाजारात गेल्यानंतर तुम्हाला न्यूड लिपस्टिक शेड्स अशा लिपस्टिकच्या वेगळ्या शेड्स मिळतात. या लिपस्टिक फार गडद नसतात आणि फार फिक्या रंगाच्यासुद्धा नसतात. या लिपस्टिक लावल्यानंतर तुमच्या ओठांना एक नॅचरल लुक येतो. उदा. जर तुम्ही ओठांसाठी न्यूड शेडमधील गुलाबी रंगाची शेड निवडली असेल तर ही लिपस्टिक तुमच्या ओठांवर तुमच्या ओठांचा रंग असल्याप्रमाणेच दिसते. न्यूड लिपस्टिक या नेहमी मॅट असतात. त्यामुळे त्या चमकत नाहीत. 

  न्यूड मेकअप रोज करता येऊ शकतो का?
  हो ,अगदी आरामात तुम्ही हा मेकअप रोज करु शकता. न्यूड मेकअप म्हणजेच नो मेकअप लुकसारखा असतो. जर तुम्हाला खूप मेकअप करुन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय फारच उत्तम आहे. म्हणजे तुम्ही मेकअप तर केला आहे पण तो न केल्याप्रमाणेच भासेल शिवाय हा मेकअप तुमचे सौंदर्य अधिक खुलवेल. या मेकअपचा टचअप तुम्हाला सतत द्यावा लागत नाही त्यामुळे जर तुमच्या कामाचे स्वरुप हे फार व्यग्र स्वरुपाचे असेल तर तुम्ही न्यूड मेकअपलाच पसंती द्या. 

  न्यूड मेकअपचा शेड वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार वेगळ असतो का?
   हो,तुमच्या त्वचेच्या शेडनुसारच तुम्हाला न्यूड मेकअपची निवड करणे अनिवार्य आहे. म्हणजे अगदी फाऊंडेशनच्या शेड्सपासून ते ओठांच्या लिपस्टिक शेडपर्यंत सगळे तुम्ही तुमच्या स्किनटोन नुसार घेणे आवश्यक आहे. जर तुमची त्वचा सावळ असेल आणि तुम्ही फार लाईट रंगाची न्यूड लिपस्टिक निवडली तर ती तुम्हाला एखादा खडू ओठाला लावल्याप्रमाणे दिसेल. पण गुलाबीतील थोडी गडद अशी शेड तुम्ही निवडली तर ती तुम्हाला नॅचरल दिसेल. या काही गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या त्वचेसाठी योग्य शेडची निवड करा. 

  आता जर कधी तुम्हाला फार  मेकअप करायचा नसेल. किंवा नो मेकअप लुक हवा असेल तर अशा पद्धतीने न्यूड मेकअप करा आणि सुंदर दिसा. 

  2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.