कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे आता सर्वांना घरातच राहावं लागतं आहे. या होम क्वारंटाईनमुळे वास्तविक कुटुंबातील सर्वजण पुन्हा एकत्र बसून नाश्ता, जेवण करत आहेत. मात्र यामुळे सर्व गृहिणींच्या स्वयंपाकघराला मुळीच सुट्टी नाही. आता तर दररोज नाश्ता आणि जेवणासाठी काय नवनवीन पदार्थ बनवावे हा प्रश्न प्रत्येकीच्या मनात निर्माण झाला आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत काही झटपट आणि इन्स्टंट करता येतील अशा रेसिपीज शेअर करत आहोत. एकतर सध्या घरात राहील्यामुळे व्यायामाचा अभाव जाणवत आहे. त्यात सतत नवनवीन पदार्थ खाण्यामुळे वजन वाढण्याची भितीदेखील डोकं वर काढू लागली आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत या हेल्दी रेसिपीज शेअर करत आहोत. तेव्हा आज किंवा उद्याच्या सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करा ओट्स आणि दह्यापासून तयार करा झटपट उत्तपा. ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचं पोटही भरेल आणि वजनदेखील नियंत्रणात राहील.
साहित्य -
ओटमील, दही, आवडीनुसार रवा, बेसन अथवा गव्हाचे पीठ, आवडीप्रमाणे भाज्या, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, नॉनस्टीक तवा
कृती-
सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स हा नेहमीच एक बेस्ट पर्याय असतो. आहारतज्ञ्जांच्या मते ओटसने दिवसाची सुरूवात केल्यामुळे तुमचं पोट दिवसभर भरलेलं राहतं. शिवाय त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात ज्यामुळे अपचनाच्या समस्या कमी होतात. मधुमेहींनी ओटस खाल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणूनच सकाळी ओट्स आणि दह्यापासून तयार केलेला हा झटपट उत्तपा खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. ओटस खाण्यामुळे इंस्टंट ऊर्जा मिळते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि ह्रदयाचे कार्य सुरळीत होते. शिवाय त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक पोषक घटकही मिळतात. तेव्हा ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला कंमेट बॉक्समध्ये रिप्लाय द्यायला विसरू नका.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा -
आप्पेपात्रात अगदी कमी तेलात बनवा असे स्वादिष्ट 'बटाटेवडे'
इडली-डोशाचे बॅटर बिघडत असेल तर तुम्ही करत आहात या चुका
तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने (Healthy Breakfast)