ADVERTISEMENT
home / Care
वयाआधीच केस पांढरे होत असतील तर जीवनशैलीत करा वेळीच बदल

वयाआधीच केस पांढरे होत असतील तर जीवनशैलीत करा वेळीच बदल

कधी कधी केस विंचरताना अचानक तुम्हाला केसांमधून डोकावणारे पांढरे केस दिसतात. हे केस पाहून तुमची रात्रीची झोपदेखील उडून जाते. वयाआधी केस पांढरे होण्यामागची कारणं अनेक असतात. मात्र आता आपण म्हातारे दिसणार या भितीनेच अनेकांची घाबरगुंडी उडते. मग सुरू होतो केस काळे करण्यासाठी काय करावं याचा शोध. खरंतर अशा एक दोन पांढऱ्या केसांना घाबरून लगेचच केस कलर करण्याची मुळीच गरज नसते. मात्र भितीपोटी केस कलर करण्याचा निर्णय घेतला जातो आणि मग इतर काळे केसही आपोआप पांढरे होऊ लागतात. यासाठीच केसांना कलर करण्यापेक्षा जीवनशैलीत काही विशिष्ठ बदल करून आणि  काही घरगुती उपाय करून आणखी केस पांढरे कसे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. यासाठीच हे काही सोपे उपाय करा आणि तुमच्या केसांची काळजी घ्या. 

Shutterstock

आहारात प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा –

जर तुमच्या शरीरात मॅलेनिनची (Melanin) कमतरता असेल तर तुमचे केस लवकर पांढरे होतात. सहाजिकच शरीरातील मॅलेनिन वाढण्यासाठी आहारात पुरेश्या प्रमाणात प्रोटीन्स वाढवा. यासाठीच पांढऱ्या केसांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही नियमित प्रोटीनयुक्त आहार घेत आहात याबाबत काळजी घ्या. दूध, अंडे, सोयाबीन, पनीर पालेभाज्या आहारातून घेण्यास सुरूवात करा.  जर तुम्ही आहारातून पुरेसं प्रोटीन घेत नसाल तर काही काळासाठी प्रोटीनयुक्त सल्पिमेंट घ्या ज्यामुळे तुमचे इतर केस पांढरे होणार नाहीत. 

ADVERTISEMENT

Shutterstock

नियमित योगासने करा –

केसांशी संबंधित कोणत्याही समस्या जसं केस गळणं वा केस पांढरे होणं यापासून सुटका मिळण्यासाठी योगासन करणं हा उत्तम पर्याय आहे. सर्वांगासन, शीर्षासन करून तुम्ही तुमच्या केसांचं आरोग्य वाढवू शकता. कारण यामुळे डोक्याजवळचं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. यासाठी नियमित योगासनांचा सराव करण्यास सुरूवात करा. 

दररोज शीर्षासन करण्याचे आहेत फायदेच फायदे, जाणून घ्या

ADVERTISEMENT

Shutterstock

ताणतणावापासून दूर राहा –

प्रमाणापेक्षा जास्त तणाव घेतल्यास किंवा तणावपूर्ण वातावरणात काम केल्यास, केस लवकर पांढरे होतात. यासाठीच ताणतणावापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. घर, ऑफिस, नातेसंबंध असा समतोल राखताना बऱ्याचदा ताण तणावपूर्ण परिस्थितीला सामोरं जाणं हे स्वाभाविक आहे. पण आयुष्यात आनंदी राहायचं की सतत तणावात हे तर फक्त तुमच्याच हातात असू शकतं. यासाठी ताणतणावाला उत्तम रित्या हाताळण्याचं कौशल्य हस्तगत करा.

ADVERTISEMENT

Shutterstock

नियमित केसांना तेल लावण्यास विसरू नका –

केसांचे योग्य पोषण झाले तरच केसांचे आरोग्य चांगले राहते. शिवाय आजकालच्या दगदगीच्या काळात केसांना सतत धुळ, प्रदूषण, सुर्यप्रकाश यांचाच सामना करावा लागतो. म्हणूनच जर तुमचे केस वयाआधीच पांढरे झाले असतील तर केसांना योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. यासाठी नारळाचे तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल अशा तेलांनी केसांना नियमित मालिश करा.  

Shutterstock

ADVERTISEMENT

कांदा आणि लिंबाचा रस-

कांद्याच्या रसामुळे तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबवता येतात. शिवाय यामुळे तुमचे केस गळणेदेखील कमी होते. यासाठी कांद्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांच्या मुळांना लावा आणि वीस मिनीटांनी केस धुवून टाका. कांद्याचा रस लावण्याआधी तुमच्या त्वचेला याची  अॅलर्जी नाही ना याची काळजी घ्या. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

केस गळतीवर वेळीच करा उपचार

‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

ADVERTISEMENT
12 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT