ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत

होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत

होळी म्हटलं की आनंदाचा सण आणि आयुष्यात रंग भरण्याचा सण. होळीचे दोन दिवस म्हणजे रंगांनी रंगून  जाण्याचे आणि एकमेकांना रंग लावण्याचे दिवस. रंगामध्ये सगळेच न्हाऊन निघतात. होळीच्या दिवशी तुम्हाला कोणीही येऊन बेसावधपणे रंग लावते आणि  तुम्ही रागावू पण शकत नाही. हा सण आहेच असा. होळीच्या दिवशी अर्थात रंगपंचमीला आपण आपल्या त्वचेची तर काळजी घेतोच अर्थात रंग खेळायला जाण्याआधी सर्व अंगाला तेल लावूनच आपण जातो. त्याचप्रमाणे तुम्हाला नको असलं तरीही काही वेळा तुमच्या आवडत्या कपड्याचंही नुकसान होऊ शकतं. होळीचे खास गोडधोड पदार्थ खाताना म्हणा. कपड्यांवर डाग पडू शकतात. मग होळीच्या रंगांचा डाग नक्की कसा काढायचा असाही प्रश्न आपल्या मनात असतो. कारण अंगाचा रंग जातानाच दोन दिवस लागतात. मग कपड्यांचा रंग कसा जाणार असा मोठा प्रश्न उद्भवलेला असतो. पण काही सोप्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर हे होळीच्या रंगांचे डाग कपड्यांवरून सहज तुम्ही काढून टाकू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे सोप्या टिप्स सांगणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे होळीचे डाग कपड्यांवरून जाण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही हे कपडे धुणं आवश्यक आहे. कपड्यांवर हे उपाय ट्राय करण्यापूर्वी तुम्ही एखाद्या भागावर हा उपाय आधी करून बघा. यामुळे कपड्यांचे नुकसान नक्कीच होणार नाही. मग रंगपंचमीच्या शुभेच्छा तर द्याच आणि हे उपाय पण नक्की वाचा.

होळीच्या दिवशी धमाल करण्यासाठी बॉलीवूडची टॉप 16 होळीची गाणी

Shutterstock

ADVERTISEMENT

होळीच्या रंगांचे डाग कपड्यांवरून काढण्यासाठी सोप्या टिप्स (tips to remove holi colour stain from clothes)

होळीचे रंग हे बऱ्यापैकी पक्के असतात. मग अशावेळी डाग कसे काढायचे हा प्रश्न असतोच. त्यावेळी तर डाग नाही निघाला तर आपलंही डोकं फिरतं. पण अशावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळीचा रंग खेळून झाल्यानंतर तुम्ही ते कपडे पाण्यात पूर्ण  एक दिवस ठेवून दिले आणि मग धुतले तरीही डाग जायला मदत होते. त्याशिवाय कोणत्या सोप्या पद्धती अवलंबू शकतो ते आपण पाहूया – 

होळीची संध्याकाळ घालवायची कशी – नवे फंडे

 

1. ब्लीच

होळीच्या दिवशी तुम्ही पांढरे कपडे घातले असतील आणि तुम्हाला ड्रायक्लीन करायचे नसेल अथवा घरच्या घरी हे डाग काढायचे असतील तर ते आधी गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवा. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये नॉन क्लोरीन ब्लीच मिसळा. कपडे धुताना वेगळे धुवा. त्यामुळे दुसऱ्या कपड्यांना रंग लागणार नाही. 

ADVERTISEMENT

2. लिंबाचा रस

Shutterstock

लिंबामध्ये अॅसिडिक गुणधर्म असतात, जे कपड्यांवरील न जाणारे डाग घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. होळीच्या रंगांच्या डागावर 15-20 मिनिट्स लिंबाचा रस लावून ठेवा. त्यानंतर तुम्ही तो डाग हाताने हळूवारपणे घासा. ब्रश लावू नका. असे केल्याने डाग निघून जाण्यास मदत मिळेल. 

3. व्हाईट व्हिनेगर

डाग घालवण्यासाठी व्हाईट व्हिनेगर हा उत्कृष्ट उपाय आहे. हे वापरण्याची पद्धतही सोपी आहे. तुम्ही अर्धा कप व्हाईट व्हिनेगरमध्ये साधारण 1 चमचा डिटर्जंट मिसळा. त्यामध्ये साधारण 2 लीटर पाणी घाला. यामध्ये होळीच्या रंगातील कपडे भिजवा आणि मग डाग व्यवस्थित घासा. यामुळे डाग पटकन जाण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

4. विंडो क्लिनर

विंडो क्लिनर अथवा अमोनियबेस्ड स्प्रे तुम्ही होळीच्या रंगांच्या डागांवर मारा. हे साधारण कपडे स्प्रे मारल्यानंतर 15-20 मिनिट्स तसेच ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हे कपडे धुवा. त्यामुळे डाग जाण्यासाठी मदत मिळते. याबद्दल जास्त लोकांना माहीत नाही. पण ही डाग घालवण्याची सोपी पद्धत आहे. 

आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळायला हवी जाणून घ्या

5. अल्कोहोल

Shutterstock

ADVERTISEMENT

डायल्युट न केलेले अल्कोहोल अथवा मेथेलेटेड स्पिरीट (methylated spirits) त्यावर तुम्ही स्प्रेड करा. त्यानंतर काही वेळ कपडे तसेच ठेवा. कपडे तुम्ही हलक्या हाताना घासून घ्या. त्यावर ब्रश मारू नका. असे केल्यास कपड्यांवरील डाग घालवण्यास मदत मिळते. 

मग यंदा बिनधास्त होळीच्या शुभेच्छाही द्या आणि रंगपंचमीही खेळा. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

05 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT