लिंबाचा वापर आपण नेहमी जेवणात आणि आपल्या चेहऱ्यासाठीही करत असतो. त्वचेसाठी लिंबाचा वापर नक्की कसा केला जातो आणि चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे नक्की काय आहेत हे पूर्णपणे आपल्या सगळ्यांनाच माहीत नाही. चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे अनेक आहेत. पण लिंबाचा नक्की वापर कसा करायचा हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना असतो. त्याचविषयी आम्ही ही माहिती या लेखात देत आहोत. लिंबू म्हटलं की, विटामिन सी साठी याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो हे सगळ्यांनाच माहीत आहे. शरीरात आणि अगदी त्वचेलाही विटामिन सी मिळावे यासाठी आपण अगदी लिंबू खाण्यापासून ते लिंबाचा रस आणि साल अथवा लिंबाच्या सालीची पावडर चेहऱ्याला लावण्यापर्यंत विविध वापर आपण करून घेत असतो. असाच लिंबाचा वापर त्वचेसाठी अन्य प्रकारे कसा होतो आणि त्याचे त्वचेला नक्की काय फायदे मिळतात हे आपण पाहूया (how to use lemon for face).
चमकदार आणि मुलायम त्वचा हवी असेल तर तुम्ही घरच्या घरीही अनेक उपाय करू शकता. लिंबातून तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक विटामिन सी मिळते. त्यामुळे चेहरा अधिक सुंदर दिसण्यास आणि चमकदार होण्याचा फायदा मिळतो.
साहित्य - लिंबू, अंडे,
कसा कराल वापर - एका बाऊलमध्ये एका अंड्याचा पांढरा भाग काढून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करून हे व्यवस्थित फेटा. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा. हा मास्क पूर्ण सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा.
काय होतो फायदा - तुम्ही हा पर्याय वापरून पाहा. या दोन्ही पर्यायामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि चेहरा अधिक मऊ आणि मुलायम होतो. तसेच चेहरा निस्तेज न दिसता अधिक ताजातवान दिसतो.
बऱ्याचदा उन्हात काम करत असल्याने अथवा उन्हाच्या त्रासाने शरीरावर आणि चेहऱ्यावर काळे डाग आणि टॅन निर्माण होतात. यावर लिंबू हे नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतं. त्वचेवरील टॅन काढून त्वचा अधिक उजळवण्याचे काम लिंबू यामध्ये करते.
साहित्य - लिंबू, दही
कसा कराल वापर - दह्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्याला आणि मानेवर लावा. काही मिनिट्स हे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
काय होतो फायदा - लिंबू आणि दही याचे मिश्रण हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते. तसेच दह्यामध्ये मिक्स केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी याचा अधिक चांगला उपयोग होतो. मात्र याचा वापर करून झाल्यानंतर चेहऱ्याला मॉईस्चराईज करायला विसरू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅन आणि काळे डाग निघायला नक्कीच मदत मिळते.
ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी तुम्ही चेहऱ्याला कोणतेही उत्पादन लावू शकत नाही. मग घरच्या घरी तुम्हाला उत्कृष्ट पर्याय आहे तो म्हणजे लिंबू. तेलकट त्वचेसाठी लिंबाचा आपल्याला चांगला फायदा करून घेता येतो. यातील अँटिसेप्टिक गुण अॅक्ने काढण्यासाठी आणि विटामिन सी अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते.
साहित्य - मध, हळद, लिंबाचा रस
कसा कराल वापर - एक चमचा मधामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिट्सनंतर तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
काय होतो फायदा - हळदीमध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. त्याचप्रमाणे मध आणि लिंबाचे मिश्रण हे चेहऱ्यावरील अॅक्ने काढून टाकण्यास लाभदायक ठरते. अँटिसेप्टिक असल्याने अतिरिक्त तेलही यातून शोषून घेतले जाते. त्यामुळे आठवड्यातून एक वेळा तरी तुम्ही हा प्रयोग नक्कीच करून पाहू शकता.
बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे (Benefits Of Lemon In Marathi)
लिंबातील विटामिन सी आणि अँटिएजिंग गुणधर्म त्वचेवरील सुरकुत्या कमी करून चेहऱ्यावर तरूणपणा राकण्यासाठी मदत करतात. याचा तुम्ही नियमित वापर केल्यास तुम्हाला तुमची त्वचा अधिक तरूण राखण्यास मदत मिळते.
साहित्य - दुधाची साय, लिंबाचा रस अथवा ऑलिव्ह ऑईल, व्हिटामिन ई ऑईल
कसा वापर कराल - पहिला पर्याय म्हणजे लिंबाचा रस आणि दुधाची साय मिक्स करून चेहऱ्याला लावणे. काही काळ तसंच ठेवून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे. दुसरा पर्याय म्हणजे ऑलिव्ह ऑईल, व्हिटामिन ई ऑईल आणि लिंबाचा रस मिक्स करून घेणे. हे मिश्रण नीट मिक्स करून चेहऱ्याला लावणे. साधारण 20 मिनिट्सने चेहरा स्वच्छ धुणे
काय होतो फायदा - यामुळे तुमची त्वचा अधिक टाईट होऊन सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. यामध्ये अँटिएजिंग गुण असल्याने त्वचा कसदार करण्यासाठी याची मदत मिळते. तसंच तुम्ही जर रोज लिंबाचा दोन चमचे रस जर प्यायलात तरी तुम्हाला सुरकुत्या कमी करण्यासाठी याचा फायदा मिळू शकतो.
लिंबू हे अतिशय चांगले अँटिबॅक्टेरियल घटक म्हणून ओळखले जाते. ज्यामुळे बॅक्टेरिया शिल्लक राहात नाही. त्यामुळे लिंबाचा उपयोग आपण त्वचेसाठी मॉईस्चराईजर म्हणूनही योग्यरित्या करू शकतो.
साहित्य - नारळ तेल आणि लिंबाचा रस
कसा कराल वापर - नारळाच्या तेलात लिंबाचा रस घालून मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही तुमच्या त्वचेवर लावा. फक्त तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही आधी याची टेस्ट करा आणि मगच लावा. अन्यथा इतर कोणत्याही त्वचेसाठी हा उपाय नक्कीच योग्य आहे
काय होतो फायदा - तुमची त्वचा कोरडी होत असेल तर मॉईस्चराईज करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. बाजारात उपलब्ध असणारे मॉईस्चराईजर तुम्हाला महाग वाटत असतील तर हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय आहे. लिंबामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईज होऊन अधिक उजळतेदेखील.
लिंबामध्ये सर्वात जास्त गुण आढळतो तो म्हणजे विटामिन सी चा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळते. तुमचे गुढघे आणि हाताचे कोपरे जर काळे झाले असतील तर लिंबू हा त्यावरील उत्तम उपाप आहे.
साहित्य - लिंबू
कसा कराल वापर - लिंबाचे तुकडे करून घ्या. लिंबाचे हे तुकडे तुम्ही काळा झालेला हाताचा कोपरा आणि गुढघ्यावर चोळा. काही दिवसातच तुम्हाला तुमचे हाताचे कोपरे आणि गुडघे स्वच्छ झालेले दिसून येतील.
काय होतो फायदा - यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे नैसर्गिकरित्या आपली त्वचा उजळण्यासाठी मदत मिळते. लिंबासारखी जादू दुसरी कुठेही नाही.
लिंबामध्ये असलेले विटामिन सी हे त्वचा उजळवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये असलेले सायट्रिक अ्ॅसिड हे त्वचा अधिक उजळवण्यासाठी मदत करते. विटामिन सी हे अत्यंत चांगले अँटिऑक्सिडंट असून शरीरावर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी ताज्या लिंबाचा वापर करावा.
साहित्य - लिंबाचा रस
कसा कराल वापर - लिंबाचा रस काढून घ्या आणि तुमच्या त्वचेला हा रस लावा. काही काळ तसेच ठेवून साधारण 20 मिनिट्सने स्वच्छ पाण्याने धुवा. यामध्ये कोणत्याही अन्य गोष्टी मिक्स करू नका. लिंबू तुमची त्वचा उजळवण्यासाठी एकटेच चांगले काम करू शकते.
काय होतो फायदा - यातील विटामिन सी आणि सायट्रिक अॅसिडमुळे त्वचा अधिक उजळण्यासाठी मदत होते आणि नैसर्गिक पदार्थ असल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही.
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण लिंबू हा आपल्या घरातील पर्याय मात्र आपल्याला सुचत नाही. लिंबू हा यावरील उत्तम पर्याय आहे. यातील सायट्रिक अॅसिडमुळे ब्लॅकहेड्स काढून टाकणे सोपे होते.
साहित्य - लिंबू
कसा कराल वापर - तुमची त्वचा पहिले तुम्ही क्लिन्झिंग करून घ्या. त्यानंतर तुम्ही ब्लॅकहेड्स असणाऱ्या ठिकाणी केवळ लिंबाची फोड चोळा. यामुळे तुमच्या नाकावरील ब्लॅकहेड्स त्वरीत निघून जातात. तसेच तुमची त्वचा मॉईस्चराईज करायला विसरू नका.
काय होतो फायदा - लिंबू नाकावर घासल्याने ब्लॅकहेड्स पटकन निघून येतात. तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करावा लागत नाही.
आपल्या ओठांना एक्सफोलिएट करण्याची गरज असते आणि त्यासाठी तुम्ही नैसर्गिक घटक म्हणून लिंबाचा वापर करू शकता. तुम्हाला जास्त खर्च न करता उत्तम उपाय करता येऊ शकतो.
साहित्य - लिंबाचा रस, ब्राऊन शुगर
कसा कराल वापर - लिंबाचा रस घेऊन त्यामध्ये थोडीशी ब्राऊन शुगर मिक्स करा. हे मिश्रण घेऊन तुम्ही ओठांवर स्क्रब करा. याचा उपयोग तुम्ही उत्तम एक्सफोलिएटर म्हणून करू शकता. या मिश्रणाने तुमचे ओठ मऊ आणि मुलायम होतात.
काय होतो फायदा - लिंबूच्या रसातील असणारे एचएचए हे ओठांवरील डेड स्किन काढून त्याचा उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करते.
दिवसभर काम करून थकायला झालं असेल अथवा बाहेरून सतत मीटिंग्ज करून आलात तर तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावर ताजेपणा आणि पटकन उजळपणा आणायचा असेल तर तुम्ही सहजपणे उपलब्ध होणाऱ्या लिंबाचा वापर करू शकता.
साहित्य - लिंबाचा रस
कसा कराल वापर - लिंबाच्या रसात कापूस बुडवा आणि कापसाने आपला चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल. तुमचा चेहरा अधिक ताजा आणि उजळलेला दिसेल.
काय होतो फायदा - लिंबाच्या रसातील अँटिऑक्सिडंट्समुळे तुमचा चेहरा अधिक सुंदर दिसतो आणि उजळून निघतो. तसेच लिंंबातील विटामिन सी मुळे त्वरीत चेहऱ्यावर ताजेपणा उठून दिसतो.
1. चेहऱ्यावर लिंबू प्रत्यक्षपणे लावता येते का?
हो. चेहऱ्यावर तुम्ही डायरेक्ट लिंबू अथवा त्याची साल अथवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. फक्त तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही त्याचा प्रयोग आधी आपल्या हातावर करून पाहणं गरजेचं आहे.
2. चेहऱ्यावरील बॅक्टेरिया लिंबाच्या रसामुळे मरतात का?
लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या अँटिबॅक्टेरियामुळे लिंबाच्या रसाचा वापर चेहऱ्यावर केल्यास, चेहऱ्यावरील बॅक्टेरिया मरण्यास नक्कीच मदत मिळते.
3. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लिंबाचा रस लावून रात्रभर तसेच ठेवू शकता का?
तुम्हाला लिंबाची अलर्जी नसल्यास, तुम्ही नक्कीच लिंबाचा रस रात्रभर लावून ठेवू शकता. पण लिंबाच्या रसाचा परिणाम हा एक तासातही होतो. त्यामुळे रात्रभर ठेवण्याची गरज भासत नाही.
4. चेहऱ्यावर रोज लिंबाचा वापर करता येतो का?
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्यामुळे लिंबाचा वापर रोज आपल्या चेहऱ्यावर करू नये. तुम्ही आठवड्यातून एक अथवा दोन वेळा याचा वापर नक्कीच करू शकता.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
देखील वाचा -