बाजारातून आणलेली फळं आणि भाज्या धुताना अशी घ्या काळजी

बाजारातून आणलेली फळं आणि भाज्या धुताना अशी घ्या काळजी

जग सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा संसर्ग कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे सर्वांना सुरक्षित राहण्यासाठी घरात राहणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या जीवनावश्यक गोष्टी आणण्यासाठीच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आहे. मात्र या काळात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी अगदी सावधपणे घेणे गरजेचं आहे. घराबाहेरील कोणत्याही गोष्टीमधून कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात बाजारातून आणलेल्या प्रत्येक गोष्टीला निर्जंतूक करून मगच त्याचा वापर करा. यासाठी अगदी बाजारातून विकत घेतलेल्या फळं आणि भाज्यांचीदेखील नीट स्वच्छता करण्याची गरज आहे. कारण या गोष्टी कितीही जीवनावश्यक असल्या तरी त्या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात. सध्या यासाठी प्रत्येक विक्रेता आवश्यक असलेली सुरक्षेची काळजी नक्कीच घेत आहे. मात्र या संसर्गाला टाळण्यासाठी घरात राहणाऱ्या प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी बाजारातून विकत आणलेल्या भाज्या आणि फळांची स्वच्छता कशी करावी हे जरूर जाणून घ्या. 

Shutterstock

भाजी आणि फळं विकत घेताना काय काळजी घ्याल -

सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सगळीकडे भाजी आणि फळांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र असं असलं तरी भाजी अथवा फळे या जीवनावश्यक गोष्टींचा पूरवठा करण्याचा शासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जात आहे. या जीवनावश्यक गोष्टी विकण्यासाठी विक्रेतेदेखील आपला जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहे. म्हणूनच ग्राहकांनीदेखील या वस्तू विकत घेताना त्या नीट तपासूनच घ्याव्यात. तुटवडा भासेल यासाठी जास्तीत जास्त भाज्या आणि फळांचा साठा करू नये. शिवाय खराब झालेली, शिळी, सडलेली फळे आणि भाज्यादेखील विकत घेऊ नये. कारण यामुळे तुम्ही आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे. शक्य असल्यास बाजारात गेल्यावर भाज्या आणि फळे व्यवस्थित निवडून आणि खबरदारी घेऊनच विकत घ्या. 

Shutterstock

भाज्या आणि फळे धुताना आणि कापताना काय काळजी घ्यावी -

भाज्या आणि फळं बाजारातून विकत आणल्यावर या पद्धतीने तुम्ही ती स्वच्छ करू शकता.

  • भाजी अथवा फळ कापण्यापूर्वी कमीत कमी वीस मिनीटे आधी तुमचे हात गरम पाणी आणि हॅंडवॉशने स्वच्छ करा.
  • तुमच्या किचनमधील इतर साहित्य जसे की, चाकू, विळी, कटिंग बोर्ड स्वच्छ धुवून घ्या. शक्य असल्यास या वस्तू गरम पाण्याने धुवा ज्यामुळे त्या निर्जंतूक होतील. 
  • भाज्या आणि फळे नळाखाली वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. 
  • भाज्यांवरील माती आणि धुळ स्वच्छ झाल्यावर ती काही मिनीटांसाठी खाण्याचा सोडा, व्हिनेगर अथवा मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. ज्यामुळे भाजी आणि फळे निर्जंतूक होतील. 
  • भाज्या आणि फळे मीठ अथवा सोड्याच्या पाण्यातून बाहेर काढा आणि घरातील स्वच्छ कापडाने पुसून घ्या. 
  • त्यानंतर गरम पाण्याने धुतलेल्या चाकू, विळी अथवा चॉपिंग बोर्डवर ती कापण्यास घ्या. 
  • भाज्या अथवा फळे बराच वेळ कापून ठेवू नका. कापल्यानंतर भाजी स्वयंपाकासाठी आणि फळे खाण्यासाठी वापरा. कारण कापून ठेवलेल्या भाजी आणि फळांवर जीवजंतूंचे पोषण लवकर होऊ शकते. 
  • कोबी अथवा लॅट्यूसवर असलेली वरच्या आवरणांची पाने काढून टाकून द्या. त्या पानांचा वापर करणे शक्य असल्यास टाळा. 
  • काही दिवसांसाठी बाजारात सोलून, कापून आणि रेडी टू कूक पद्धतीने मिळणाऱ्या भाज्यांचा वापर करणे टाळा.  
  • भाज्या अथवा फळांना धुवून आणि  कापून झाल्यावर पुन्हा तुमचे हात गरम पाण्याने स्वच्छ धुवा. 
Shutterstock

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

सुरक्षित राहायचं असेल तर घरातील 'या' गोष्टी त्वरीत करा सॅनिटाईझ

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई