हात धुण्याची योग्य आणि अचूक पद्धत तुम्हाला माहीत आहे का

हात धुण्याची योग्य आणि अचूक पद्धत तुम्हाला माहीत आहे का

सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या भितीने धुमाकूळ घातला आहे. कोरोना हा एक संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो फार झपाट्याने पसरत आहे. मात्र अगदी काही सोप्या युक्त्या वापरून या इनफेक्शनपासून स्वतःचा आणि कुटुंबियांचे संरक्षण करणे सहज शक्य आहे. मुळातच कोणत्याही इनफेक्शनपासून वाचण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे हात स्वच्छ धुणे. स्वच्छ आणि योग्य पद्धतीने हात धुणे हा कोणत्याही आजारपणापासून दूर राहण्याचा एक सोपा मार्ग आहे. यासाठीच अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हात कसे  स्वच्छ धुवावे हे माहीत असायलाच हवं. आम्ही तुमच्यासाठी या लेखात हात योग्य पद्धतीने धुण्याच्या स्टेप बाय स्टेप टिप्स शेअर करत आहोत. 

Shutterstock

निरोगी आयुष्यासाठी हात नेमके कधी धुणे गरजेचं आहे -

स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी वेळच्यावेळी हात स्वच्छ धुण्याची सवय घरातील प्रत्येकाला असायला हवी. काही गोष्टी केल्यावर हात धुणं अगदी अनिवार्य आहे.

 • स्वयंपाक करण्यापूर्वी, स्वयंपाक करताना आणि स्वयंपाक करून झाल्यावर हात धुवायलाच हवे.
 • टॉयलेटचा वापर केल्यावर प्रत्येकवेळी हात धुणे गरजेचं आहे.
 • जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर हात धुणे गरजेचं आहे.
 • घरातील  लहान मुले अथवा आजारी माणसांची काळजी घेताना प्रत्येकवेळी हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे. 
 • कापणे, जळणे, खरचटणे अशा लहानसहान जखमांवर उपचार केल्यावर हात धुणे गरजेचं आहे.
 • लहान मुलांचे डायपर चेंज केल्यावर अथवा त्यांना स्वच्छ केल्यावर हात धुणे गरजेचं आहे.
 • नाक स्वच्छ करणे, शिंक येणे अथवा खोकला आल्यावर तुमचे हात स्वच्छ करणे गरजेचं आहे.
 • घरातील पाळीव प्राण्यांना हाताळल्यावर हात धुणे गरजेचं आहे
 • पाळीव प्राण्यांना भरवण्यासाठी पेट फूडला हात लावल्यास हात धुणे गरजेचं आहे
 • कचऱ्याच्या डब्याला हात लावल्यावर हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे.
Shutterstock

स्वच्छ हात धुण्यासाठी फॉलो करा या स्टेप बाय स्टेप टिप्स

हात स्वच्छ धुणे अगदी सोपे आहे. लहानपणापासून मुलांना याबाबत माहिती दिल्यास ते स्वतःचे हात स्वतःच स्वच्छ धुवू शकतात. हात स्वच्छ आणि योग्य पद्धतीने धुणे जीवजंतूपासून स्वतःची काळजी घेण्याचा सोपा मार्ग आहे. यासाठी जाणून घ्या हात धुण्याची स्टेप बाय स्टेप योग्य पद्धत -

 • हात नळाखाली वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवा. 
 • नळ बंद करून हाताला साबण अथवा हॅंड वॉश लावा. 
 • साबण लावल्यावर हात एकमेकांवर व्यवस्थित चोळा. तळहात, हाताची मागील बाजू, दोन्ही हातांची बोटे, बोटांच्या मधील भाग, नखांच्या आतील भाग असे सर्व अवयव नीट चोळून घ्या.
 • कमीत कमी वीस सेंकद हात एकमेकांवर व्यवस्थित रगडून स्वच्छ करणं गरजेचं आहे. लहान मुलांनी यासाठी एक ते वीस आकडे मनात म्हणण्याची सवय लावावी. 
 • नळाखाली वाहत्या पाण्यात हात, बोटं आणि हाताच्या कोपरापर्यंतचा भाग स्वच्छ धुवा.
 • स्वच्छ रुमाल अथवा टॉवेलने हात स्वच्छ पुसून कोरडे करा.


बाहेर अथवा घरात वावरताना हाताचा संपर्क अनेक वस्तूंना होत असतो. ज्यामुळे हाताला धुळ, माती प्रदूषणाचा सतत प्रादूर्भाव होत असतो. खाण्या-पिण्याच्या वस्तूंना अशा प्रदूषित हाताचा संपर्क झाल्यास इनफेक्शन होण्याची शक्यता दाट असते. मात्र योग्य आणि अचूक पद्धतीने धुतल्यामुळे हातावरील धुळ, माती, प्रदूषण निघून जाते आणि हात व्यवस्थित स्वच्छ होतात. यासाठीच हात धुण्यासाठी या स्टेप्स फॉलो करणं फार गरजेचं आहे. 

 

 

Shutterstock

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा

जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

मधुमेहींनी अशी घ्यावी पायाची काळजी