मुलांचे सॉफ्ट टॉईज धुण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

मुलांचे सॉफ्ट टॉईज धुण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

लहान मुलांचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ हा खेळणी आणि सॉफ्ट टॉईजसोबत जातो. काही सॉफ्ट टॉईज तर लहान मुलं जिथे जातील तिथे सोबत घेऊन जातात. इतकी ती त्यांची आवडती असतात. मग ती आवडती डॉल असो वा आवडता टेडी. पण यामुळेही खेळणी बरेचदा लगेच खराब होतात. त्यामुळे या सॉफ्ट टॉईजमध्ये जीवाणु किंवा किटक वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे मुलांना इंफेक्शन होण्याची भीती असते. परिणामी, जर वेळीच आणि योग्य पद्धतीने मुलांचे सॉफ्ट टॉईज न धुतल्यास मुलं आजारी पडू शकतात. त्यामुळे पुढील घरगुती टिप्सचा वापर करून सॉफ्ट टॉईज धुवा.

Shutterstock

सर्वात आधी..

सर्व प्रकारच्या सॉफ्ट टॉईजवर लेबल असतं ज्यावर लिहीलेलं असतं की, ती खेळणी कशी धुवावीत. त्यामुळे सर्वात आधी सॉफ्ट टॉईजवरील केयर लेबल वाचावं. कारण प्रत्येक सॉफ्ट टॉईज तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकू शकत नाही.

मशीनमध्ये धुण्याआधी

Shutterstock

सॉफ्ट टॉईजवर बरेचदा पिन किंवा बटन असतात. त्यामुळे मशीनमध्ये सॉफ्ट टॉईज टाकण्याआधी ते काढून ठेवा. मगच ती सॉफ्ट टॉईज मॅश बॅग किंवा उशीच्या कव्हरमध्ये घालून मग ती मशीनमध्ये धुवा. ज्यामुळे ती खराब होणार नाहीत. या खेळण्यासाठी मोठा चमचा माईल्ड डिटर्जंट्स आणि अर्धा कप व्हिनेगर वापरा. ही खेळणी नेहमी थंड पाण्यानेच धुवावीत. धुतल्यानंतर हवेशीर जागी सुकण्यासाठी ठेवा. पण त्यावर धुळ बसणार नाही याची काळजी घ्या. अशाप्रकारे धुतल्यानंतर ही खेळणी तुमच्या मुलांना खेळण्यासाठी योग्य ठरतील.

हाताने धुताना

Shutterstock

जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन नसेल तर तुम्ही हातानेही ही खेळणी आरामात धुऊ शकता. सर्वात आधी कोमट पाण्यात अर्था कप लिक्वीड सोप किंवा डिटर्जंट टाका. चांगलं मिक्स करून त्यामध्ये ही खेळणी किमान 30 मिनिटं त्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे खेळण्यांवरील धूळ निघेल. नंतर दुसऱ्यांदा अर्धा बादली कोमट पाण्यात व्हिनेगर आणि डिटर्जंट टाकून पुन्हा खेळणी त्यात धुवून घ्या. नंतर सुकत ठेवा.

अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांची खेळणी धुतल्यास ती स्वच्छ राहतील आणि तुमच्या मुलांचं आरोग्यही चांगलं राहील. तुमच्याकडेही मुलांची खेळणी आणि सॉफ्ट टॉईज धुण्यासाठी काही खास टिप्स असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा. त्या आम्ही वेबसाईटवर नक्की पब्लिश करू. तुम्हाला हा लेख कसा वाटला तेही आम्हाला कळवा आणि तुम्हाला POPxoMarathi वर अजून काय वाचायला आवडेल तेही आम्हाला सांगा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.