DIY: घरी स्वतःच तयार करा असं 'होममेड हॅंड सॅनिटायझर'

DIY: घरी स्वतःच तयार करा असं 'होममेड हॅंड सॅनिटायझर'

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न् केले जातत आहेत. जगभरात यासाठी सध्या लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे.अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम संकल्पनेला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे काही दिवस सर्वांना आता घरातच राहणं गरजेचं आहे. मात्र जरी घरी राहीलं तरी धोका मात्र नक्कीच कमी झालेला नाही. घरात देखील कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना या करायलाच हव्या. या व्हायरसपासून स्वतःचा आणि कुटुंबाचे संरक्षण करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सतत हात स्वच्छ धुणे अथवा निर्जंतूक करणे. हात निर्जंतूक करण्यासाठी हॅंड सॅनिटायझरचा वापर केला जातो. मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या दहशतीमुळे मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. मेडिकल आणि शॉपिंग सेंटरमधील हॅंड सॅनिटायझर्स कधीच संपले आहेत. अचानक वाढलेली मागणी आणि त्यामानाने पुरवठा कमी झाल्यामुळे हा तुटवडा जाणवत आहे, म्हणूनच यावर उपाय म्हणून घरीच तुम्ही तुमच्या घरातील वापरासाठी स्वतःचे हॅंड सॅनिटायझर तयार करू शकता. शिवाय यासाठी लागणारे साहित्य अगदी सहज उपलब्ध होणारे आहे.

Instagram

होममेड हॅंड सॅनिटायझरसाठी लागणारे साहित्य -

  • रबिंग अल्कोहोल अथवा आयसोप्रोपिल अल्कोहोल
  • कोरफडीचा गर अथवा ग्लिसरीन
  • ट्री ट्री ऑईल अथवा लव्हेंडर ऑईल
  • ड्रॉपर
  • एक काचेचे भांडे
  • चमचा
  • स्प्रे बॉटल 

अधिक माहितीसाठी popxobeauty चा हा व्हिडिओ नक्की पाहा -

होममेड हॅंट सॅनिटायझर करण्याची कृती

घरीच हॅंड सॅनिटायझर तयार करण्यासाठी फॉलो करा या स्टेप बाय स्टेप टिप्स्

स्टेप 1 -

एका काचेच्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे रबिंग अल्कोहोल अथवा आयसोप्रोपिल अल्कोहोल घ्या. 

स्टेप 2 

या मिश्रणात दोन ते तीन चमचे कोरफडाचा रस अथवा ग्लिसरिन मिसळा

स्टेप 3 -

मिश्रण एकजीव करा आणि त्यात ट्री ट्री ऑईल अथवा लव्हेंडर तेलाचे पाच ते पंधरा थेंब मिसळा. तुमचे हॅंड सॅनिटायझर तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात सुंगधासाठी तेलाचा वापर जास्त अथवा कमी करू शकता. 

स्टेप 4 -

ड्रॉपरच्या मदतीने तुम्ही हे मिश्रण एका स्वच्छ आणि निर्जंतूक स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. वापर करण्यापूर्वी स्प्रे बॉटल व्यवस्थित हलवून घ्या ज्यामुळे मिश्रण पुन्हा एकजीव होईल. 


हे मिश्रण बाजारातून विकत घेतलेल्या कोणत्याही हॅंड सॅनिटायझरप्रमाणे परिणाम कारक असून त्यामुळे तुमचे हात नक्कीच निर्जंतूक होतात. शिवाय यात कोरफडाचा गर अथवा ग्लिसरीनचा वापर करण्यात आलेला असल्यामुळे तुमचे हात अती प्रमाणात कोरडे अथवा चिकटदेखील होत नाहीत. 

सूचना - हे सॅनिटायझर उत्तम असलं तरी हात स्वच्छ धुण्याला पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे स्वयंपाक, जेवण, अभ्यास, ऑफिसचे काम, शौचविधी असे कोणतेही काम केल्यावर हात वीस सेंकद आणि स्वच्छ धुवा आणि मगच सॅनिटायझरने निर्जंतूक करा. शिवाय यात अल्प अंशामध्ये अल्कोहोलचा वापर केलेला असल्याने ज्वलंत गोष्टींना हाताळताना सॅनिटायझरचा वापर करणे टाळा. 

सध्याचा काळ हा सर्वांसाठीच परिक्षेचा आहे. अशामध्ये हॅंड सॅनिटायझर अथवा निर्जंतूक करणाऱ्या गोष्टींचा तुटवडा भासणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही जनसेवा करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या गरजू आणि निराधार लोकांना असं हॅंड सॅनिटयझर तयार करून देऊ शकता. त्याचप्रमाणे त्यांना हवी औषधे आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचादेखील पूरवठा करा. सोसायटीमधील वृद्ध अथवा निराधार लोकांसाठी अशी विनामुल्य सेवा दिल्यास तुम्हाला त्यांचे आर्शीवाद नक्कीच मिळतील. 

 

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -