होळी आणि धुलिवंदन या दोन्ही दिवसांचे महत्व आहे वेगळे, जाणून घ्या इतिहास

होळी आणि धुलिवंदन या दोन्ही दिवसांचे महत्व आहे वेगळे, जाणून घ्या इतिहास

होळीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे धुळवड, धुलिवंदन असे म्हटले जाते. सगळीकडे ‘बुरा न मानो होली है’ म्हणत रंग उडवत असले तरी आपण होळी आणि धुलिवंदन असे दोन वेगळे दिवस वेगळ्या पद्धतीने साजरे करतो. होळीच्या दिवशी होलिकादहन केले जाते. रंगपंचमीच्या दिवशी रंगाची उधळण. जाणून घेऊया होळी आणि रंगपंचमी या दोन दिवसांचे महत्व, इतिहास आणि आख्यायिका.

होळीचा सण साजरा करण्यासाठी करा हे स्पेशल 'खाद्यपदार्थ'

होळी साजरी करण्यामागे ही आहेत कारणं

Instagram

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. देशभरात होळी अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होळी साजरी करण्याची प्रत्येक राज्याची पद्धत ही वेगवेगळी असली तरी त्यामागील उद्देश्य हा एकच आहे. वाईट विचार, दृष्ट प्रवृत्ती यांचा नाश करण्यासाठी होलिका दहन केले जाते. होलिका दहनानंतर वातावरण शुद्ध होते असे म्हटले जाते. काहीजण ठिकाणी अंगाला शेण, चिखल लावून ही होळी साजरी केली जाते. 

होळी हा सण अनेक नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात याला ‘शिमगा’, ‘हुताशनी’ दक्षिणेत ‘कामदहन’,  बंगालमध्ये ‘दौलयात्रा’, उत्तरेत याला ‘दोलायात्रा’ असे देखील म्हटले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होळी या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. 

होळीला बोंब मारण्याचीदेखील परंपरा आहे. या मागेही शास्त्र दडलेले आहे.  मनातील दृष्ट प्रवृत्ती शमवण्यासाठी ही बोंब मारली जाते. होळीच्या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. या नक्षत्राची देवता भग आहे. या भगाच्या नावाने बोंब ठोकणे ही परंपरा आहे. बोंब मारणे हा देवतेचा सन्मानच समजावा. 

होळीच्या रंगाचे डाग कसे काढायचे, सोपी पद्धत

 

होळी संदर्भातील आख्यायिका

Instagram

होळी संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी काही आख्यायिका तुम्हाला माहीत असतील तर काही तुमच्यासाठी नव्या असतील. जाणून घेऊया अशाच काही आख्यायिका 

आख्यायिका 1 

हिरण्यकश्यपू या दैत्याचा मुलगा म्हणजे प्रल्हाद. तो नारायण भक्त होता. हिरण्यकश्यपूला हे अजिबा आवडत नव्हते. त्याने त्याच्या मुलाला मारायचे ठरवले. त्यासाठी आपल्या बहिणीलाच पाठवले. तिचे नाव होलिका. ती क्रूर होती. तिने प्रल्हादला मारण्यासाठी अग्निकुंड तयार केले. त्यात तिला प्रल्हादला भस्म करायचे होते. पण त्या आगीत तिच खास झाली. यानंतर होलिकादहनाला प्रारंभ झाला. 

आख्यायिका 2 

पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरुन लहान मुलांना त्रास द्यायचे. रोगांची निर्मिती करायचे. त्याला गावाबाहेर हाकलून देण्यासाठी खूप प्रयत्न केले पण हे राक्षस काही जाईना. त्यावेळी नारदमुनींनी युधिष्ठीराला उपाय सांगितला. त्यानुसार लाकडं एकत्र करुन होलिका पेटवावी. त्याला प्रदक्षिणा घालून आपली इच्छा व्यक्त करावी. अत्यंत आनंदात लोकांनी आपल्या इच्छा मागाव्यात त्यामुळे ही राक्षस क्षीण होईल. त्यानुसार हा दिवस साजरा केला जातो. 

आख्यायिका 3

 होळीबद्दल दुसरी एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे एकदा भगवान शंकर तपश्चर्या करत होते. ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंत: करणात प्रवेश केला. मला कोण चंचल करत आहे, असे म्हणत शंकराने जेव्हा डोळे उघडले त्यावेळी त्यांना समोर मदनाला पाहून त्यांनी त्याला त्याची क्षणी भस्म केले. म्हणूनच दक्षिणेकडे लोक कामदेव दहन करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करुन तिचे दहन केले जाते. मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे, म्हणून होळीचा उत्सव आहे. 

रंगपंचमी साजरा करण्यामागील कारण

Instagram

रंगपंचमी हा सण होळीपासून पाचव्या साजरा केला जातो. जाणून घ्या रंगपंचमीचे वेगवेगळे माहिती आणि तसा साजरा करा. अनेक गावांमध्ये आजही होळीनंतर पाचव्या दिवशी रंगाने खेळण्याची पद्धत आहे.  रंगाची उधळण करुन हा सण साजरा केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा दाह कमी व्हावा म्हणून हा सण साजरा करण्याची ही पद्धत आहे. 

 धुळवड साजरा करण्यामागेही एक पुराणात काही कथा सांगितल्या जातात, असे म्हणतात की, द्वापारयुगात गोकुळात आपल्या  गोपाळ संवंगड्यांवर पिचकारीने रंग उडवत व उन्हाची लाही कमी करत असत. तीच प्रथा आजही सुरु आहे. पूर्वी रंगाची उधळण केली तरी ते रंग नैसर्गिक असत. पण आता हे रंग केमिकलयुक्त असतात. आताचे याचे स्वरुपही वेगळे आहेत. 

 त्यामुळे उन्हाची लाही कमी करणे आणि वसंतोत्सव साजरा करणे हे यामागील कारण आहे.

त्यामुळे होळी आणि धुलिवंदन हे दोन दिवस पौराणिक दृष्टया वेगळे कसे आहेत हे तुम्हाला कळले असेलच.

देखील वाचा -
होली की हार्दिक शुभकामनाएं और संदेश

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.