ADVERTISEMENT
home / Recipes
कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

सकाळी रोज नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांना नेहमी सतावतो.  इडली, डोसा, उपमा, पोहे हा आता नेहमीचा नाश्ता झालाय. पण यातूनही काही वेगळा नाश्ता हवा असेल पण वेळ कमी असेल तर तुम्हाला एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे झटपट बनणाऱ्या कुरकुरीत रवा डोशाचा. खरं तर रव्यापासून अनेक पदार्थ तयार होतात. पण रवा डोसा हा पटकन तयार होणारा  पदार्थ आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की रवा डोसा झटपट कसा काय तयार होईल? पण हा डोसा अगदी दहा मिनिट्समध्ये तयार होतो आणि तोदेखील कुरकुरीत. तुम्हीसुद्धा सकाळच्या घाईत हा डोसा नक्की करून पाहू शकता. आम्ही तुम्हाला या डोशासाठी काय साहित्य लागणार आहे आणि त्याची नक्की कृती काय असणार आहे ते या लेखातून सांगत आहोत. तुम्हाला हा रवा डोसा खायलाही मस्त लागतो आणि करायलाही जास्त त्रास होत नाही. त्याशिवाय तुम्ही जर हॉटेलमध्ये जाऊन या रवा डोशासाठी 100 रुपये मोजत असाल तर त्याचीही आता गरज नाही. कारण तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने हा रवा डोसा बनवता येतो. चला तर जाणून घेऊया काय आहे याची रेसिपी. 

सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय

रवा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 

  • 1 कप बारीक रवा 
  • 2 ½ कप पाणी 
  • 2 चमचे तांदळाचे पीठ 
  • चवीनुसार मीठ 
  • कोथिंबीर
  • दही अथवा लिंबाचा रस 
  • हिरव्या मिरचीचे तुकडे
  • हवे असल्यास, जिरे
  • बटर 
  • तेल 

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

रवा डोसा बनविण्याची कृती

 

रवा डोसा बनविण्यासाठी तुम्हाला जास्त काहीही करावे लागत नाही. एका बाऊलमध्ये बारीक रवा घ्या.  त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. त्यात पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर चिरून घाला. दही अथवा लिंबाचा रस जे काही तुम्ही घेतले असेल ते मिक्स करा. मात्र दही अथवा लिंबाचा रस दोन लहान चमच्यांपेक्षा अधिक घालू नका. मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे हे सर्व त्यात मिक्स करून व्यवस्थित ढवळा. रवा पटकन तळाशी बसतो.  त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. 

ADVERTISEMENT

पॅन गरम करा. डोसा करताना नेहमी काठ नसलेला पॅन वापरावा.  जेणेकरून डोसा काढणे सहज शक्य होते. मंद आचेवर गॅस ठेवा. अन्यथा डोसा जळण्याची शक्यता असते. बॅटर पॅनवर टाकण्यापूर्वी ढवळून मगच टाकावे. हे बॅटर बऱ्यापैकी पातळसर असायला हवे. तरच त्याला व्यवस्थित जाळी येईल आणि पॅनवरूनही पटकन उकटेल. पॅनवर आधी तेल लावा आणि मग हे बॅटर टाका. ते टाकल्यानंतर व्यवस्थित शिजू द्या. डोशाची वरची बाजू परवायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा. खाली डोसा ब्राऊन व्हायला लागल्यानंतर तो व्यवस्थित उकटत आहे की नाही हे एकदा पाहा. बाजूने तेल आणि बटर सोडा. त्यामुळे त्याला मस्त कुरकुरीतपणा येईल. हा व्यवस्थित शिजला की, चटणी अथवा सॉसबरोबर कुरकुरीत डोसा खायला द्या.  

यासाठी रवा भाजून घेण्याचीही  अजिबात गरज नाही. तुम्हाला एकदा सवय झाली की,  तुम्ही हा रवा डोसा अगदी पटापट करू शकता. सकाळच्या घाईगडबडीमध्ये वेळही वाचतो आणि एक वेगळा नाश्ताही मिळतो. मग आता वाट कसली बघताय. चला पटकन करून बघा कुरकुरीत रवा डोसा!

विशेष टीप – डोसा पॅनवर घातल्यानंतर वरून झाकण ठेवायला विसरू नका.  म्हणजे दोन्ही बाजूने रवा व्यवस्थित शिजतो. 

घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

20 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT