ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
कोकणात सणांना हमखास बनवले जातात हे स्वादिष्ट गोड पदार्थ

कोकणात सणांना हमखास बनवले जातात हे स्वादिष्ट गोड पदार्थ

कोकणातील काही पदार्थांची चव ही नेहमीच खास असते म्हणा. काही सण असेल तर कोकणात वेगळ्या पद्धतीचे गोड पदार्थ बनवले जातात. हल्ली मिठाईची दुकाने सगळीकडे जरी असली तरी काही सणांना पारंपरिक पदार्थ खाण्याची चव ही वेगळीच असते. तुम्ही कोकणातले असाल किंवा कोकणातले जेवण तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला कोकणात बनवले जाणारे काही पदार्थ नक्कीच खायला आवडत असतील.जाणून घेऊया कोकणातील काही खास गोड पदार्थ. 

होळी सणाची माहिती आणि होळी स्पेशल ‘खाद्यपदार्थ’ (Holi Information In Marathi)

सातकापी घावण

सात कापी घावण

Instagram

ADVERTISEMENT

तांदूळाच्या पीठापासून तयार केले जाणारे घावण अनेकांच्या आवडीचे आहेत. खास भिड्याच्या तव्यावर जाळीदार घावण सोडले जातात. भाकरीच्या पिठापेक्षा थोडे जाडसर पीठ यासाठी वापरले जाते. पाण्यात अगदी पातळसर कालवून ते भिड्यावर सोडतात पण ते सोडताना त्याची छान जाळी पडावी म्हणून भिड्याला तेल लावतात. अगदी काहीच मिनिटांत तयार होणारा हा झटपट प्रकार आजही अनेक घरांमध्ये चटणीसोबत खायला दिला जातो. आता तांदूळाचे उत्पन्न जास्त असल्यामुळे प्रत्येक घरात तांदूळाचे घावण आलेच. पण सोबत नारळही खूप असल्यामुळे या पासून एक छान गोडाचा प्रकार बनवला जातो. तो म्हणजे ‘सात कापी घावण’. नारळ खवून ज्या पद्धतीने मोदकाचे सारण बनवले जाते. तसे गुळ- खोबरं- वेलदोडे घालून सारण बनवले जाते. तयार घावणावर हे सारण पसरवले जाते. या घावणाचे आणि सारणाचे थर रचले जातात. हे साधारण सात थर असतात म्हणून त्याला सातकापी घावण/ सातकप्पी घावण असेही याला म्हटले जाते. 

शिरवळ्या आणि नारळाचा रस

हल्ली हा प्रकार कोकणात फारच कमी केला जातो. कारण हा पदार्थ करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.  तांदूळ आणि नारळापासून तयार करण्यात आलेला हा प्रकार तुम्ही कधीच खावून पाहिला नसेल तर तो खावून पाहा. तांदूळाचे पीठ विशिष्ट पद्धतीने उकडून पारंपरिक शेवयांच्या भांड्यांमधून शेवया काढल्या जातात. या शेवया काढण्याची पद्धत जमली तरच या शेवया नरम नरम होतात. त्याच्यासोबत नारळाचा रस्सा खाण्यासाठी दिला जातो. नारळाचे दूध काढण्यासाठी  खवलेला नारळ, थोडसं भाजलेलं जिरं, वाटले जाते. त्यात रंगासाठी थोडीशी हळद घातली जाते. वाटलेल्या नारळातून रस काढला जातो. त्यामध्ये चवीनुसार गूळ घातले जाते आणि नारळाचे दूध मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवले जाते. गुळ वितळले की हा नारळाचा रस तयार होतो. हा रस आणि शिरवळ्या म्हणजेच गरम गरम शेवया दिल्या जातात. 

गूळ पोहे

गूळ पोहे

ADVERTISEMENT

Instagram

गूळ पोह्यांबद्दल आपण या आधीही बोललो आहेच. कोकणात प्रत्येक घरात अगदी आवर्जून हा पदार्थ केला जातो. करायला अगदी सोपा आणि चविष्ट असा पदार्थ आहे. गावी मिळणारे पोहे, त्यामध्ये किसलेले गूळ, खवलेलं ओलं खोबरं घालून हा पदार्थ  खायला दिला जातो. कोणतीही फोडणी न देता किंवा गॅसचा वापर न करता हा पदार्थ केला जातो. त्यामुळे करायला झटपट असा हा पदार्थ आहे. फक्त तुम्हाला यासाठी खास लाल पोहे हवे. जे हल्ली अनेक दुकानांमध्ये तुम्हाला मिळतात. 

महाराष्ट्रीयन थाळीमध्ये हे पदार्थ करा समाविष्ट (Maharashtrian Thali Menu In Marathi)

पातोळ्या

हळदीच्या पानातील पातोळ्या

ADVERTISEMENT

Instagram

हळदीच्या पानात बनवल्या जाणाऱ्या पातोळ्या कोकण वगळताही अनेकांच्या आवडीच्या आहेत. मोदकाचेच एक वेगळे व्हर्जन म्हणायला या रेसिपीला काहीच हरकत नाही. तांदूळाचे पीठ भागवून ते चांगले मळले जाते. हळदीच्या पानांवर ते थापले जाते. त्यावर मोदकासारखे सारण मधोमध भरुन करंजीप्रमाणे ते दुमडले जाते. त्यानंतर त्या उकडीच्या मोदकाप्रमाणे उकडल्या जातात. हळदीच्या पानांचा स्वाद पातोळ्यांमध्ये उतरल्यामुळे ते अधिक चविष्ट लागतात. नागपंचमी, गणपतीच्या दिवसांमध्ये हा पदार्थ केला जातो.

काकडीचे धोंडस

काकडीपासून तयार केलेले धोंडस

Instagram

ADVERTISEMENT

काकडीचे धोंडस हा प्रकारही तुम्ही आतापर्यंत नक्कीच ऐकला असेल. यालाच काही जण टोपातलं असं म्हणतात. एक प्रकारे पाहायला गेलं तर हा केकचाच प्रकार. पण कोकणातला पौष्टिक केक बरं का. यामध्ये मुख्य चव असते ती म्हणजे काकडीची.काकडी,गूळ, खोबरं,तांदूळाचा रवा( तांदूळ भिजत घालून ते कोरडे करुन वाटले जातात.) एका भांड्यात  सगळे साहित्य करुन हे सगळं शिजवलं जातं. हे धोंडस टोपाचा आकार घेते. त्याचे काप काढून ते खाल्ले जाते.

कोकणात खाजा म्हणून ओळखला जाणारा पदार्थ म्हणजेच बालुशाहीची रेसिपी सुद्धा सोपी आहे.  जर या पदार्थांविषयी ऐकून तुम्हाला ते खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्हाला युट्युबवर याच्या रेसिपी मिळू शकतील.

 

 

ADVERTISEMENT
09 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT