सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. त्यातल्या त्यात जर त्वचा सुंदर असेल तर आपल्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो. त्वचेच्या बाबतीत कोरिअन मुली या फारच नशीबवान असतात. कारण त्यांची त्वचा छान नितळ असते. पण ही नितळ त्वचा कायम चांगली राहावी यासाठी कोरिअन मुलींचे खास स्किनकेअर रुटीन असते जे फारच सोपे आहे. तुम्हालाही त्या मुलींसारखी त्वचा हवी असेल तर तुम्ही त्यांच्यासारखे स्किनकेअर रुटीन नक्की ट्राय करा.
तुमच्या त्वचेचे पोअर्स स्वच्छ असणे फारच गरजेचे असते. कोरिअन स्किन केअरमधील हा पहिलाच प्रकार सगळ्यात महत्वाचा आणि सोपा आहे. टर्किश टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो छान पिळून घ्या. चेहऱ्यावर टॉवेल ठेवा. गरम पाण्यामुळे पोअर्स उघडतात. तुमच्या पोअर्समध्ये अडकलेली घाण बाहेर पडते. शिवाय तुमची त्वचा रिलॅक्स होते. तुमचा थकवा कमी झाल्यामुळे तुम्ही आपोआप फ्रेश होता. घरी आल्यानंतर तुम्हाला हे करायला हरकत नाही. हे करुन झाल्यानंतर तुम्ही तुमचे पोअर्स बंद करायला विसरु नका.
कोरिअन त्यांच्या त्वचेबाबत फारच जागरुक असतात ते त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वापरतात. पण तितकेच ते नैसर्गिक उपचार पद्धतींवर विश्वास ठेवतात. तांदूळ हे असे धान्य आहे जे त्यांच्याकडेही अगदी सहज उपलब्ध आहे. तांदूळाचे त्वचेवर अनेक चांगले परिणाम दिसून येतात. कोरिअन मुली त्यांचा चेहरा धुण्यासाठी तांदूळाच्या पाण्याचा उपयोग करतात. तांदूळ शिजवल्यानंतर जे पाणी काढून टाकतो. ते पाणी थंड करुन ते चेहरा धुण्यासाठी वापरतात. तांदूळामध्ये नैसर्गिक मॉश्चरायझर असते. जे तुमच्या चेहऱ्याला तजेला देते. तांदूळामध्ये अँटीएजिंग गुणधर्म असतात.ज्यामुळे तुमची त्वचा लवकर सैल पडत नाहीत. तुमच्या त्वचेला सुरकुत्या येत नाहीत.
कोरिअन स्किनकेअरमध्ये डबल क्लिन्झिंग ही पद्धत फारच महत्वाची आहे. कारण त्यामुळेच त्यांची त्वचा अधिक काळासाठी चांगली राहते. डबल क्लिन्झिंग पद्धतीनुसार तुम्हाला आध कोणत्याही ऑईल बेस मेकअप क्लिनझरने तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला चांगल्या फोम क्लिनझरने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा असतो. यामुळे चेहरा अधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छ होतो. तुमच्या पोअर्समधील सगळी घाण निघून जाते.
केसांचा वॉल्युम वाढवतील या हेअर ट्रिटमेंट्स, जाणून घ्या या ट्रिटमेंट्स
चेहरा चांगल्या ठेवण्यासाठी आणखी एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे फेस मास्क. हल्ली बाजारात शीट मास्क सहज मिळतात. पण तुम्ही घरच्या घरी असे मास्क बनवू शकता. तुम्ही नुसते मास्क आणून त्यावर फेस सीरम लावून तुमच्या चेहऱ्यावर ठेवू शकता. या मास्कमुळे तुमच्या त्वचेतील कोलॅजन वाढण्यास मदत मिळते. तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते.
तुम्हालाही कोरिअन मुलींसारखी नितळ त्वचा हवी असेल तर तुम्ही हे सोपे उपाय करुन पाहू शकता.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.