प्रसिद्धीसाठीच केले आरोप - सना खानची ऑडिओ क्लीप झाली लीक

प्रसिद्धीसाठीच केले आरोप - सना खानची ऑडिओ क्लीप झाली लीक

अभिनेत्री सना खान आणि मेल्विन लुईसच्या ब्रेकअपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.  कारण ब्रेकअप झाल्यापासून सना खानने मेल्विनवर अनेक आरोप लावले. मेल्विनने फसवणूक केली असून तो अजिबात चांगला नाही असंही सना खानने म्हटलं. त्याने आपला विश्वासघात केला असून त्याचे अनेक मुलींबरोबर घनिष्ठ संबंध होते असाही आरोप सना खानने केला. इतकंच नाही तर त्याने अनेकांना फसवलं असल्याचे मेसेजही तिने व्हायरल केले होते. पण या सगळ्यावर लुईस जास्त काहीच बोलला नव्हता.  आता मात्र मेल्विन लुईसने हे सगळे आरोप सनाने प्रसिद्धीसाठीच केले असल्याची क्लिप पोस्ट केली आहे. त्यामधून तिने हे केवळ प्रसिद्धीसाठीच केले असल्याचेही त्याने सिद्ध केले आहे. 

प्रेमात असूनही लग्न करु शकल्या नाहीत या सेलिब्रिटी जोड्या

सनाने केले मान्य

मेल्विन लुईसने  सना आणि त्याच्यामध्ये झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. मेल्विनवर सनाने बरेच आरोप केले होते. तसेच ब्रेकअपचे प्रकरण हे केवळ प्रसिद्धीसाठीच तिने ताणले होते हे त्या क्लिपमध्ये तिने बोलताना मान्य केले आहे. ही ऑडिओ क्लिप फोनवर मेल्विन आणि सना यांच्यामध्ये झालेल्या खासगी संभाषणाची आहे. काही दिवसांपूर्वीच सनाने मेल्विनवर आरोप केले. इतकंच नाही तर एका पत्रकार परिषदेमध्ये सना रडलीही होती. यानंतर बऱ्याच जणांनी मेल्विनला खोटे ठरवले. त्याला अनेक जणांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. पण मेल्विन त्यानंंतरही आपलं काम करत राहिला. 

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी झळकणार वेबसीरिजमध्ये

मेल्विनने पहिल्यांदाच सनाला खडे बोल सुनावले

मेल्विनने ही क्लीप पोस्ट करत लिहिले, ‘तू माझी खिल्ली उडवलीस, तू माझ्यावर वर्णभेदाचे आरोप केलेस, माझ्या कुटुंबाचीही खिल्ली उडवलीस, माझ्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तींवरही तू आरोप केलेस, तू तुझ्या दृष्टीने योग्यच केलंस. आशा आहे आता तुला प्रसिद्धी मिळवून खूपच आनंद मिळाला असेल.’ असे कॅप्शन देत त्याने पुढे काही हॅशटॅग वापरले ज्यामध्ये पुरूषही बळी पडू शकतात, अपराधी असल्याची अजिबातच भावना नाही आणि #BulaatiHaiMagarJaaneKaNahi असे लिहिले आहे. याआधीदेखील त्याने बुलाती है मगर जाने का नही यावर एक डान्स करून आपला विरोध दर्शवला होता. पण त्याने कोणतेही प्रत्यारोप सना खानवर केले नाहीत. त्याने याच पोस्टमध्ये खाली लिहिले की, विशेष आभार - त्या व्यक्तींचे ज्यांनी या सगळ्यावर अजिबातच स्वतःचे मत लगेच प्रदर्शित केले नाही आणि कोणत्याही निष्कर्षावर पोहचले नाहीत. मला तुमची नावं लक्षात आहेत आणि मी तुमचा आदर करतो. बाहेरच्या कव्हरवरून पुस्तकाची परीक्षा न केल्याबद्धल आभार.’ आता बास जास्त ड्रामा नको आणि पूर्ण ऑडिओ ऐकाल तर तुम्हीही पडाल असे दोन हॅशटॅगही त्याने याबरोबर जोडले आहेत. 

डान्सर मेलविन लुईससोबत सना खानने या कारणामुळे केलं ब्रेकअप

सना खानने दिल्या अनेक मुलाखती

सना खानने ब्रेकअप नंतर अनेक मुलाखती दिल्या आणि अशा प्रकारे समोर येण्यासाठी हिंमत लागते असंही तिने बऱ्याच ठिकाणी सांगितलं. तसंच मी तर फसले पण इतर कोणी फसू नये यासाठी आपण हे पाऊल उचललं असल्याचंही तिने म्हटलं. ‘पहिल्यांदाच आमच्या नात्याविषयी इतकं मोकळेपणाने बोलत असून जवळपास वर्षभरापूर्वीच त्याचा चेहरा माझ्यासमोर आला. नात्यात असतानाही त्याचे अनेक मुलींशी संंबंध होते. माझे दुर्दैव की,  मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केले’ असा आरोप सनाने मेल्विनवर केला होता. ही पोस्ट तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आणि अनेक पुरावेही पोस्ट केले होते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.