उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या बऱ्याचशा सरबतांमध्ये अथवा खाण्यामध्ये पुदीन्याचा वापर करण्यात येतो. पुदीन्याच्या ताजेपणाने या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला चांगला थंडाईचा फील देतो. काही जण तर चहामध्येही पुदीन्याचा उपयोग करतात. पुदीन्याची पानं ही पचनक्रियेसाठी उपयुक्त असून तोंडाला येणाऱ्या खराब दुर्गंधीपासूनही सुटका मिळवून देतात. पण याचा उपयोग चेहऱ्यासाठी केला गेला तर यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होते. पुदीन्यामध्ये मेन्थॉलचं प्रमाण असतं आणि यामध्ये जीवाणूरोधी गुणदेखील असतात. असे अनेक प्रकारे पुदीन्याच्या वापराचे फायदे आहेत. मुख्यतः उन्हाळ्यात त्वचेसंबंधी अधिक समस्या निर्माण होत असतात. चेहऱ्यावर जास्त मुरूमं येणे, अॅक्ने, सनबर्न, रेडनेस अथवा रॅश येणे याचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसात वाढलेले दिसून येते. या सगळ्यापासून सुटका मिळविण्यासाठी आपण त्वचेसाठी पुदीन्याचा उपयोग करून घेऊ शकतो. पण हा उपयोग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्वचेसाठी पुदीन्याचे तुम्ही वेगवेगळे फेसपॅक तयार करून त्याचा वापर करू शकता. तुम्ही हे फेसपॅक घरच्या घरी तयार करू शकता. ते कसे करायचे हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.  

1. पुदीना आणि काकडीचा फेसपॅक (Mint leaves and Cucumber Face Pack)

Shutterstock

पुदीना आणि काकडी या दोन्ही गोष्टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. याचा फेसपॅक बनवणंही अत्यंत सोपं आहे. यातील अँटिऑक्सिडंट्सच्या गुणधर्मामुळे चेहऱ्याच्या त्वचेला अधिक फायदा मिळतो. 

 • पुदीन्याची ताजी पाने घ्या
 • त्यामध्ये काकडीचे तुकडे आणि मध घालून एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या
 • ही पेस्ट तुम्ही 15 मिनिट्स स्वतःच्या चेहऱ्यावर लावा 
 • नंतर थंंड पाण्याने चेहरा धुवा.  तुम्हाला परिणाम दिसून येईल

2. पुदीना आणि मुलतानी मातीचा फेसपॅक (Mint leaves and Multani Mitti)

Shutterstock

मुलतानी माती चेहऱ्यासाठी खूपच परिणामकारक मानली जाते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी पुदीन्याच्या पानाबरोबर तुम्ही याचा वापर करू शकता. 

 • पुदीन्याची काही ताजी पाने घ्या
 • त्यामध्ये मुलतानी माती, मध आणि दही मिक्स करा
 • ही पेस्ट व्यवस्थित फेटून तयार करा आणि मग चेहऱ्याला साधारण 20 मिनिट्स लावा
 • त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा

वाचा - वापरा मुलतानी माती फेसपॅक आणि मिळवा 2 दिवसात चेहऱ्यावर चमक

3. पुदीना आणि गुलाबपाणी फेसमास्क (Mint leaves and Rose Water face mask)

Shutterstock

त्वचेचा पीएच लेव्हल समान करण्यासाठी आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात आणण्यासाठी गुलाबपाण्याचा उपयोग केला जातो. यामध्ये पुदीन्याचाही तुम्हाला चांगला उपयोग करून घेता येतो.

 • पुदीन्याची काही पाने घ्या
 • त्यामध्ये गुलाबपाणी आणि मध एकत्र मिक्स करा
 • हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि मग चेहऱ्याला साधारण 20 मिनिट्स लावा
 • त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला  तुमचा चेहरा अधिक स्वच्छ आणि मऊ मुलायम झालेला दिसून येईल

4. पुदीना आणि हळदीचा फेस पॅक (Mint leaves and turmeric face mask)

Shutterstock

हळदी आणि पुदीन्याचा फेस पॅक लावून अॅक्ने आणि मुरूमं तुम्ही घालवू शकता. यामध्ये असणारे अँटिबायोटिक हे आपल्या त्वचेवर अधिक चांगला परिणाम करते आणि चेहऱ्यावरील मुरूमं घालवून चेहरा स्वच्छ करायला मदत मिळते. 

 • हळदीच्या पावडरमध्ये पुदीन्याची काही ताजी पाने मिक्स करा
 • पाण्याचा थोडा वापर करून हे मिक्सरमधून वाटून घ्या
 • ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला साधारण 15 मिनिट्स लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा

हिरव्यागार पुदीनाचे आश्चर्यकारक फायदे - Mint (Pudina) Benefits In Marathi

5. पुदीना, ओट्स आणि काकडीचा फेसस्क्रब (Mint leaves, Oats and Cucumber Face Scrub)

Shutterstock

तुमच्या त्वचेवर जर धूळ आणि तेल जमलं असेल तर तुम्ही हा स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता. तुम्हाला अशावेळी चेहरा स्वच्छ करण्याची आणि हायड्रेटिंगची गरज असते. 

 • पुदीन्याची पाने, ओट्स, काकडीचे लहान तुकडे, मध आणि दूध हे एकत्र करा
 • हे सर्व तुम्ही मिक्सरमधून वाटून घ्या
 • त्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय करताना हळूहळू लावा
 • चेहरा नंतर थंड पाण्याने धुवा

त्वचेवर पुदीना वापरण्याचे कोणतेही साईड इफेक्टस नाहीत. पण ज्या व्यक्तींची त्वचा अति संवेदनशील असते त्यांनी आपल्या त्वचेवर पुदीना वापरण्याआधी नक्की डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्यावा. 

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.