आपल्यापैकी अनेकांना पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असते. पायावर पाय ठेवून बसल्यानंतर तुम्ही फार आत्मविश्वासाने बसला आहात असे वाटते. बसण्याची ही पद्धत आदर्श पद्धतीमध्ये येते. पण जर तुम्ही असे जास्त काळासाठी बसत असाल तर तुम्हाला आरोग्याशी निगडीत काही गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. कारण पायावर पाय ठेवून तुम्ही जास्त काळासाठी बसलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. नेमका तुमच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होतो ते आज आपण जाणून घेऊया.
असे म्हणतात पायावर पाय ठेवून जास्त काळ बसल्यामुळे तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो असे म्हटले जाते. पण हा त्रास खरचं होतो की नाही यावर डॉक्टरांचे म्हणणे वेगवेगळे आहे. काही डॉक्टरांनी केलेल्या अभ्यानुसार ज्यावेळी तुम्ही पायावर पाय ठेवून जास्त वेळ बसता त्यावेळी तुमचे ब्लड प्रेशर वाढते. हे ब्लड प्रेशर फक्त तेवढ्या काळापुरतेच वाढते. त्यानंतर मात्र तुम्ही पूर्ववत होता. तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. त्यामुळे हा काळ फक्त तात्पुरत्या काळासाठी असतो. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची फार गरज नाही.
पायावर पाय ठेवून बसल्यामुळे तुमच्या पायांचा नसा दबतात असे देखील म्हटले जाते. पण यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पायावर पाय ठेवून बसल्यामुळे तुम्ही एका विशिष्ट पद्धतीत बसता हे खरे असले तरी तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. पायाच्या नसा काही काळासाठी दबल्या जात असतील पण त्याचा त्रास तुम्हाला जास्त काळासाठी होणार नाहीत. पण कोणत्याही अभ्यासातून अशाप्रकारे त्रास होतो हे सिद्ध झांले नाही. त्यामुळे हा त्रासही तुम्हाला झाला तरी तो क्षणिक असतो.
पायावर पाय ठेवून बसण्याचे फार गंभीर त्रास नाहीत. पण असे काही त्रास आहेत ज्याचा त्रास तुम्हाला काही काळासाठी जाणवू शकतो. पायाला मुंग्या येण्याचा त्रास होऊ शकतो. पायाला मुंग्या आल्यानंतर काही काळ आपल्याला चालताना आपल्याला त्रास होतो
एकाच जागी आपण सतत बसलो किंवा उभे राहिलो की आपल्याला त्रास होतोच. जर तुम्ही पायांवर पाय ठेवून बसलात की तुम्हाला हा त्रास जास्त जाणवतो. तुमचा पाय काही वेळासाठी दुखू लागतो. जर तुम्ही पाय जास्तवेळ पायावर पाय ठेवाल तर तुमचा पाय सुन्न पडू शकतो. पायावर लाल चट्टे उमटू शकतात.
जर तुम्हाला असे बसण्याची सवय असेल तर तुम्ही तुमच्या या सवयीमध्ये थोडासा बदल करा. म्हणजे सतत पाय पायावर ठेवून बसण्यापेक्षा तुम्ही पाय बदलत राहा. साधारण 15 मिनिटांनी तुम्ही हा पाय खाली घ्या. म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.
आता बिनधास्त पायावर पाय ठेवून बसा कारण तुम्हाला त्याचा त्रास मुळीच होणार नाही.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.