रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का, जाणून घ्या काय आहे सत्य

रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का, जाणून घ्या काय आहे सत्य

आपल्यापैकी कितीतरी जण असे आहेत ज्यांचे भाताशिवाय पान हलत नाही. खरं तर आपल्याकडे भारतात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भात (Rice). पण भाताच्या बाबतीत अनेक मिथक (Many Myths related to rice) आपल्याकडे आहेत.  त्यामुळे भात खायचा की नाही असाही प्रश्न अनेकांना सतावतो. सफेद भात हा ब्राऊन राईसपेक्षा अधिक हेल्दी असतो, भात खाल्ल्याने वजन वाढते, रात्री भात खाणे योग्य नाही असे एक ना अनेक मिथक आपण ऐकत आलो आहोत. पण खरंच असं आहे का? एक कप सफेद भातामध्ये साधारण 35 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. भाताच्या  एक कपामध्ये 165 ग्रॅम कॅलरी आणि 3-4 ग्रॅम प्रोटीन असते. अधिकांश कार्ब्सप्रमाणे भातासुद्धा गॅस्ट्रोइंंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये ग्लुकोज बदलते. ब्राऊन राईसच्या तुलनेत सफेद भातामध्ये फायबर कमी असतो. तसंच ब्राऊन राईसमध्ये अधिक विटामिन्स, खनिजे, मँगनीज, सेलेनियम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम असतात. भातामध्ये असणारे अनेक मिथ सत्य आहेत की नाही हे आपण  या लेखातून जाणून घेणार आहोत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे मिथक आहे ते म्हणजे रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. पण हे खरंच खरे आहे का याची माहिती आपण घेणार आहोत. 

भाताबद्दल असणारे मिथक (Myths spread about rice)

Shutterstock

मिथ 1 - भातामध्ये ग्लुटन असते

तथ्य - हे अतिशय प्रसिद्ध असे भाताबद्दल असणारे मिथ आहे. पण हे खरे आहे की, भातामध्ये ग्लुटन असते आणि असे असले तरीही कोणत्याही प्रकारची अलर्जी यापासून होत नाही.  ज्या ज्या पदार्थांमध्ये उच्च ग्लुटन असते त्यातून मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना धोका असतो आणि वजन कमी करणाऱ्या लोकांसाठीही हे धोकादायक मानले जाते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या व्यक्ती अथवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना भात न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. 

आरोग्यासाठी रोज दही भात खाणं ठरतं सर्वोत्तम, वजन नियंत्रणात राखण्यास मदत

मिथ 2 - भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो 

तथ्य - हे मिथ वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. पण यामध्ये कोणतेही तथ्य नाही. भात हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि हेल्दी आहे. वास्तविक भात हा पचनासाठी अत्यंत हलका आणि सोपा असतो. यामुळे चरबी कमी होते आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात ठेवण्यास याची मदत  होते. यामध्ये असणारे कार्बोज ऊर्जाचा एक चांगला स्रोत आहेत. त्यामुळे भात खाल्ल्याने अजिबात वजन वाढत नाही. त्यासाठी आपण कोणत्या वेळी काय खातो याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. 

मिथ 3 - भातामधून प्रोटीन मिळत नाही

तत्थ्य - हे अजिबातच सत्य नाही. शरीराला पोषण देणाऱ्या गोष्टींमध्ये प्रोटीनचे प्रमाण असलेली गोष्ट म्हणजे भात हे खरंतर दुसऱ्या  क्रमांकावर येते. 1 कप भातामध्ये साधारण 3-4 ग्रॅम इतके प्रोटीन असते. जे शरीराला पोषण देण्यास अधिक फायदेशीर ठरते. इतर धान्यांच्या तुलनेमध्ये हे  प्रमाण अधिक आहे. इतर कोणत्याही धान्यातून इतकं प्रोटीनचं प्रमाण शरीराला मिळत नाही. 

बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे( Benefits of eating Rice in Marathi)

मिथ 4 - भातामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असते

तथ्य - भात खाल्ल्याने आपल्या शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते असं म्हटले जाते. पण हे अजिबात खरं नाही. भातामध्ये सोडियमची मात्रा अतिशय कमी असते. त्यामुळे त्याने कोणतेही नुकसान होत नाही. हा लोकांच्या डोक्यात असलेला एक भ्रम असून भातामुळे कोणतंही नुकसान शरीराला होत नाही. 

मिथ 5 - रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो 

तथ्य - खरं हे आहे की, भात हा पचायला अगदी हलका असतो आणि रात्री भात खाल्ल्यानंतर झोप चांगली येते. यामुळे शरीरातील लेप्टिन संवेदनशीलता वाढते. लेप्टीन हे एका फॅटी टिश्यूद्वारे  उत्पादित होते जे शरीरामधील चरबी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्याशिवाय रात्री उच्च कार्बोजयुक्त जेवण जेवल्यास, ते ग्लुकोजमध्ये बदलते. रात्रीच्या वेळेत ग्लुकोज हे अगदी सोप्या तऱ्हेने उर्जेमध्ये परावर्तित होते.  जेव्हा दिवसा तुम्ही भात खाता तेव्हा ते चरबीमध्ये परावर्तित होते. त्यामुळे रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. पण ज्यांची प्रकृती लठ्ठपणा वाढण्याची आहे त्यांनी मात्र रात्री भात खाणे टाळावे. कारण त्यांना कोणतेही पदार्थ अति प्रमाणात सेवन केल्यास त्रास होतो आणि लठ्ठपणा वाढीला लागतो.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

वाचा - 

#FoodFact : डाळ-भात खा आणि निरोगी राहा