सध्या घरात असलात तरीही त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. घरात कामात वेळ निघून जातो पण स्वतःकडे लक्ष देणंही तितकंच गरेजचं आहे. आपल्याकडे त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उत्पादनं असतात आणि अनेक ब्रँड्सही. पण त्या अनेक स्किन केअर उत्पादनांमध्ये सल्फेट आणि पॅराबेन असतं. पण अशीही काही उत्पादनं असतात जी सल्फेट आणि पॅराबेनमुक्त असतात. अशीच काही उत्पादनं #POPxo टीमसाठी निस्सी स्किन केअर (Nicci Skin Care) यांनी पाठवली होती आणि आम्ही ही उत्पादनं वापरून पाहिली. आम्हाला आलेला या उत्पादनांचा अनुभव आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. कोणतीही उत्पादनं वापरायची म्हटलं की आपल्या त्वचेला काही हानी तर पोहचणार नाही ना असा पहिला प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. याचसंदर्भात आम्ही निस्सी स्किन केअरच्या संस्थापक मेनका किरपलानी यांच्याशीही चर्चा केली. मात्र त्यांनी आम्हाला यामध्ये सर्व घटक नैसर्गिक वापरण्यात आल्याचा आम्हाला दिलासा दिला. त्यानंतर आम्ही स्वतः याचा अनुभव घेतला.
आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला फेसवॉशची गरज भासतेच. पण खरंच याची आवश्यकता असते का? तर होय. नेहमीच्या साबणाने त्वचा अधिक खराब होते. त्यापेक्षा फेसवॉशने चेहरा अधिक चांगला राहण्यास मदत मिळते. या रेड वाईन फेसवॉशच्या वापराने चेहरा अधिक मऊ आणि मुलायम होत असून इतर फेसवॉशच्या तुलनेत चेहऱ्यावर उजळपणा जास्त काळ टिकून राहातो असे लक्षात आले. यामध्ये कोरफड रस, अॅप्पल साईड व्हिनेगर, इसेन्शियअल ऑईल्स, सुगंध या सगळ्याचा व्यवस्थित मेळ असून चेहरा जास्त वेळ ताजा राहण्यास मदत मिळते.
वाचा - त्वचेसाठी वाईन फेशियल
या मास्कचा उपयोग रोज रात्री झोपताना तुम्ही नाईट क्रिमप्रमाणे करू शकता. त्वचेला अधिक चांगले पोषण देण्यासाठी तुम्ही रात्रभर हे लावून झोपू शकता. तुम्हाला याचा वापर आठवडाभर केल्यानंतर स्वतःलाच चेहऱ्यामधील फरक कळेल. रात्री झोपण्यापूर्वी हा मास्क लावा 2 मिनिट्स तुम्ही चेहऱ्यावर छान मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा अथवा आंघोळ करा. मास्क रात्रभर तसाच ठेवला तरीही काही हरकत नाही. मुळात याने कोणतीही अलर्जी येत नाही. तर अंगावर येणारे रॅश घालवण्यासाठी याचा चांगला उपयोग करता येतो असा दावा या कंपनीने केला आहे. त्यामुळे तुम्ही याचा त्यासाठीही वापर करून पाहू शकता.
महिन्याभरात मिळवा तुम्हाला हवी असलेली सुंदर त्वचा... तेही घरच्या घरी
घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रिन लावायला हवे असं सांगितले जाते. पण त्याचा नक्की फायदा काय असाही प्रश्न अनेकांना पडतो. आपली त्वचा तर तशीच राहते असं प्रत्येकाला वाटतं. पण तसं अजिबात नाही. सूर्याच्या प्रखर किरणांपासून वाचवण्याचे काम सनस्क्रिन करत असते. हे सनस्क्रिनही अतिशय माईल्ड सुगंध देत असून तुमच्या त्वचेची काळजी घेण्यास चांगले आहे. खरं तर हे SPF-30 असल्याने हे आपल्या त्वचेसाठी अधिक चांगला परिणाम देते.
कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असते हे आपण नेहमीच वाचतो. पण त्याचा स्क्रब म्हणून अधिक चांगला उपयोग या क्रिममार्फत करण्यात आला आहे. या स्क्रबचा वापर केल्यानंतर चेहऱ्यावर येणारा ग्लो तुम्ही माझ्या या फोटोमध्येही बघू शकता. स्क्रब लावल्यानंतर चेहऱ्यावर इतर कोणत्याही मेकअपचा वापर मी केलेला नाही. पण चेहऱ्यावर ताजेपणा मात्र दिसून येत आहे. अत्यंत माईल्ड असा हा स्क्रब असून त्याचा चेहऱ्यावर दिसणारा परिणाम अत्यंत चांगला आहे.
यामध्ये कोणतेही केमिकल नसून कडूलिंबाची पाडवर, संत्र्याच्या सालाची पावडर आणि मुलतानी माती यांचा सुरेख मेळ आहे. त्यामुळे फेसपॅक लावून त्यानंतर तुम्ही जेव्हा पाण्याने चेहरा धुता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील सर्व प्रदूषणाने साचलेली माती दूर व्हायला मदत मिळते. त्याशिवाय तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटते.
जर तुम्ही अशाच नैसर्गिक घटकांपासून बनवण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या शोधात असाल तर तुम्ही नक्कीच निस्सी स्किन केअरच्या या उत्पादनांचा वापर करू शकता.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.