चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. याचे कारण असे की या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म दिवस. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण सर्वसाधारणपणे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला हळद कुंहू बाहिले जाते. त्यानंतर फुले वाहिली जातात. श्री रामाला केवडा, चंपा, चमेली आणि जुईची फुले वाहिली जातात. त्यानंतर त्याची आरती केली जाते. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायिला जातो. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. श्रीराम यांचा अवतार या त्रेता युगातील आहे. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्यांना पूत्र नसल्याचे दु:ख होते. त्यांच्या राजगादीला कोणीही वारिस नव्हता. संतानप्राप्तीसाठी दशरश राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. अग्निनारायण त्याला प्रसन्न झाले. त्यांनी राजाला एक फळ दिले. त्याचे सेवन करताच राजाला चार पूत्र झाले. त्यांची नावं राम, लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न. श्रीरामचंद्रानी अगदी बालपणात त्यांच्यातील चुणूक दाखवली होती. त्यांनी दृष्ट शत्रूंचा संहार केला होता. ते अयोध्या नगरीचे राजा होणार म्हणून प्रजाही आनंदी होती. पितृवचन, मातृवचन, एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्वाचे सगळे गूण त्यांच्यामध्ये होते. तुम्हा सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Table of Contents
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Ram Navami Wishes In Marathi)
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा! संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला
चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छाु!
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!
श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा
पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!
माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज आणि भरताचे त्याग आपल्या सगळ्यांना आयुष्यात शिकवण देत राहो.
आज प्रभू राम असते तर त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ लोकांना शिकवला असता.
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर.. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
प्रभू रामचंद्रासारखा राजा होणे नाही. प्रजेला सर्वस्व मानणाऱ्या या देवतेच्या विचारांचा अवलंब केला तरी पुरे
बळे आगळा कोदंडधारी। महाकाळा विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकारा कोण ठेवा । प्रभाते मनी राम चिंतित जावा । राम नवमीच्या शुभेच्छा
रामाप्रती भक्ती तुझी । राम राखे अंतरी । रामासाठी भक्ती तुझी । राम बोले वैखरी ।
उच्चारिता राम होय पाप चर । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।
रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ श्रीनारायण जगदुत्पादक त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला
जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो. राम नवमीच्या शुभेच्छा
प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. राम राष्ट्राचे प्राण आहे… रामाचे अस्त्तित्व म्हणजे भारताचे नवनिर्माण आहे...राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो. प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.
ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची वाणी सत्य आहे. त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्म दिनी राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दिवस आहे राम जन्माचा चला करुया साजरा, तुम्हाला सगळ्यांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम नवमीला पाठवा संदेश (Ram Navami SMS In Marathi)
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!
छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो. श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीतं गाता आकाशाशी जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे.. राम नवमीच्या शुभेच्छा!
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना
प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते. पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले.. त्यांचा हा आदर्श नक्की घ्या. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम नवमीच्या दिवशी झाला रामाचा, ज्याने रावणाचा अहंकार मिटवून संहार केला पापाचा.. आणि पताका फटकावला पुण्याचा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे.. राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. राम नवमीच्या शुभेच्छा!
बोलो सियावर रामचंद्र की जय..श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
धर्माच्या मार्गावर चालाल तर तुम्हाला सुख, समृद्धि आणि संपत्तिची प्राप्ती होईल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी 14 वर्षांचा वनवास झेलला आणि पापाचा संहार केला.. बोला श्री राम जय राम रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे… राम नवमीच्या शुभेच्छा!
राम नावाने करा जीवनाची सुरुवात , म्हणजे चांगल्या आयुष्याची सुरुवात, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम नवमीच्या शुभ दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभ शुभेच्छा!
ज्या पावन भूमीत रामाने जन्म घेतला अशा या पावन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा!
ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात दगडही तरंगतात अशा प्रभू रामचंद्राचा महिमा सांगावा तितका कमीच आहे. जय श्री राम
राम नामाचा जप करुन तर पाहा तुम्हाला किती समाधान मिळते ते प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
या पावनभूमीत रामाचा जन्म झाला म्हणून आजही चांगल्या गोष्टी जगात टिकून आहेत. नाही का?
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.