तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी

तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी

साडी हा फॅशनमधील Evergreen असा पर्याय आहे. अगदी कोणत्याही शुभप्रसंगी तुम्ही साडी नेसली आणि तुमच्याकडे कोणी पाहिले नाही असे होत नाही. कारण साडीमध्ये प्रत्येक महिला ग्रेसफुल आणि सुंदरच दिसते. पण अनेकांना साडी सांभाळणे आजही नाही. आता यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. हल्ली जीन्स आणि स्कर्टमध्ये वावरायची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, पायाशी येणारी साडी सांभाळताना नकोशी होते. साडी नेसल्यानंतर ती सुटेल अशीच भीती अनेकांना वाटते. तुम्हीही याच भीतीमधले असाल तर आता अजिबात घाबरु नका. या 21 व्या शतकात आपल्यासाठी मस्त रेडिमेड साड्यांचा पर्याय उपलब्ध आहे. नेमक्या या रेडिमेड साड्या कशा असतात ते पाहुया.

बेस्ट कोल्हापुरी चप्पल डिझाईन्स - Kolhapuri Chappal Designs

फॅन्सी साडी आणि ब्लाऊज

Instagram

तुम्ही एखाद्या पार्टीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला शिफॉन, जॉर्जेट किंवा सॅटीन या मटेरिअलमध्ये अशा काही छान साड्या मिळतात. या साड्यांचा फॉल तुम्ही नेसत असलेल्या साड्यांप्रमाणेच पडतो. या साड्या जरी प्लेन असल्या तरी यांचे ब्लाऊज फारच फॅन्सी असतात. अगदी ऑफ शोल्डरपासून ते डीप नेक असे वेगवेगळे पॅटर्न या ब्लाऊजमध्ये असतात. या साड्यांवर किंवा ब्लाऊजवर जरदोसी किंवा सिक्वेन्सचे काम केलेले असते. त्यामुळे या साड्या उठून दिसतात. 

कशी नेसली जाते साडी: ही साडी नेसणे फारच सोपे असते.ही साडी तुम्ही पेटीकोटवर नाही नेसली तरी चालेल तुम्ही ती लेगिंग्ज किंवा टाईटसवर नेसू शकता. ज्याप्रमाणे आपण साडी खोवतो अगदी त्याचप्रमाणे याला एक हुक दिलेले असते. ते लावून जशी साडी गुंडाळतो तशी गुंडाळायची मग पुढे आपोआपच तुम्हाला रेडिमेड निऱ्या दिसतील. मग काय उरलेला भाग हा पदराचा हा पदरही तयारच असतो. फक्त तुम्हाला तो खांद्यावर घ्यायचा असतो. झाली साडी नेसून 

Latest Trends: Indian

Mauve & Black Self-Striped Ruffled Ready to Wear Saree

INR 4,315 AT Chhabra 555

कॉटन साडी आणि ब्लाऊज

Instagram

आता सगळ्याच जणांना अशा फॅन्सी साडी आवडतील असे होणार नाही. काहींना खास मिटींग्जसाठी किंवा छोट्याशा समारंभासाठी कॉटनची प्रिंटेटसाडी छान वाटते. असा कॉटनसाडीचा पर्याय ही तुम्हाला रेडिमेड साडीमध्ये मिळू शकतो. यामध्येही तुम्हाला फ्रिल असलेल्या किंवा नसलेला असा दोन्ही पर्याय मिळू शकतो. आता कॉटन साडीमध्ये तुम्हाला फॅन्सीसाडीचा पर्याय मिळत नसल्यामुळे तुम्ही एखादा ब्लाऊज तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने शिवून घेऊ शकता. किंवा रेडिमेड घेऊ शकता. कॉटनसाड्यांची रेंज इतर साड्यांच्या तुलनेत थोडी कमी आणि बजेटमध्ये बसणारी असते. 

नक्की वापरुन पाहा कोल्हापुरी साजच्या (Kolhapuri Saaj) या अनोख्या डिझाईन्स

Latest Trends: Indian

EARTHY RUST ORANGE RUFFLED COTTON SAREE

INR 1,499 AT parmistudio

तुमचीही साडी शिवून घेऊ शकता

Instagram

आता ही गोष्टही तितकीच खरी की, सगळ्यांनाच या साड्या आवडतील असे अजिबात सांगता येत नाही. म्हणजे काहींचा चॉईस हा वेगळा असतो. आता जर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पैठणी, नारायण पेठ किंवा काठापदराच्या साड्या नेसण्याचा कंटाळा असेल किंवा त्या सावरता येत नसतील तर हल्ली सुंदर साड्या शिवूनही मिळतात. आता ज्याप्रमाणे या साड्यांना तुम्हाला हुक दिले जाते. त्याऐवजी तुम्हाला चेन दिली जाते. म्हणजेच झिपर हे झिपर दिसतही नाही आणि तुमच्या पदराच्या आत लपून जाते. तुम्ही थेट घेता तो पदर जो तुम्हाला हवा तर निऱ्या काढून शिवूनही दिला जातो. लग्नात किंवा तुम्हाला इतरही सतत साडी नेसायची सवय असेल तर तुम्ही अगदी हमखास अशा चांगल्या साड्या नेसू शकता. तेही कोणत्याही टेन्शनशिवाय 


मग आता साडी नेसायचा किंवा सावरायचा प्रश्न असेल तर हा रेडिमेड साड्यांचा किंवा शिवलेल्या साड्यांचा पर्याय निवडायला काहीच हरकत नाही.


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.