आर्थिक अडचणींसाठी राशीनुसार करा हे उपाय

आर्थिक अडचणींसाठी राशीनुसार करा हे उपाय

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आय़ुष्यात काही ना काही तरी समस्याही असतेच. काहीजण ती जाहीरपणे सांगतात तर काहीजण ती आपल्यापुरतीच मर्यादित ठेवतात. आर्थिक अडचणींचा अनुभव तर प्रत्येकालाच येतोच येतो. अशावेळी तुम्ही यातून बाहेर पडण्यासाठी पुढील राशीनुसार सांगितलेले उपाय केल्यास तुमची आर्थिक अडचण किंवा कर्जातून मुक्ती नक्कीच होईल.

Shutterstock

मेष रास

जर मेष राशीच्या व्यक्तींना काही आर्थिक अडचण असल्यास त्यांनी गणपतीची पूज करावी. तसंच रोज सकाळी गणपती बाप्पाला फूल अर्पण करावं. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक अडचण असल्यास त्यांनी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि नित्यनेमाने लक्ष्मीला लाल फूल अर्पण करावं. 

मिथुन रास

मिथुन राशीच्या व्यक्तींनी हनुमानाची पूजा करावी. तसंच रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा वाचावं. 

कर्क रास 

तुमची रास जर कर्क असेल आणि आर्थिक अडचणी असतील तर गुरूवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी. 

सिंह रास 

सिंह राशीच्या व्यक्तींनी शनिवारची दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील.

Shutterstock

कन्या रास

तुमची रास कन्या असल्यास धनप्राप्तीसाठी तुम्ही रोज भगवान शंकराला जल अर्पण करावे. 

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींनी गुरूवारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा आणि या दिवशी आवर्जून पिवळे कपडे घालावे. 

वृश्चिक रास

तुमची वृश्चिक रास असल्यास मंगळवारी देवाला तुळस वाहावी. 

धनू रास 

धनू राशीच्या व्यक्तींनी रोज सकाळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. 

मकर रास 

तुमची मकर रास असल्यास रोज गणपतीची पूजा करावी आणि बुधवारच्या दिवशी गणपतीला हिरवी वेलची अर्पण करावी. 

मीन रास

मीन राशीच्या व्यक्तींनी रोज सूर्य देवाला पाणी अर्पण करावी.

सर्व राशींसाठी प्रभावी उपाय

रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा वाचावे आणि शक्य असल्यास मंगळवारी आणि शनिवारी सुंदरकांड वाचावे. रोज हनुमानाची पूजा केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमचं आयुष्यही सुरळीत होईल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.