टॅन व्हायचं नसेल तर असं लावा सनस्क्रिन, जाणून घ्या योग्य पद्धत

टॅन व्हायचं नसेल तर असं लावा सनस्क्रिन, जाणून घ्या योग्य पद्धत

चेहऱ्याच्या बाबतील अनेकांना भीती असते ती म्हणजे टॅनिंगची. जर तुम्हाला ही भीती सतत जाणवत असेल तर आता काहीच काळजी करु नका.या उन्हाळ्यात तुम्ही अजिबात टॅन होणार नाही कारण आम्ही तुम्हाला सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. कारण अशा प्रकारे सनस्क्रिन लावाल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मग आज जाणून घेऊया सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत.

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी निवडा 'हे' बेस्ट सनस्क्रिन लोशन (Best Sunscreen For Oily Skin in Marathi)

सनस्क्रिनची निवड

shutterstock

आता सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे सनस्क्रिनची निवड. जर तुम्ही तुमच्यासाठी सनस्क्रिनच्या शोधात असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या. जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखता येत नसेल तर या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची त्वचा कोणत्या प्रकारातील आहे हे एकदा कळले की मग तुम्ही सनस्क्रिन निवडू शकता. 

उदा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कमी तेलकट सनस्क्रिन निवडा म्हणजे तुम्हाला पुढे पिंपल्स, चेहरा काळवंडणे असे त्रास होणार नाहीत. जर कोरडी त्वचा असेल तर चेहरा हायड्रेट ठेवू शकेल असे सनस्क्रिन निवडा.

सनस्क्रिन लावण्याची ही आहे योग्य पद्धत

shutterstock

  • आंघोळ केल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी चेहऱ्याला लावायला हवे ते म्हणजे सनस्क्रिन लावा. 
  • सनस्क्रिन लावल्यानंतर तुमचा ते सेट होण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात. त्यामुळे ते सेट होऊ द्या. 
  • सनस्क्रिन लावल्यानंतर तुम्ही त्यावर मेकअप करु शकता. त्यामुळे तुमचा मेकअप अधिक काळ टिकतो सुद्धा 
  • जर तुम्हाला टॅन व्हायचे नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या चेहऱ्यावर सनस्क्रिन लावा आणि त्यानंतर मॉश्चरायझर. याचे कारण असे की, जर तुम्ही मॉश्चरायझर आधी लावले आणि सनस्क्रिननंतर लावले तर सनस्क्रिन लवकर निघून जाण्याची शक्यता असते. 
  • खूप जणांना सनस्क्रिन खूप लावले की, ते चेहऱ्याचे संरक्षण करते असे वाटते.पण असे नाही. तुम्ही तुमच्या त्वचेला सनस्क्रिन लावताना त्याचे प्रमाण योग्य असू द्या. हातावर सनस्क्रिन घेण्यापेक्षा ते थेट चेहऱ्याला लावण्याचा प्रयत्न करा.
  •  सनस्क्रिनचा एक थर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा असतो. म्हणून सनस्क्रिन लावताना तुम्ही आधी कपाळावर, गालावर आणि मग नाक हनुवटी आणि मानेला लावा. 
  • जर तुम्ही तुमचा टॅन झालेला चेहरा पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, टॅन हे तुमच्या कपाळावर जास्त होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कपाळावर सनस्क्रिन योग्य पद्धतीने लावा.
  • ब्युटी एक्सपर्टनुसार तुम्ही लावलेले सनस्क्रिन हे केवळ 90 मिनिटे तुमच्या चेहऱ्याची सुरक्षा करु शकते. त्यामुळे तुम्ही जर कुठे बाहेर जाणार असाल आणि अशा ठिकाणी जास्त उन असेल तर तुम्ही  90 मिनिटांनी सनस्क्रिन लावायला विसरु नका. 

आता जर तुम्ही अशा पद्धतीने सनस्क्रिन लावले तर तुमच्या चेहरा टॅन होणार नाही. तुम्ही अगदी बिनधास्त फिरु शकता. 

उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी (Tips On Foot Care In Marathi)


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.