ADVERTISEMENT
home / Acne
Chandan Powder Face Pack In Marathi

चंदन पाउडर फेसपॅकचे फायदे (Chandan Powder Face Pack In Marathi)

चंदनाचा उपयोग विशेषतः सौंदर्य उत्पादनात केला जातो. चंदनापासून बनवलेली सौंदर्यप्रसाधन फक्त भारतातच नाहीतर जगभरात सौंदर्य उपचारासाठी लोकप्रिय आहेत. चंदनातील औषधीय गुणांमुळे तुम्हाला जवळपास सर्व सौंदर्य समस्या दूर करता येतात. त्यातही चंदनाच्या फेसपॅकचा फायदा त्वचा उजळण्यासाठी, त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी, त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचा कोमल बनवण्यासाठी होतो. POPxoMarathi च्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत कसं चंदनाचा फेसपॅक वापरून तुम्हाला तुकतुकीत त्वचा मिळवता येईल. याशिवाय चंदन पाउडर फेसपॅकचे फायदे (Chandan Powder Face Pack In Marathi). चला जाणून घेऊया.

Table of Contents

  1. पिंपल्ससाठी हळद आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Pimples)
  2. कोरड्या त्वचेसाठी नारळ, बदाम तेल आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Dry Skin)
  3. तेलकट त्वचेसाठी संत्र्याचं साल आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Oily Skin)
  4. निस्तेज त्वचा उजळण्यासाठी बेसन आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Dull Skin)
  5. सुरकुत्याविरहीत त्वचेसाठी लिंबू आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Wrinkles)
  6. त्वचेवरील तेल दूर करण्यासाठी टोमॅटो आणि चंदनाचा फेसपॅक (Chandan Face Pack To Remove Oil From Skin)
  7. चमकदार त्वचेसाठी मुलतानी मिट्टी आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Packs For Glowing Skin)
  8. चेहऱ्यांवरील डाग दूर करण्यासाठी गुलाबपाणी आणि चंदनाचा फेसपॅक (Chandan Face Pack For Spotless Skin)
  9. दही आणि चंदनाचा फेसपॅक निस्तेज त्वचेसाठी (Chandan For Dull Skin)
  10. मध आणि चंदनाचा फेसपॅक तारूण्यपिटीकांसाठी (Chandan Face Pack For Acne)
  11. दूध आणि चंदनाचा फेसपॅक कोरड्या त्वचेसाठी (Chandan Face Pack For Dry Skin)
  12. चेहऱ्याची जळजळ आणि खाजेवर कोरफड आणि चंदनाचा फेसपॅक (Chandan And Aloe-Vera Face Pack)

पिंपल्ससाठी हळद आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Pimples)

Sandalwood Face Pack For Pimples

हा फेसपॅक पिंपल्स आणि सतत पिंपल्स येणाऱ्या त्वचेवर प्रभावीपणे काम करतो. हा फेसपॅक ना फक्त असलेल पिंपल्स दूर करतो तर भविष्यात येणाऱ्या पिंपल्सनाही रोखतो. याशिवाय चंदन आणि लिंबू फेसपॅक त्वचेवरील पिंपल्सचे डाग आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यातही सहायक ठरतो. 

ADVERTISEMENT

साहित्य – एक चमचा चंदन पावडर, एक चमचा हळद पावडर आणि कापूर. 

असा बनवा फेसपॅक – एक बाऊलमध्ये एक चमचा हळद, एक चमचा चंदन पावडर आणि एक चिमूट कापूर मिक्स करा. या मिश्रणात आवश्यक प्रमाणात गुलाबपाणी वापरा. जेव्हा याची चांगली पेस्ट तयार होईल तेव्हा ती समप्रमाणात चेहरा आणि विशेषतः पिंपल्सवर लावा. फेसपॅक लावल्यावर काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. 

कसा होतो परिणाम – नियमितपणे चंदन आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला असलेला पिंपल्सचा त्रास दूर होईल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा लावल्यास चांगला परिणाम मिळण्यास मदत होईल.

वाचा – त्वचेचे सौंदर्य खुलण्यासाठी बनाना फेसपॅक

ADVERTISEMENT

कोरड्या त्वचेसाठी नारळ, बदाम तेल आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Dry Skin)

शुष्क त्वचेवर उपचार करण्यासाठीही चंदनाचा फेसपॅक उपयोगी ठरतो. या फेसपॅकसाठी तुम्ही चंदनासोबत नारळ तेल आणि बदाम तेलाचा वापर करू शकता. हा फेसपॅक त्वचेचा शुष्कपणा दूर करण्यास सहायक ठरेल. 

साहित्य – एक चमचा चंदन पावडर, पाव चमचा नारळ तेल, एक चमचा बदाम तेल, गुलाब पाणी.  

असा बनवा फेसपॅक – हा फेसपॅक बनवण्यासाठी छोट्या वाडग्यात एक चमचा चंदन पावडर घ्या. आता या पावडरमध्ये नारळ आणि बदामाचं तेल मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट आवश्यकतेनुसार गुलाबपाण्याने तुम्ही पातळ करू शकता. पेस्ट चांगली तयार झाल्यावर ती चेहऱ्यावर लावा. फेसपॅक लावल्यानंतर 15-20 मिनिटं थांबा आणि ती सुकू द्या. जेव्हा मिश्रण चांगलं सुकेल तेव्हा चेहरा धुवा. 

ADVERTISEMENT

कसा होतो परिणाम – नारळाचं तेल आणि बदामतेल एकत्र केल्याने हे त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यात मदत करतं. ज्यामुळे शुष्क त्वचेची लक्षणं आणि त्वचेची जळजळ थांबण्यास मदत होते.

तेलकट त्वचेसाठी संत्र्याचं साल आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Oily Skin)

Sandalwood Face Pack For Oily Skin

तेलकट त्वचेपासून सुटका हवी असल्यास चंदन आणि संत्र्यांच्या सालीपासून बनवलेला फेसपॅक वापरा. संत्र्याच्या सालाच्या पावडरमध्ये त्वचेतील अतिरिक्त तेल उत्सर्जित केले जाते. सोबतच चंदनाचा वापर केल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

साहित्य – एक चमचा संत्र्याच्या सालाची पावडर, एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा गुलाबपाणी. 

असा बनवा फेसपॅक – संत्र्याच्या सालाची पावडर आणि चंदन पावडर चांगली मिक्स करा. याची पेस्ट बनवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या टी झोन किंवा चेहऱ्यावरील तेलकट त्वचेवर लावा. व्यवस्थित सुकू द्या. जेव्हा फेसपॅक पूर्णपणे सुकेल तेव्हा कोमट पाण्याने धुवून टाका.

कसा होतो परिणाम – या फेसपॅकने तुमचा चेहरा तेलकट दिसणार नाही आणि उजळेल. चांगल्या परिणामांसाठी हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

ADVERTISEMENT

निस्तेज त्वचा उजळण्यासाठी बेसन आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Dull Skin)

उजळदार त्वचा मिळवण्यासाठी हा फेसपॅक तुम्ही रोज वापरायला हवा. चंदन आणि बेसनाचा फेसपॅक नियमितपणे वापरल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर होऊन त्वचेचा टोन समान राहतो. 

साहित्य – अर्धा चमचा चंदन पावडर (तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी) किंवा चंदन तेलाचे 10 थेंब (कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी), दोन चमचे बेसन, एक चिमूट हळद आणि गुलाबपाणी. 

असा बनवा फेसपॅक – निस्तेज त्वचेसाठी हा चंदन आणि बेसन फेसपॅक बनवताना चंदन पावडर किंवा चंदन तेलात बेसन तुम्ही मिक्स करू शकता आणि आवश्यकतेनुसार त्यात गुलाबपाण्याचे काही थेंब आणि चिमूटभर हळद घाला. हे चांगलं मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. ही पेस्ट लावून सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका. 

कसा होतो परिणाम – हा फेसपॅक रोज चेहऱ्यावर लावल्यास तुमची त्वचा ताजी टवटवीत दिसण्यास मदत होईल.

ADVERTISEMENT

सुरकुत्याविरहीत त्वचेसाठी लिंबू आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Pack For Wrinkles)

Sandalwood Face Pack For Wrinkles

जर तुम्ही वेळेआधी चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांनी हैराण असाल तर चंदन आणि मुलतानी मिट्टी फेसपॅकचा वापर फायदेशीर ठरू शकतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही चंदन आणि लिंबापासून बनवलेला फेसपॅक वापरू शकता. 

साहित्य – दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा चंदन पावडर, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गुलाबपाणी. 

ADVERTISEMENT

असा बनवा फेसपॅक – चंदन पावडर आणि मुलतानी मिट्टी चांगली मिक्स करा. यानंतर या मिश्रणात लिंबाचा रस मिक्स करून चांगली पेस्ट बनवा. आवश्यक असल्यास पेस्ट पातळ करण्यासाठी यामध्ये गुलाबपाणी मिक्स करा. जेव्हा पेस्ट योग्य प्रमाणात पातळ होईल तेव्हा तुमच्या चेहरा आणि मानेवर समानप्रमाणात ती लावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.  

कसा होतो परिणाम – नियमितपणे आठवड्यातून एक-दोन वेळा या फेसपॅकचा तुम्ही वापर केल्यास काही दिवसातच चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील.

त्वचेवरील तेल दूर करण्यासाठी टोमॅटो आणि चंदनाचा फेसपॅक (Chandan Face Pack To Remove Oil From Skin)

आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण आणि तेल दूर करण्यासाठी चंदनाचा फेसपॅक हा उत्तम उपाय आहे. नियमितपणे चंदन, टोमॅटो आणि मुलतानी मिट्टीपासून बनवलेला फेसपॅकमुळे पर्यावरणातील प्रदूषण आणि संसर्गापासून बचावास सहाय्य होईल. 

साहित्य – चंदन पावडर अर्धा चमचा, अर्थ्या टोमॅटोचा रस, अर्धा चमचा मुलतानी मिट्टी, गुलाबपाणी. 

ADVERTISEMENT

असा बनवा फेसपॅक – एका बाऊलमध्ये चंदन पावडर आणि टोमॅटोचा रस मिक्स करा आणि चांगली पेस्ट बनवा. आता या मिश्रणात मुलातानी मिट्टी घाला आणि पेस्ट पातळ करण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करा. आता हे मिश्रण समान प्रमाणात चेहरा आणि मानेवर लावा आणि सुकू द्या. हे मिश्रण चेहऱ्यावर सुकलं की बर्फाच्या पाण्यात कापूर ओला करून त्याने हा फेसपॅक पुसा.  

कसा होतो परिणाम – टोमॅटोमुळे त्वचेचं टाईटनिंग होऊन सोबतच चंदनामुळे त्वचेतील खोलवर असलेली घाण दूर होऊल. तसंच या फेसपॅकने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स स्वच्छ होण्यासही सहाय्य होईल. चांगल्या परिणांमासाठी हा फेसपॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता. यामुळे तुमची त्वचा तेलकट असल्यास तीसुद्धा कमी तेलकट जाणवेल.

चमकदार त्वचेसाठी मुलतानी मिट्टी आणि चंदनाचा फेसपॅक (Sandalwood Face Packs For Glowing Skin)

हा फेसपॅक शुष्क म्हणजेच कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. अशा त्वचेवर पिंपल्स येतात. पण अशी त्वचा साधारणतः आढळत नाही. काही लोकांचीच त्वचा अशी असते. 

साहित्य – अर्धा चमचा चंदन आणि अर्धा चमचा मुलतानी मिट्टी 

ADVERTISEMENT

असा बनवा फेसपॅक – हे दोन्ही घटक मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी किंवा मधाचा वापर करू शकता. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकेपर्यंत राहू द्या. मग थंड पाण्याने धुवून टाका. 

असा होईल परिणाम – लक्षात घ्या हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता. पण हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही आवर्जून चांगल्या दर्जाच्या चंदनाचाच वापर करा. म्हणजे चांगला परिणाम लवकर दिसून येईल.

चेहऱ्यांवरील डाग दूर करण्यासाठी गुलाबपाणी आणि चंदनाचा फेसपॅक (Chandan Face Pack For Spotless Skin)

Chandan Face Pack For Spotless Skin

या फेसपॅकने चेहऱ्याचा नैसर्गिक रंग कायम राहण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावरील डागही दूर करण्यात चंदन फेसपॅक प्रभावी ठरतो. 

ADVERTISEMENT

साहित्य – गुलाबपाणी आणि एक चमचा चंदनाची पावडर

असा बनवा फेसपॅक – चंदन आणि गुलाबपाणी फेसपॅक बनवणं खूपच सोपं आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन्ही घटक चांगले मिक्स करा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर समप्रमाणात लावा. फेसपॅक सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवून टाका.  

कसा होतो परिणाम – चंदन हे त्वचेच्या प्रत्येक समस्येवर प्रभावी आहे. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावरील डाग दूर करायचे असतील या फेसपॅकचा नियमितपणे वापर करा.

ADVERTISEMENT

दही आणि चंदनाचा फेसपॅक निस्तेज त्वचेसाठी (Chandan For Dull Skin)

तुमचा चेहऱ्यावरील डॅमेज त्वचेला पुन्हा एकदा तुकतुकीत करण्यासाठी तुम्ही चंदन आणि दही फेसपॅकचा वापर करू शकता. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला कोमेजण्यापासून वाचवेल.    

साहित्य – एक मोठा चमचा चंदन पावडर, एक चमचा आंबट दही, अर्धा चमचा मध. 

असा बनवा फेसपॅक – हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही चंदन पावडर आणि दही मिक्स करून पेस्ट बनवा. मग या मिश्रणात मध मिक्स करा आणि फेसपॅक पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. हा फेसपॅक किमान अर्धा तास तसाच ठेवून सुकू द्या. जेव्हा फेसपॅक सुकेल तेव्हा कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 

कसा होतो परिणाम – चंदन हे सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या हानीला दूर करते. यामुळे त्वचेतील अशुद्धी आणि राठपणा दूर होण्यास मदत होते. तर दही हे कुलिंग एजंटच्या रूपात चेहऱ्यावर काम करते. ज्यामुळे तुमच्या त्वचा मऊ आणि मुलायम होते. या फेसपॅकने तुमच्या चेहऱ्यावरील मृत कोशिकांच्या पुनर्निमितीस मदत होते.

ADVERTISEMENT

मध आणि चंदनाचा फेसपॅक तारूण्यपिटीकांसाठी (Chandan Face Pack For Acne)

Chandan Face Pack For Acne

चंदन आणि मध फेसपॅकचा उपयोग तुम्ही अगदी दिवसातून दोनदाही करू शकता. असं केल्याने तुम्हाला तारूण्यपिटीकांपासून सुटका मिळू शकते. काही दिवस तुम्ही हा फेसपॅक नियमितपणे वापरल्यास तुमचा चेहरा नक्कीच पिंपल्समुक्त आणि निरोगी होईल.  

साहित्य – 3/4 चमचे चंदन पावडर, एक चमचा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर किंवा गुलाबपाणी, एक चमचा मध. 

असा बनवा फेसपॅक – चंदनाच्या पावडरसोबत गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर किंवा गुलाबपाण्याचे काही थेंब मिक्स करा. यानंतर हे मिश्रणात मध घाला आणि मिक्स करा. नंतर हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि मुख्यतः जिथे पिंपल्स आहेत. फेसपॅख लावल्यानंतर किमान 20 मिनिटं किंवा सुकल्यावर चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका. 

ADVERTISEMENT

कसा होतो परिणाम – वरील मिश्रणाचा वापर चेहऱ्यावर केल्याने पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय चंदन आणि मधाचं मिश्रण त्वचेवरील तेलाची निर्मितीही नियंत्रित करण्यात सहाय्य करतात.

दूध आणि चंदनाचा फेसपॅक कोरड्या त्वचेसाठी (Chandan Face Pack For Dry Skin)

चेहऱ्यावरील शुष्क त्वचा दूर करण्यासाठी चंदन आणि दूधापासून बनवलेला चंदन फेसपॅकचा आवर्जून उपयोग केला जातो. चंदन आणि दूधाचे गुण मिळून त्वचेला आवश्यक पोषण देतात. तसंच हे मिश्रण त्वचेला नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज करतं. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. ड्राय स्किनपासून सुटकेसाठी तुम्ही चंदनाचा फेसपॅक घरच्याघरी बनवू शकता. 

साहित्य – चंदनाचं तेल, एक चमचा दूध पावडर, गुलाबपाणी. 

असा बनवा फेसपॅक – एका वाटीत दूध पावडर घ्या आणि त्यात चंदनाच्या तेलाचे काही थेंब टाका. हे मिश्रण चांगलं मिक्स करून त्याची पेस्ट बनवण्यासाठी त्यात गुलाबपाणी घाला. चांगली पेस्ट तयार झाली की, ते मिश्रण चेहरा आणि मानेवर समानप्रमाणात लावा. चेहऱ्यावर ही पेस्ट किमान 15-20 मिनिटं लावून ठेवा आणि सुकू द्या. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. 

ADVERTISEMENT

कसा होतो परिणाम – चंदन, दूध आणि गुलाब पाणी हे तुमच्या त्वचेचा नैसर्गिक पीएट संतुलित ठेवण्यास सहाय्य करतात. त्यामुळे चांगल्या परिणामांसाठी हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून तीन वेळा लावल्यास उत्तम होईल.

चेहऱ्याची जळजळ आणि खाजेवर कोरफड आणि चंदनाचा फेसपॅक (Chandan And Aloe-Vera Face Pack)

चंदन आणि कोरफडाचा फेसपॅक हा कोरड्या आणि कॉम्बिनेशन त्वचेवर गुणकारी ठरतो. कारण चंदन हे उत्तम क्लिंजर आहे तर कोरफड चेहऱ्याला थंडावा देतं. 

साहित्य – एक चमचा कोरफड जेल किंवा तुम्ही कोरफडाचा ताजा गरही घेऊ शकता, एक चमचा गुलाबपाणी, एक चमचा चंदन पावडर. 

असा बनवा फेसपॅक – कोरफडाच्या गरामध्ये चंदन पावडर घालून मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. फक्त हा फेसपॅक डोळ्यांजवळ आणि ओठांजवळ लावणं टाळा.

ADVERTISEMENT

कसा होतो परिणाम – या फेसपॅकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा कोणत्याही घातक रसायनांविरहीत आहे. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होऊन त्यातील विषारी द्रव्यं बाहेर फेकली जातील. तसंच या फेसपॅकने चेहऱ्याची होणारी जळजळ किंवा चेहऱ्याला खाज येत असल्यास तेही थांबेल.

चंदनाबाबत विचारण्यात येणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तर – FAQs

चंदन फेसपॅक आणि त्याचे विविध फायदे

1. त्वचेसाठी नेमका चांगला चंदनाचा प्रकार कोणता?
त्वचेसाठी लाल चंदन चांगलं मानलं जातं. नेहमी बाजारात मिळणाऱ्या चंदनाप्रमाणेच लाल चंदनसुद्धा पावडरच्या रूपात मिळतं पण ते थोडंसं जाडसर असतं. हे मुख्यतः त्वचेची काळजी आणि सौंदर्याशी निगडीत गोष्टींसाठी वापरलं जातं. त्वचेवरील डाग आणि एक्ने कमी करण्यात हे खूप प्रभावी असतं. याच्या वापराने चेहऱ्यावरील सनटॅन आणि निस्तेजपणाही दूर होऊन त्वचेला थंडावा मिळतो.  

2. चेहऱ्यावर रोज चंदनाचा वापर करू शकतो का?
चंदन हे त्वचेसाठी खूप चांगल डिटॉक्सीफाई आहे. जे त्वचेवरील फ्री रॅडीकल्सची निर्मिती थांबवते. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे चंदन हे उत्तम अँटी-एजिंग आहे. तसंच ते नैसर्गिक आहे. त्यामुळे तुम्ही ते रोज वापरू शकता. पण जर तुमची त्वचा अतिसंवेदनशील असल्यास डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या. 

ADVERTISEMENT

3. चंदनामुळे त्वचा काळवंडते का?
चंदनामुळे त्वचा तेव्हाच काळवंडते जेव्हा त्या त्वचेला चंदन सूट होत नाही. त्यामुळे चंदन वापरण्याआधी नेहमी त्याची पॅच टेस्ट नक्की घ्यावी. तसंच चंदन त्वचेवर लावताना कधीही ते चोळू नका. त्यामुळे त्वचेवर ओरखडे पडून नुकसान होण्याची शक्यता असते. 

4. चंदनाच्या वापराने त्वचा उजळते का? 
जर चंदनाचा वापर बऱ्याच कालावधीसाठी केल्यास आपोआपच चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात. नियमित वापराने तुमची त्वचा निश्चितच उजळेल. 

5. तुमच्या त्वचेसाठी चंदन योग्य नाही हे कसं ओळखाल?
काहीजणांना इसेंशियल ऑईल्सची अलर्जी असू शकते. पण असं खूप कमी वेळ घडतं. त्यामुळे तुमच्या त्वचेला चंदन सूट होत की नाही हे पाहण्यासाठी आधी चंदनात थोडं तेल मिक्स करा. मग ते थोडसं तुमच्या त्वचेवर लावा आणि थोड्यावेळाने तपासा की, त्याची काही अलर्जी तर आली नाही ना. जर काही परिणाम न जाणवल्यास तुम्ही चंदनाचा वापर तुमच्या त्वचेवर करू शकता. 

हेही वाचा –

ADVERTISEMENT

मसूर डाळीचे सोपे आणि घरगुती फेसपॅक्स

निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’

संत्र्याची साल ठेवा जपून.. कारण संत्र्याच्या सालीचे आहेत भरपूर फायदे

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ 

ADVERTISEMENT

Face Pack for Oily Skin in English

27 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT