ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
jagtik vasundhara din

जागतिक वसुंधरा दिन | Save Earth Slogans In Marathi

जागतिक वसुंधरा दिन किंवा जागतिक पृथ्वी दिन (Earth Day in Marathi) हा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण जगातील तब्बल 192 देशात एकत्रितपणे साजरा करतात. जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय, तर 22 एप्रिलला वसुंधरेच्या संवर्धनाचा संदेश देणारे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात. पहिला जागतिक वसुंधरा दिन 1970 साली साजरा करण्यात आला होता. या दिवसाचा मुख्य उद्देश आहे वसुंधरा म्हणजे शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत लोकांना प्रेरित करणं हा आहे. दरवर्षी एका थीमनुसार हा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. यंदा तुम्हीही आपल्या आप्तजनांना या दिवशी वसुंधरा म्हणजे काय, वसुंधरा दिन म्हणजे काय, पृथ्वी वाचवा घोषवाक्य असे संदेश पाठवून प्रेरणा द्या आणि आपल्या वसुंधरेबाबत सजग करा.

पृथ्वी वाचवा घोषवाक्य – Save Earth Slogans In Marathi

पृथ्वी वाचवा घोषवाक्य - vasundhara din
vasundhara din

पृथ्वीवर सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपण सामाजिक जागरूकता अभियानात सहभाग घेतलाच पाहिजे. या जागतिक वसुंधरा दिनाला तुम्हीही खालील घोषवाक्य (save earth slogans in marathi) शेअर करा आणि लोकांना सकारात्मक संदेश द्या. 

  • पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.
  • ‘अर्थ’चं काही करा नाहीतर अनर्थ होईल.
  • वेळ काहीतरी करण्याची आहे, पृथ्वीला वाचवण्याची आहे.
  • येणारी पिढी प्रेमाची असल्यास पृथ्वीला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे.
  • धरणी वाचवा, जीवन वाचवा, जीवन समृद्ध करा.
  • पृथ्वी आपलं घर आहे तिला नष्ट करू नका.
  • जंगल सुरक्षित ठेवा पृथ्वीचा विनाश वाचवा.
  • जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल.
  • लोकांना हे सांगणं आहे वृक्ष पृथ्वीचा दागिना आहेत.
  • झाडं लावा पृथ्वी जगवा.
  • ओसाड धरती सांगते वृक्ष लावून माझा शृंगार करा.
  • झाडं आहेत जीवनाचा आधार त्यांना कापू नका यार.
  • झाडं-वृक्ष वाचवा या विश्वाला वाचवा.
  • वृक्षाचा खून आणि ओसाडं वन देत आहेत प्रलयाला आमंत्रण.
  • झाडं लावा पाऊस पडेल आणि धरणीमातेला आनंद होईल.

वाचा – जागतिक जल दिवसानिमित्त ’50’ पाणी वाचवा घोषवाक्य

जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा – World Earth Day Wishes In Marathi

जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा - jagtik vasundhara din
jagtik vasundhara din

वसुंधरा मातेचं ऋण अगदी साध्या शुभेच्छेनेही तुम्ही फेडू शकता. तिला वाचवण्याचा संदेश यंदा जागतिक वसुंधरा दिनाला शुभेच्छा देऊन सगळ्यांपर्यंत पोचवा. 

ADVERTISEMENT
  • पर्यावरणाचं प्रदूषण एक उपचार नसलेला आजार आहे. हे फक्त थांबवता येऊ शकतं. त्यामुळे पृथ्वी वाचवा जीवन वाचवा. 
  • आपल्या समाजात कोणीच नसेल जर आपण पर्यावरणचं नष्ट केलं. जागतिक वसुंधरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • हवा आणि पाणी या जंगल व पशूपक्षी यांना वाचवण्यासाठीच्या योजना खरंतर मानवाला वाचवण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत. 
  • ईश्वराचा शोध घेण्याची गरज नाही कारण तो पशू-पक्षी आणि पर्यावरणात आहे. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा
  • भविष्य असलं तर हिरवंगार असेल नाहीतर नसेल. 
  • प्रयत्न करा की, जेव्हा तुम्ही आलात त्याच्या तुलनेत जाताना पृथ्वीला एक उत्तम स्थानाच्या रूपात सोडून जा. जागतिक वसुंधरा दिन 
  • पक्षी हे पर्यावरणाचे संकेतक आहेत जर ते धोक्यात असतील तर आपणही लवकरच संकटात येऊ. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा
  • जसा तुमचा प्रत्येक श्वास महत्त्वाचा आहे. तसंच समुद्रातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. 
  • टॅक्स आणि महागाईचा विरोध करा पण कार्बन टॅक्स समर्थन करा.
  • जो देश आपल्या मातीला नष्ट करतो तो स्वतःला नष्ट करतो. 
  • जंगल आपल्या पृथ्वीची फुफ्फुसं आहेत जी आपली हवा शुद्ध करतात. त्यांचं संवर्धन करा पृथ्वीचं संवर्धन करा. 
  • जन-जन हेच सांगत आहे हिरवागार आपला संसार असो, जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा
  • जल आहे तर कल आहे
  • जीवनाला वाचवायचं आहे पृथ्वीला हिरवंगार ठेवायचं आहे
  • कोसळणारे वृक्ष आणि उजाड वन आहेत मृत्यूला आमंत्रण…झाडं वाचवा पृथ्वी वाचवा.

निसर्गावर कविता (Marathi Poems On Nature)

वसुंधरा दिनानिमित्त खास संदेश – Earth Day Messages In Marathi

वसुंधरा दिनानिमित्त खास संदेश - Messages For Earth Day In Marathi
Messages For Earth Day In Marathi

जसा प्रत्येक सणाचा मेसेज आपण आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला करतो तसाच यंदा जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानेही नक्की करा. या जागतिक वसुंधरा दिनाला साजरं करा. 

  • पृथ्वी फुलांमध्ये हसते हॅपी अर्थ डे.
  • पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा हॅपी अर्थ डे.
  • पृथ्वी नाहीतर जगण्याची संधी नाही, जागतिक वसुंधरा दिन. 
  • पृथ्वी वाचवा भविष्य सुरक्षित करा. हॅपी वसुंधरा दिन. 
  • प्रत्येकाला हे सांगणं आहे झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा.
  • गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान. 
  • डोंगरांना खोदत आहेत संतुलन बिघडत आहे, पण लक्षात घ्या यात नुकसान तुमचंच आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.
  • विकासाचा ग्राफ बनवताना जंगल आणि पशुपक्ष्यांचा होतोय नाश, निसर्गाचं संवर्धन करा पृथ्वीला जीवनदान द्या. 
  • श्वास होत आहेत कमी चला झाडे लावूया मिळूनी
  • चला एकत्र येऊन संकल्प करूया पृथ्वीमातेचं संवर्धन करूया.

वाचा – या सुविचारांनी साजरा करा यंदाचा जागतिक पर्यावरण दिन

जागतिक वसुंधरा दिन बाबतचे कोट्स – Earth Day Quotes In Marathi

जागतिक वसुंधरा दिन बाबतचे कोट्स - Earth Day Quotes In Marathi
Earth Day Quotes In Marathi

धरणीमातेला आईचं दुसरं रूप मानलं जातं. जर आपण तिलाच वाचवू शकलो नाही तर काय उपयोग. याच पृथ्वीमातेबाबतचे काही कोट्स.

ADVERTISEMENT
  • झाडं ही कविता आहे, जी पृथ्वीने आकाशावर लिहीते. 
  • देवाने पृथ्वीवर स्वर्ग बनवला पण मनुष्याने त्याचा नरक केला. 
  • जे पृथ्वीचा नरक बनवत आहेत तेच अपेक्षा करत आहेत की, पृथ्वी स्वर्गासारखी असावी. 
  • तुम्ही पृथ्वीकडून जे घेता ते परत केलं पाहिजे हाच प्रकृतीचा नियम आहे. 
  • मनुष्य हाच पृथ्वीवरील असा एक प्राणी आहे जो आपल्या मुलांना घरी परत येण्याची परवानगी देतो. 
  • या निळ्या चमकणाऱ्या ग्रहावर व्यतित केलेला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे त्याचा उपयोग सावधानपणे करा.
  • पृथ्वीमाता इतकी रडली आहे की, तिच्याकडे आनंदाच्या जमीनीऐवजी अश्रूंचे समुद्र जास्त आहेत. 
  • हे कधीही विसरू नका की, धरणी मातेला तुमच्या पायाच्या स्पर्शाने आनंद मिळतो आणि हवेला तुमच्या केसांशी खेळायला आवडतं. 
  • पृथ्वी एक कॅनव्हास आहे आणि परमेश्वर एक कलाकार आहे. 
  • पृथ्वी आपली नाही, आपण पृथ्वीचे आहोत. 
  • आयुष्य ते आहे जे तुम्ही स्वतः घडवता, जसं धरणीमातेचा स्वर्ग करायचा की नरक.
  • पुन्हा एकदा वसंत आला आहे, तो पृथ्वीच्या मुलासारखा आहे ज्याला कविता खूप छान लक्षात राहतात. 
  • पृथ्वी ही फक्त आपलं जग नाही. 
  • निरोगी पृथ्वी निरोगी निवासींप्रमाणे आहे. 
  • विशाल ब्रम्हांडात पृथ्वी हा फक्त एक छोटासा रंगमंच आहे.

हेही वाचा –
Save Earth Slogans in Hindi
पृथ्वी दिवस का इतिहास
यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स
जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी कोट्स
स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
Earth Day Quotes in English
Earth Day Quiz in English
Slogan on Environment Day in Hindi

16 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT