या चुका करतात तुमच्या त्वचेचे नुकसान

या चुका करतात तुमच्या त्वचेचे नुकसान

त्वचा चांगली राहावी म्हणून सर्वकाही करतो. क्लिन्झिंग, टोनिंग, मॉश्चरायझिंग पण घरी काही गोष्टी करताना आपण अगदीच कॉमन चुका करतो. त्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्याऐवजी दिवसेंदिवस खराब होऊ लागते. आता तुम्ही म्हणाल चांगल्या टिप्स फॉलो करुनसुद्धा माझी त्वचा अशी का खराब झाली? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मग तुम्ही त्वचेला नुकसान पोहोचवणाऱ्या या गोष्टी टाळायला हव्यात. जाणून घेऊया त्वचेचे नुकसान करणाऱ्या या काही गोष्टी

इन्स्टंट व्हिटॅमिन C चे सेवन करा आणि मिळवा सुंदर त्वचा

सतत वाफ घेणे

shuttrstock

तुमच्या त्वचेचे पोअर्स ओपन करुन त्यांना स्वच्छ करण्यासाठी चेहऱ्यावर वाफ घ्या असे सांगितले जाते. आता यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होतो म्हणून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सतत वाफ घेऊ शकत नाही. तुमच्या चेहऱ्याची इलास्टिसिटी त्यामुळे कमी होण्याची शक्यता असते. शिवाय तुम्ही सतत वाफ घेत राहिलात तर तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स मोठे होतील. त्यामुळे आठवड्यातून तुम्ही एकदाच वाफ घ्या. चेहऱ्यावर वाफ घेतल्यानंतर तुम्ही त्यावर थंड पाण्याचा वापर करा. त्यामुळे तुमचे पोअर्स बंद होतील.

सतत चेहऱ्यावर फेसवॉश वापरणे

shutterstock

काहींना स्वच्छ राहण्याची इतकी सवय असते की, ते त्यांचा चेहरा सतत धुत राहतात. आता चेहरा धुण्याची सवय वाईट नाही. पण चेहरा धुण्याचेही एक प्रमाण आहे. म्हणजे दिवसातून तुम्हाला वाटेल तितक्या वेळा तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकत नाही. तर तुम्हाला दिवसातून फक्त दोनदाच चेहरा धुण्याची गरज असते.आता अगदीच अपरिहार्य कारण असेल तर तुम्ही चेहरा तीनवेळा धुतला चालेल. पण मधल्या कोणत्याही वेळी तुम्ही नुसता पाण्याचा वापर करा तोच तुमच्यासाठी योग्य आहे.

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान (Skin Care Tips In Marathi)

केमिकल्स आणि नैसर्गिक उपचार

shutterstock

त्वचेसंदर्भात काहीही झाले तर अनेकांना इतरांचे सल्ले ऐकायला आवडतात. एखाद्याने सांगितले की ही क्रिम पिंपल्सवर चांगली आहे तर लगेच तुम्ही ती घेता. पण दुसऱ्याच क्षणी नैसर्गिक उपचारामुळे त्वचा चांगली होते हे कळलं की, लगेच तो प्रयोग करुन पाहायला तुम्ही तयार असतात. तुमची हीच सवय तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. तुम्ही एका गोष्टीवर स्थिर राहा. कारण जर तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही क्रिम्स लावत असाल तर त्याचा फायदा तुमच्या त्वचेवर होतो की नाही हे कळायला किमान 4 आठवडे जातात. त्यामुळे थोडा वेळ घ्या. भारंभार प्रयोग करु नका. 

त्वचेची अधिक काळजी

shutterstock

आपल्या सगळ्यांमध्ये हा गूण असतो. आपण एखाद्या बाबतीत इतकी काळजी करु लागतो. की, आपल्यालाच त्याचा त्रास होतो. त्वचेच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. तुमची अति काळजी तुम्हाला त्रासदायक ठरु शकते याचे कारण असे की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीची अति काळजी घेता त्यावेळी तुम्हाला जरा काही झाले की, तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. चेहऱ्यावर आलेलं एक पुरळही मग तुम्हाला चालत नाही. परफेक्ट त्वचेच्या नादात तुम्ही त्वचेची इतकी जास्त काळजी करु लागता की, तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये तुमची त्वचा दिसू लागते. त्यामुळे याकडे जितकं हवं तितकंच लक्ष द्या. 


आता त्वचेसंदर्भातील या काही क्षुल्लक चुका तुम्हाला नक्कीच सुधारता येतील आणि कायम लक्षात ठेवा. तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या त्वचेवर ग्लो येणारच.सगळ्यात महत्वाचं तुम्ही सुंदर आहात हे स्वत:ला पटवून द्या.

 

 


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.