उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावा ‘पालक फेसमास्क’

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावा ‘पालक फेसमास्क’

पालकची भाजी आरोग्यासाठी प्लाभदायक आहे हे आपल्याला नक्कीच माहीत असेल. विषेशतः महिलांनी आहारात पालकच्या भाजीचा  समावेश करायलाच हवा. कारण त्यामध्ये लोह, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई, फोलेट, मॅग्नेशिअम, ओमेगा 3 फॅटी अॅसीड, फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराचे योग्य पोषण होते. मात्र एवढंच नाही तर पालक तुमच्या नाजूक त्वचेचं संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठीच जाणून घ्या पालकाच्या फेसमास्कचे फायदे आणि पालक फेसमास्क कसा तयार करावा. 

Shutterstock

पालक फेसमास्कचे त्वचेवर होणारे फायदे

पालकाचा फेसमास्क लावल्यामुळे त्वचेचं चांगलं पोषण होतं. जर तुमची त्वचा निस्तेजआणि कोरडी झाली असेल तर पालक मास्कचा तुमच्या  चेहऱ्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. पालकांमध्ये अॅंटिऑक्सिंटट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होतं. यातील व्हिटॅमिन सीमुळे चेहऱ्यातील कोलेजनची निर्मिती नियंत्रित राहते ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी मुळे सुर्यप्रकाशापासून तुमचे संरक्षण होते. पालकामधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण करतं. पालकाच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म दडलेले असतात. पालकाच्या  रसामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. पालक मास्क लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, डार्क सर्कल्स अशा एजिंगच्या खुणा कमी होतात. शिवाय यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायमदेखील होते. कारण पालकाच्या पानांमध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असतो. उन्हाळ्यात त्वचेला पोषण आणि ओलसरपणाची फार गरज असते. उकाड्यामुळे घामावाटे त्वचेतील पाणी निघून जातं. ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होण्याची  शक्यता अधिक असते. अशा वेळी जर तुम्ही त्वचेला पालकाचा फेसमास्क लावला तर त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पालकचा फेसमास्क लावल्याने ती मुळापासून स्वच्छ तर होते पण त्वचेमधील नैसर्गिक तेल टिकून राहतं. ज्यामुळे त्वचेचं पोषण होतं आणि पिंपल्स येण्याचा धोकाही टळतो. यासाठीच जाणून घ्या पालकापासून फेसमास्क कसा तयार करावा.

Shutterstock

असा तयार करा पालक फेसमास्क

पालकाचा फेसमास्क तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने तयार करू शकता. आम्ही तुमच्यासोबत त्यातील एक प्रकार शेअर करत आहोत.

साहित्य - दहा ते पंधरा पालकाची पाने, एक ते दोन चमचे बेसन, दोन ते तीन चमचे दूध, एक चमचा मध

असा तयार करा पालक फेसमास्क -

पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्या. पालकची धुतलेली पाने पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मिक्सरमध्ये पाने वाटताना त्यात जास्त पाणी टाकू नका कारण पालकमध्ये आधीच पाणी असतं. पालकाची पेस्ट एका भांड्यांत काढून घ्या. त्यात बेसन, मध आणि दूध मिक्स करा. तुमचा होममेड पालक मास्क तयार होईल. 

पालकचा फेसमास्क चेहऱ्यावर कसा लावावा -

चेहरा स्वच्छ धुवून तो कोरडा करा. संपूर्ण चेहऱ्यावर पालक फेस मास्कचा एक पातळ थर लावा. फेसमास्क चेहऱ्यावर लावण्यासाठी तुम्ही फेसपॅक ब्रश अथवा हाताच्या बोटांचा वापर करू शकता. तीस मिनीटांनी तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक चेहऱ्यावर काढल्यावर लगेचच तुम्हाला चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळेल. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोनदा तरी हा फेसमास्क तुमच्या चेहऱ्यावर लावा. 

 

 

 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे  ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जेवणात सतत पालक खात असाल तर वेळीच व्हा सावध!

पालक खा आणि केसगळती टाळा

DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क