प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. पण आपल्या शरीराचा आकार कसा आहे, यामध्ये आपल्या रोजच्या डाएटची महत्त्वपूर्ण भूमिका असते. तुमच्या आहारात जे घटक असतात त्यांची तुमच्या शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असते. हेच लागू होतं तुमच्या स्तनांच्या आकाराबाबतही. महिलांच्या स्तनांच्याबाबतीत सांगायचं झाल्यास स्तनांसाठी योग्य न्यूट्रीशनयुक्त आहार घेण्याची गरज असते. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही सुपरफूड्सबाबत जे आहारात सामील केल्यास तुमचं ब्रेस्ट साईज (Breast Size) वाढण्यास मदत होईल. तसंच हे सुपरफूड्स आरोग्यासाठीही उत्तम आहेत. चला जाणून घेऊया कोणते आहेत हे सुपरफूड्स.
रोजच्या आहारात दूध सामील करण्याचा सल्ला आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो. दूध हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. तसंच दूध प्यायल्याने ब्रेस्ट टीश्यूजची वाढ चांगली होते. गाईच्या दूधात एस्ट्रोजन, प्रोजस्ट्रॉन आणि प्रोलॅक्टीन असतं. ज्यामुळे महिलांमध्ये दूधाची निर्मितीही चांगली होते. तसंच ब्रेस्ट साईजही वाढते.
जर तुम्हाला शरीर सुडौल व्हावं असं वाटत असल्यास रोजच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा. जे तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. कारण हिरव्या भाज्या आर्यन, कॅल्शिअमचाही चांगला स्त्रोत असतात. जे महिलांसाठी फारच आवश्यक असतं. हिरव्या भाज्या खाण्याचं दुसरं कारण म्हणजे यामुळे महिलांमधील मेल हार्मोन निर्मिती थांबून हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही स्मूदी, सॅलड किंवा भाजीच्या रूपात हिरव्या भाज्याचं रोज सेवन नक्की करा.
सुकामेवा खाणं हे कधीही चांगलंच ठरतं. ब्रेस्ट साईज वाढण्यातही सुकामेवा उपयुक्त ठरतो. हाय मोनोसॅच्युरेटेड फॅट्सयुक्त सुकामेवा ब्रेस्ट टिश्यूजच्या वाढीसाठी फारच आवश्यक असतात. जे तुमची त्वचाही चांगली ठेवतात आणि त्यांचं पोषक मूल्यही जास्त असतं. त्यामुळे तुमच्या पर्समध्ये रोज सुकामेवा नक्की सोबत न्या.
सोयामध्ये फाइटोस्ट्रोजन्स असतात हे हार्मोन तुमच्या ब्रेस्ट ग्रोथसाठी जबाबदार असतात. सोयामध्ये आईसोफ्लॅबोन्सही असतात जे फ्री रॅडीकल्सचा सामना करून कॅन्सरच्या पेशींचा नाश करतात.
पपई ही त्वचेसाठी अगदी उत्तम असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ब्रेस्ट ग्रोथसाठी पपई फारच उपयुक्त आहे. दूधासोबत पपई खाल्ल्यास ती अजूनच फायदेशीर ठरते.
मग वजन न वाढता फक्त ब्रेस्ट साईज वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्या रोजच्या आहारात वरील सुपरफूड्सचा नक्की समावेश करा. तसंच तुम्ही सुपरफूड्ससोबतच व्यायामाचाही समावेश केल्यास लवकरच चांगले परिणाम दिसून येतील. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असल्यास सुपरफूड्स आहारात सामील करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.