शाकाहारी लोकांच्या आहारात असायलाच हवे हे खाद्यपदार्थ

शाकाहारी  लोकांच्या आहारात असायलाच हवे हे खाद्यपदार्थ

निरोगी राहण्यासाठी दररोज योग्य आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. याचाच अर्थ तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, फॅट्स यांचा समावेश असायलाच हवा. कारण या पोषक घटकांमधूनच तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत असते. पोषक घटक आहारात असतील तर तुमचे आजारापणापासून संरक्षण होते. कारण यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढत असते. बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की, शाकाहारी लोकांना त्यांच्या आहारातून पुरेसे प्रोटिन्स मिळत नाहीत. मात्र हा समज चुकीचा आहे. कारण असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यांच्यामधून तुमच्या शरीराला प्रोटिन्सचा पुरवठा मिळू शकतो. 

दूध -

शरीराच्या योग्य वाढ आणि  विकासासाठी प्रोटिन्सची गरज असते. तुम्हाला नियमित आहारात दूध घेऊन प्रोटिन्स मिळू शकते. कारण दुधात भरपूर प्रमाणात प्रोटिन्सचे प्रमाण असते. शिवाय दुधात कॅल्शियमदेखील भरपूर असतात. ज्यामुळे तुमची हाडे आणि दात मजबूत होतात. एक कप दुधात आठ ग्रॅम प्रोटिन्स असतात. दररोज दोन ग्लास दूध पिण्याची सवय लावली तर तुमच्या शरीराचे मेटिबॉलिझम सुधारते. ज्यामुळे तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

Shutterstock

ब्रोकोली -

भाज्यांमध्ये ब्रोकोलीला प्रोटिन्सचा एक समृद्ध स्त्रोत मानलं जातं. यासाठी शाकाहारी लोकांच्या आहारात ब्रोकोली असायलाच हवी. ब्रोकोलीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के फायबर्स आणि पोटॅशियम भरपूर असतात. मात्र ब्रोकोली तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकत नाही. एक कप ब्रोकोलीच्या तुकड्यांमधून तुम्हाला 3 ग्रॅम प्रोटिन्स मिळू शकतात. 

Shutterstock

बदाम -

जर तुमच्या आहारात नियमित मुठभर बदाम असतील तर तुम्हाला पुरेसे प्रोटिन्स नक्कीच मिळू शकतात. मुठभर बदामात 6.4 प्रोटिन्स असतात. यातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन्स, मिनरल्समुळे तुमच्या ह्रदयाचे संरक्षण होते. बदाम खाण्यामुळे तुम्हाला लवकर भुक लागत नाही ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि वजन कमी होते. दोन जेवणाच्या मध्ये यासाठी बदाम खाण्यास काहीच हरकत नाही. 

Shutterstock

पनीर -

पनीरमध्ये मुबलक प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमची हाडे आणि दात मजबूत राहतात. शिवाय याचा तुमच्या रक्तदाबावर चांगला परिणाम होतो. शंभर ग्रॅम पनीरमध्ये 11 ग्रॅम प्रोटिन्स असतात. पनीरचा आहारात निरनिराळ्या प्रकारे  वापर केला जातो. मात्र ताजे, कमी शिजवलेलं अथवा फ्राय केलेलं पनीर तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी पनीरचा आहारात जरूर समावेश करा. 

Shutterstock

सोयाबीन -

जर तुमच्या शरीरात प्रोटिन्सचे प्रमाण कमी असेल तर सोयाबीनचा आहारात जरूर समावेश करा. कारण सोयाबीन मध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन बी कॉप्लेक्स, व्हिटॅमिन ई आणि अॅमिनो अॅसीड भरपूर असतात. सोयाबीनमुळे रोगप्रतिकार शक्तीचे प्रमाण वाढते. सोयाबीनची भाजी खाण्याचा कंटाळा येत असेल तर धान्यातून सोयाबीनचा वापर करा. 

Shutterstock

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

बॉलीवूडचे हे कलाकार आहेत 'शुद्ध शाकाहारी '

जाणून घ्या नव्या Eco-Keto Diet बद्दल

#vegan diet करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा