लग्नाच्या एक महिन्याआधी करून घ्या ही कामं

लग्नाच्या एक महिन्याआधी करून घ्या ही कामं

लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. अगदी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतानाही लग्नाचा दिवस हमखास आठवतो. अशा या दिवसाची वाट प्रत्येकजण पाहत असतो. मग त्यात तुम्ही, तुमचे घरचे आणि अगदी मित्रपरिवारही सामील असतो. त्यामुळे सगळेच जण लग्नाच्या तयारीला कित्येक महिने आधीच लागलेले असतात. जसं जशी लग्नाची तारीख जवळ येते तसं घरातल्यांच्या आनंदालाही उधाण येते आणि थोडं टेन्शनही येतंच. अशावेळी लग्नाला एक महिना बाकी असेल तर तयारीबाबत सगळेच थोडं का होईन हायपर होतात. मग पाहूया कोणती कामं तुम्ही एक महिनाआधीच केली तर नंतर येणार नाही टेन्शन.

Shutterstock

  • तयारीची सुरूवात 

लग्नाला काहीच दिवस उरले आहेत म्हटल्यावर काय आधी करावं आणि काय नाही ते कळतच नाही. गडबडीच्या नादात ज्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे त्या नेमक्या राहून जातात. अशावेळी नवरा नवरीने सर्वात आधी लिस्ट बनवून घ्यावी आणि त्यानुसार काम करून घ्यावी. 

  • डेटींस्टची अपॉईंटमेंट

लग्नासाठी जसं तुम्ही पार्लर एक्सपर्ट आधी बुक करता तसंच तुमच्या केसांकडे, शरीरांकडे आणि मुख्य म्हणजे दातांकडेही लक्ष दिलंच पाहिजे. कारण दात सुंदर असतील तर फोटोही नक्कीच छान येतील. त्यामुळे लग्नाच्या एक महिन्याआधी नीट डेंटल हेल्थ चेकअप करून घ्या. गरज असल्यास दातांना पॉलिशही करून घ्या. 

  • डॉक्टरांची भेट

लग्नाच्या तयारीत काही दिवस बाकी राहिले असताना आजारी पडल्यास सगळ्याच मजेची कुस्करी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला काही त्रास होत असल्यास किंवा सर्दी-खोकला झाला असल्यास दुर्लक्ष करू नका. हातपाय किंवा कंबर दुखत असेल तर डॉक्टरांची भेट घ्या. घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या आणि घरात आवश्यक औषधं व फर्स्ट एड आणून ठेवा.

Shutterstock

  • शॉपिंग लिस्ट

पर्सनल केयरपासून दागिने आणि कपड्यांपर्यंत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरजही पडणार आहेच. त्यामुळे शॉपिंगला जाण्याआधीही तुम्हाला काही तयारी करायला हवी. जसं ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याची लिस्ट बनवून घ्या. कारण एकदा पाहुणे घरी येऊ लागले किंवा घरात लग्नाचे विधी सुरू झाल्यावर तुम्हाला घराबाहेर पडता येणं शक्य नसतं. त्यामुळे एक महिना उरलेला असतानाच गरजेच्या गोष्टींचं शॉपिंग करून घ्या. 

  • ब्युटी ट्रीटमेंट

खरंतर लग्नात सुंदर दिसायचं असल्यास तुम्ही फक्त एक आठवडा नाहीतर किमान एक महिना आधी ब्युटी ट्रीटमेंटला सुरूवात करायला हवी. काही वेळा ब्युटी ट्रीटमेंटमुळे त्वचेला अलर्जी होण्याची शक्यता असते. जी बरं व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे एक महिन्याआधी ट्रीटमेंटला सुरूवात केल्यास योग्य राहील. म्हणजे नेमक्या लग्नाच्या काही दिवस आधी अलर्जी होऊन लुक खराब होणार नाही. 

  • एकमेकांना द्या वेळ

तुम्ही लग्नाच्या कामात किंवा ऑफिसच्या कामात कितीही बिझी झालात तरी एकमेकांना नक्की वेळ द्या. कारण लग्नाआधीचे दिवस हे परत येत नाहीत आणि तो काळही. यामुळे लग्नाआधी तुमचं बाँडिगही चांगल होईल आणि तुम्ही एकमेकांना चांगल समजूनही घ्याल. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना हे दिवस नक्की आठवतील. 

Shutterstock

मग लग्नाला एक महिना राहिला असेल तर वरीलप्रमाणे प्लॅनिंग करा आणि मस्तपैकी लग्नाआधी रिलॅक्स करून एन्जॉय करा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.