ADVERTISEMENT
home / Fitness
सावधान! कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अशी घ्या काळजी (Corona Virus Easy Care)

सावधान! कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अशी घ्या काळजी (Corona Virus Easy Care)

कोरोना व्हायरसची भीती आता देशात सुद्धा पसरली आहे. कारण भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडले आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार असून तो पसरायला फार वेळ लागणार नाही. म्हणून देशभरात सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता तुम्हालाही या आजाराशी दोन हात करायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. कोरोना व्हायरस म्हणजे काय? त्यापासून वाचण्यासाठी काय करायला हवे ते आपण आज जाणून घेऊया.

या कारणांमुळेही दुखू शकतं तुमचं डोकं

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरस विषाणू

shutterstock

ADVERTISEMENT

कोरोना व्हायरस हा काही नवा आजार नाही. या आधीही हा विषाणू सापडला आहे. चीनमधील सीफूड मार्केटमधून  हा आजार पसरत गेला. चीनमधील वुहान येथे ही गोष्ट साधारण नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान लक्षात आली. हा संसर्गजन्य आजार तुमच्या प्रतिकार शक्तीला दुबळी करुन तुमच्या  शरीरात प्रवेश करतो. तुम्हाला त्याची बाधा झाली की नाही हे लवकर कळत नाही. त्याला साधारण 11 दिवस लागतात. त्यानंतर तुम्हाला त्याची लक्षणे जाणवू लागतात. या व्हायरसकडे दुर्लक्ष केले तर तो आजार जीवघेणा ठरु शकतो. त्यामुळे तुमच्यामध्ये या आजाराची लक्षण जाणवली तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

कोरोना व्हायरस समज- गैरसमज

सगळ्यात आधी कोरोना व्हायरसबद्दल असे सांगण्यात येत होते की, हा सी फूड मार्केटमधून पसरला. त्यानंतर हा व्हायरस चीन निर्मित असून त्यांनीच हा व्हायरस पसरवला असे सांगितले. आणखी एका शोधामधून सापातून हा व्हायरस पसरला असे कळले. पण अद्यापही हा व्हायरस कसा पसरला यावर कोणतेही शाश्वत उत्तर आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हा व्हायरस दूर करण्याचा कोणताही इलाज सापडलेला नाही. शास्त्रांचे प्रयत्न सुरु आहेत. पण लस मिळेपर्यंत काही गोष्टींची काळजी घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे 

वाचा – #COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती

जाणून घ्या कोरोना व्हायरची लक्षणं

ही आहेत लक्षण

ADVERTISEMENT

shutterstock

कोरोना व्हायरसची लक्षणही ही अगदी साधी आहेत. या विषाणूची लागण झाल्यानंतर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण जाणवतात.  जर तुम्हालाही असा त्रास झाला असे वाटत असेल तर तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे जा. 

अशी घ्या काळजी

कोरोना व्हायरसची लागण होऊ द्यायची नसेल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. 

  • बाहेरून कोठूनही आल्यानंतर आपले हात साबणाने धुवा. सर्वोत्तम हात काळजी उत्पादन वापरा आणि एक चांगला एंटीसेप्टिक साबण निवडा, फेस काढा आणि नंतर आपले हात धुवा.
    खोकताना किंवा शिंकताना रुमाल जवळ ठेवा. 
  • गर्दीच्या ठिकाणी फिरताना तुमही जास्त काळजी घ्या. अशा ठिकाणी तोंडाला मास्क लावून फिरा. 
  • ताप किंवा खोकला असेल अशा व्यक्तींपासून दूर राहा.
  •  मांस आणि अंडी हे पदार्थ व्यवस्थित शिजवून खा. 
  • शक्य असेल तर मास्क विकत घ्या आणि त्याचा वापर करा.
  • प्रतिकारशक्ती वाढेल असे खाद्यपदार्थांचे  सेवन करा. 

हा व्हायरस दूर करण्याचा कोणताही इलाज सापडलेला नाही. शास्त्रांचे प्रयत्न सुरु आहेत. पण लस मिळेपर्यंत काही गोष्टींची काळजी घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कोरोना व्हायरसला घाबरण्यापेक्षा तुम्ही जर तुमची योग्य काळजी घेतली तर तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

ADVERTISEMENT

मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज (Activities For Kids At Home In Marathi)

 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

देखील वाचा – 

वर्क फ्रॉम होम सहज आणि सोपं होण्यासाठी टिप्स

ADVERTISEMENT
04 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT