ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
लिक्विड लिपस्टिक लावताना होतोय त्रास, तर जाणून घ्या योग्य पद्धत

लिक्विड लिपस्टिक लावताना होतोय त्रास, तर जाणून घ्या योग्य पद्धत

बऱ्याच महिलांना मेकअप खूपच प्रिय असतो. कॉलेजमधील विद्यार्थिनी असो अथवा ऑफिसमध्ये जाणारी महिला मेकअप केल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडावं असं वाटतंच नाही. मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण होतच नाही. लिपस्टिक ही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवते. म्हणजे तुम्ही काहीही मेकअप करत नसाल पण फक्त ओठांवर लिपस्टिक लावली तरीही तुमच्या चेहऱ्यात लगेच फरक पडतो. सध्या लिपस्टिकमध्येही अनेक पर्याय आहे आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे लिक्विड लिपस्टिक (Liquid Lipstick). आपल्याकडे किमान एक तरी लिक्विड लिपस्टिक असतेच. पण लिक्विड लिपस्टिक ही मॅटप्रमाणे वापरणं योग्य नाही. बऱ्याच जणींना लिक्विड लिपस्टिक नेमकी कशी वापरायची याचीच माहिती नसते. लिक्विड लिपस्टिकही त्यामुळे इतर लिपस्टिकप्रमाणे लावली जाते पण मग त्याचा योग्य परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे याची योग्य पद्धत काय आहे ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. लिक्विड लिपस्टिक लावण्याचीही एक पद्धत असते ती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

लिक्विड लिपस्टिकचे जास्त स्ट्रोक लावू नका

Shutterstock

लिक्विड लिपस्टिक ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. लिक्विड लिपस्टिकचे वैशिष्ट्य हे आहे की, ही लिपस्टिक ओठांवरून लवकर निघत नाही.  पण ही लावताना मॅटप्रमाणे तुम्ही दोन ते तीन स्ट्रोक देऊ नका. एकदाच ही तुमच्या ओठांना लावा. कारण ही जर जास्त वेळा लावली तर तुमच्या ओठांवर त्याचा रंग उठून दिसत नाही. त्याचं टेक्स्चर चांगलं दिसत नाही. जास्त  वेळा लावल्यास, त्याचं सौंदर्य कमी होतं. 

ADVERTISEMENT

‘या’ 5 पद्धतीनेही तुम्ही करू शकता लाल लिपस्टिकचा वापर

सामान्य लिपस्टिकप्रमाणे वापरू नका

Shutterstock

लिक्विड लिपस्टिक ही सामान्य अर्थात नेहमीच्या लिपस्टिकपेक्षा वेगळी असते. त्यामुळे लिक्विड लिपस्टिक इतर लिपस्टिकप्रमाणे लावू नका.  लिक्विड लिपस्टिक लावण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थित वेळ असायला हवा. घाईघाईत ही लावणं योग्य नाही. लिक्विड लिपस्टिक ही कायम आरामातच लावायला हवी. जेणेकरून ती ओठांवर पसरणार नाही आणि ओठांवरच लागेल. तरच ती योग्य ओठांच्या आकारात लागू शकते. आता आलेल्या लिक्विड लिपस्टिक या साधारणतः दिवसभर म्हणजे किमान आठ तास तरी ओठांवर टिकतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना अधिक काळजी घ्यावी. 

ADVERTISEMENT

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

ओठांना व्यवस्थित शेप अर्थात आकार द्या

Shutterstock

लिक्विड लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही ओठांना लिप लाईनरने व्यवस्थित आकार द्या. त्यानंतरच लिक्विड लिपस्टिक लावा. आऊटलाईनच्या मदतीने तुमच्या ओठांना परफेक्ट शेफ मिळेल. काही जणींचे ओठ खूपच पातळ असतात. त्यांना आपल्या ओठांवर लिक्विड लिपस्टिकचा वापर करताना काळजी घेणं  आवश्यक आहे. कारण ती पसरण्याचा धोका जास्त असतो. ओठांना आकार दिल्याने लहान ओठ अथवा पातळ ओठ मोठे दिसतात. तसंच लिक्विड लिपस्टिक जास्त काळ ओठांवर टिकून राहाते. मॅटप्रमाणे ही लिपस्टिक लवकर निघून जात नाही. 

ADVERTISEMENT

तुमच्या कलेक्शनमध्ये असल्याच पाहिजेत या ‘5’ लिपस्टिक शेड्स

लाईट मेकअप

Shutterstock

नॉर्मल लिपस्टिक मेकअपशिवाय चांगली दिसते. पण तुम्ही लिक्विड लिपस्टिक लावणार असाल तर तुम्ही चेहऱ्यावर अगदी हलका मेकअप करणं आवश्यक आहे. त्याशिवाय लिक्विड लिपस्टिक चांगली दिसत नाही. यामुळे नॉर्मल लुक पण खराब दिसतो. त्यासाठी नेहमी लाईट मेकअप तुम्ही करावा. त्यामुळे ओठही अधिक आकर्षक आणि सुंदर तुमच्या चेहऱ्यावर उठून दिसतात. 

ADVERTISEMENT

लिपस्टिक लावण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Lipstick In Marathi)

07 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT