प्रत्येक मुलीला वाटत असतं की तिच्या जोडीदाराने तिच्यावर खूप प्रेम करावं आणि सेक्सही. पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात दोघांनाही खूपच थकायला होतं. प्रेम करणं अथवा सेक्स करण्याइतकी शक्ती अंगात राहातही नाही. तर काही वेळा पुरूष हे सेक्सच्या बाबतीच खूपच बोअरिंग होतात. काही वर्षांनंतर त्याच त्याच प्रकारे सेक्स आणि पोझिशन्सचाही कंटाळा येतो. पण या गोष्टीचा नात्यावर मात्र विपरित परिणाम होताना दिसतो. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा मूड नक्कीच बदलू शकता. तुमचा जोडीदार जर सेक्स करताना बोअर झाला असेल तर तुम्ही अशा काही ट्रिक्स करू शकता जेणेकरून तुमच्या जोडीदाराला पुन्हा तुमच्या अधिक जवळ यावंसं वाटेल आणि त्याला तुमच्याबद्दल अधिक आकर्षण निर्माण होईल.
काही पुरूष हे स्वभावतःच बोअरिंग असतात आणि काही पुरूष हे लग्नाच्या काही वर्षांनंतर बोअरिंग होतात. त्यामुळे बऱ्याचदा नवरा आणि बायको यांच्यामध्ये या गोष्टीवरून खटके उडू लागतात. तुमचा पण असाच अनुभव असेल तर तुम्हाला आम्ही काही ट्रिक्स सांगणार आहोत. जेणेकरून तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्याकडे आकर्षिक होऊन पहिल्यासारखाच रोमँटिक वागेल. जाणून घेऊया या ट्रिक्स -
एखाद्याला किस करणं म्हणजे आपल्या स्पर्शातून आपलं प्रेम जाणवून देणे. त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराला कोणत्याही कारणशिवाय किस करा. मग सकाळी उठल्यानंतर असो अथवा रात्री झोपताना असो अथवा कामात असताना अचानक त्याला काहीही जाणीव नसताना त्याला त्याच्यावरील आपलं असणारं प्रेम तुम्ही किस घेऊन दाखवून देऊ शकता. कदाचित तुम्हाला त्याच दिवशी त्याचा रिप्लाय मिळेल असं नाही. पण तुम्ही नाराज होऊ नका. तर तुम्हाला काही दिवसातच त्याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा जोडीदारही तुम्हाला रिप्लाय नक्कीच देऊ लागेल.
मसाज करणं हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही हा पर्याय नक्की वापरू शकता. एखादं सॉफ्ट म्युझिक लावून तुम्ही एकमेकांना मसाज करा. त्यासाठी संपूर्ण अंगाचा मसाज करण्याची गरज आहे असं नाही. पण मसाज करता करता तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अशा अवयवालाही हात लावा जिथे त्याला स्पर्शाने वेगळी जाणीव होईल. त्याचा मूड रोमँटिक बनवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची ट्रिक नक्कीच करू शकता. मसाज करता करता तुम्ही त्याला तुमच्या अधिक जवळ आणू शकता. त्याच्या ओठांवरून आणि छातीवरून हात फिरवून त्याच्या मनातील भावना तुम्ही नक्कीच जागी करू शकता.
कधीतरी रात्री झोपताना अचानक आईस्क्रिम खाण्याचा प्लॅन करा. पण हे आईस्क्रिम खाताना तुम्ही एकमेकांना भरवत खा. तुम्ही त्याच्या ओठाला आईस्क्रिम लावून त्याचे ओठ चोखूनही हे आईस्क्रिम खाऊ शकता. यामुळे तुमचा जोडीदार उत्तेजित होऊ शकतो. इतकंच नाही जर तुमचा जोडीदार शर्ट न घालता झोपत असेल तर अशा वेळी त्याच्या छातीवर आईस्क्रिम लावून ते चोखत खाल्लं तर त्याच्या मनातील सेक्सची भावना नक्कीच जागृत होईल आणि पुढे काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तो जर रोमँटिक होत नसेल तर कधीतरी तुम्ही पहिले पाऊल उचला. तरच तुमच्या रोमान्स आणि सेक्सची गाडी व्यवस्थित चालू राहील. कारण तुम्ही इतके रोमँटिक झाल्यानंतर तो नक्कीच तुमच्या भावनेकडे आणि प्रेमाकडे दुर्लक्ष करणार नाही.
हे थोडं फिल्मी वाटतं पण तरीही हा पर्याय उत्तम आहे. कारण रोमँटिक होणं हे फिल्मी नाही. जर तुमचा जोडीदार बोअरिंग असेल तर त्याच्यासाठी नक्की रोमँटिक डिनर प्लॅन करा. घरच्या घरी तुम्ही त्याच्या आवडता पदार्थ तयार करून आपल्या हाताने भरवा. घरी कोणी नाही हे बघून हा प्लॅन करा आणि त्याच्यासाठी खास बेडरूममध्ये कँडल लाईट डिनर प्लॅन करा. हा डिनर चालू असताना त्याला आवडता तसेच तुम्ही तयार व्हा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा वेळी सॅटिनचा बेबी डॉल ड्रेस घाला. जो सुळसुळीत असेल आणि पारदर्शकही. अशा रूपात तुम्हाला बघून तो नक्कीच स्वतःला रोखू शकणार नाही.
कधी कधी एकमेकांच्या बाजूला झोपल्यानंतर मिठी मारणं राहून जातं. अशावेळी घट्ट मिठी मारा आणि मग इंटिमेट गप्पा मारा. अगदी साध्या साध्या गोष्टी असल्या त्यातही तुम्ही रोमँटिक काही मध्ये मध्ये बोलत राहा. जेणेकरून तुमचा आणि त्याचा मूड बदलेल आणि तुम्ही एकमेकांमध्ये सामावून जाऊ शकाल. एका मिठीनेही तुम्ही तुमच्या बोअरिंग जोडीदाराला बदलू शकता.
आजकाल बाजारामध्ये अनेक सेक्सी लाँजरी आल्या आहेत. तुमचे बोअरिंग सेक्स लाईफ स्पाईस अप करण्यासाठी तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. आपल्या जोडीदाराच्या आवडीच्या रंगाची एखादी लाँजरी तुम्ही घाला आणि त्यांना सरप्राईज द्या. तुम्हाला हवं असेल तर त्याच्या यायच्या वेळी तुम्ही एखादी इंटिमेट पोझ देऊन त्याला अधिक आपलंसं करून घेऊ शकता.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.