Vaastu Tips : घरात बासरी ठेवण्याचे फायदे

Vaastu Tips : घरात बासरी ठेवण्याचे फायदे

बासरी हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर येती ती श्रीकृष्णाची मूर्ती. बासरीचा आवाज खूपच मधुर असतो. पण तुम्हाला माहीत आहे का श्रीकृष्णाला आवडणाऱ्या या बासरीचा फक्त सूरच मधुर असतो असं नाहीतर बासरीला वास्तुशास्त्रांमध्येही महत्त्व आहे. बासरीला शांती आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. हे फक्त एक वाद्य नसून त्यासोबतच वास्तूदोष दूर करण्यातही मदत करतं. यामुळे बासरीला वास्तू दोष निवारक म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ज्योतिषाचं म्हणणं आहे की, जर बासरीचा वापर विचार समजून उमजून केल्यास आपण अनेक दोष टाळू शकतो. बासरीचे वास्तूशास्त्रानुसार असलेले चमत्कारी उपाय जाणून घ्या. 

Shutterstock

 • व्यावसायिकांसाठी असणारे फायदे
  जुन्या काळातील परंपरेनुसारही बासरी शुभ मानली जाते. जर तुमचा व्यापार मंदावला असेल आणि तुम्हाला नुकसान सहन करावं लागत असेल. तर नफा मिळवण्यासाठी तुम्ही बासरीशी निगडीत उपाय नक्की करून पाहा. व्यवसायात भरभराट होण्यासाठी तुम्ही सर्वात आधी श्रीकृष्णाची पूजा सुरू करा आणि आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये बासरी लावा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
 • सुखी संसारासाठी
  जर तुम्ही विवाहीत असाल आणि वैवाहीक जीवनात अडचणी असतील किंवा तुमच्या पार्टनरसोबत तुमचं पटत नसेल तर बासरीच्या मदतीने तुम्ही नात्यात सकारात्मकता आणू शकता. सर्वात आधी हे पाहा की, तुमच्या बेडरूममधील बेडवर बीम तर नाही ना. असं असल्यास घरातील या वास्तूदोषाला दूर करण्यासाठी बासरी आणा आणि बीमला ही बासरी लाल रिबीनच्या मदतीने बांधा. हा उपाय करताना बासरीचं तोंड बेडच्या दिशेने असावं.
 • आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी
  जर तुमच्या घरी पैशांची चणचण असेल तर घरात चांदीची बासरी ठेवावी. चांदीची बासरी ठेवल्याने ना फक्त घरातील वास्तूदोष दूर होतो तर घरात लक्ष्मीचा वासही कायम राहतो. तसंच घरात येणाऱ्या नेहमीच्या उत्पन्नाच्या स्त्रोतातही वाढ होते.
 • धार्मिक साधनेत मिळेल यश
  जर तुम्हाला धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रयत्नात यश हवं असेल तर तुमच्या प्रार्थनेच्या जागी किंवा देवघरात 21 किंवा 51 बासऱ्यांपासून बनवलेली झालर लावून घ्या.
 • भिंतीशी निगडीत वास्तूदोष दूर करण्यासाठी
  वास्तूशास्त्रानुसार घराच्या बाहेरील भिंत कधीही टोकदार नसावी. तसंच ती गोलाकार बनवून घ्यावी. पण असं शक्य नसेल तर भिंतीची नकारात्मकता कमी करण्यासाठी दोन्ही भिंतीच्या टोकाला बासरी लटकवा. वास्तूदोषाचा परिणाम कमी होईल.

तुम्हीही तुमच्या घरात सकारात्मक बदल होण्यासाठी घरामध्ये बासरी आणून पाहा. तुम्हाला याचा चांगला अनुभव आल्यास आम्हाला नक्की कळवा. #POPxoMarathi वर तुम्हाला वास्तूशी निगडीत काय वाचायला आवडेल तेही आम्हाला सांगा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.