वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे गोलो डाएट

वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे गोलो डाएट

आपली सततची बदलती लाईफस्टाईल सर्वात जास्त परिणाम करते ती आपल्या शरीरावर. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आता वेगवेगळ्या डाएटिंगचा आधार घेतला जातो. डाएटिंगच्या नावावर आता वेगन, किटो डाएट अशी वेगवेगळी डाएट आपण ऐकली आहेत आणि आपल्यापैकी काही जण हे डाएट फॉलोदेखील करत असतील. पण असंच एक डाएट आहे ज्यामुळे तुमचे वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम हे नियंत्रणात राहील. या डाएटचं नाव आहे गोलो डाएट (Golo Diet). आपल्यापैकी काही जणांना याबद्दल ऐकलं असेल तर काही जणांना याबद्दल कोणतीही माहिती नसेल. तर हे गोलो डाएट आपल्याला केवळ शारीरिक नाही तर मेंदूच्या तंदुरुस्तीसाठीही फायदेशीर ठरते. गोलो डाएटमध्ये तुम्ही कॅलरी नियंत्रित करून शरीरातील मेटाबॉलिजम अधिक चांगले करण्यासाठी फायदा करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण येईल आणि त्याशिवाय तुमची भूकही नियंत्रणात राहील. मेटोबॉलिजम नीट असेल तर वजन वाढ होण्याचा त्रास होत नाही. वजन कमी करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिजमवर लक्ष देणं. गोलो डाएटमध्ये यावर जास्त लक्ष देण्यात आले आहे. पण बऱ्याच जणांना अजूनही या डाएटविषयी जास्त माहिती नाही. त्यामुळे त्याआधी गोलो डाएट म्हणजे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया. गोलो डाएटविषयी सर्व माहिती आम्ही तुम्हाला लेखातून देणार आहोत. 

Table of Contents

  गोलो डाएट म्हणजे काय? (What is Golo Diet)

  गोलो डाएट हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे मिश्रण आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये मांस, भाज्या आणि त्या फळांचा समावेश केला जातो जे बाजारामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध आहेत. या डाएटमध्ये तुम्हाला प्रोटीन, कार्ब्स, फॅट या सगळ्याचा समावेश करून घ्यावा लागतो. तुम्हाला अशा प्रकारचे हे गोलो डाएट फॉलो करायचे असते ज्यामध्ये तुमच्या शरीरातील साखर स्थिर राहील आणि तुमची भूकही चाळवणार नाही.  उदाहरणार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन अंडी (प्रोटीनचे दोन युनिट्स), एक टोस्ट (कार्बचे एक युनिट), लोणी (फॅटचे एक युनिट) आणि हंगामी एखादे फळ (कार्बचे दुसरे युनिट) अशा गोष्टी खाऊ शकता. तुम्हाला या गोष्टींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करून घ्यायचा आहे. एकंदरीतच तुम्हाला तुमच्या शरीरामधील वजन आटोक्यात आणण्यासाठी योग्य आहाराचा समावेश करून घ्यायचा आहे. यालाच गोलो डाएट असं म्हणतात. वजन कमी करत असतानाही साखरेची पातळी व्यवस्थित राखण्याचं आणि हार्मोनल बॅलेन्स योग्य ठेवण्याचं काम गोलो डाएट करतं. तसंच जास्तीत जास्त निरोगी आहार घेण्यावर या डाएटमध्ये भर देण्यात आला आहे.  

  शरीरावर काय होतो गोलो डाएटचा परिणाम (Golo Diet Effect On Body)

  Shutterstock

  गोलो डाएटमध्ये इन्शुलिन आणि रक्तप्रवाह व्यवस्थित राहून तुमची भूक, वजन आणि मेटाबॉलिजम व्यवस्थित राखण्यावर भर देण्यात येतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा इन्शुलिन आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम  करत नाही तेव्हा साखर आपल्या रक्तामध्ये तशीच राहाते आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबी वाढू लागते आणि त्यामुळे वजनही वाढू लागतं. या गोलो डाएटमुळे रक्तामधील साखर आणि इन्शुलिनची पातळी योग्य राखण्याकडे अधिक लक्ष दिले जाते. यामुळे आपल्या शरीरामधील ऊर्जेचा योग्य उपयोग होतो.  त्यामुळे त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता, काही कालावधीनंतर तुम्हाला चांगला परिणामच दिसून येतो. 

  वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो का? (Golo Diet For Weight Loss)

  Shutterstock

  योग्य रितीने हे गोलो डाएट तुम्ही फॉलो केले तर याचा नक्कीच वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. 26 आठवड्यांसाठी केलेल्या अभ्यासामध्ये गोलो डाएटचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो हे सिद्ध करण्यात  आले आहे. साधारणतः 14 किलो वजन या कालावधीमध्ये कमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. हे अजूनही जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालेले नाही. पण हे परिणामकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल केले आणि योग्य निरोगी आहार घेतला तर याचा उत्कृष्ट परिणाम होऊन वजन कमी करण्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. 

  जाणून घ्या नव्या Eco-Keto Diet बद्दल

  गोलो डाएटचे फायदे (Benefits of Golo Diet)

  Shutterstock

  गोलो डाएट हे पोषक तत्वांवर आधारित आहे आणि साखरेवर नियंत्रण आणि वजन आटोक्यात आणण्याासाठी याचा फायदा होतो. तुमचं पोषक तत्वाच्या बाबतीत जर ज्ञान कमी असेल तर हे डाएट करणं तुम्हाला योग्य आहे. कारण यामध्ये तुम्हाला योग्य आणि संतुलित आहार खावा लागतो. तसंच 1-2 भागांमध्ये कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि भाज्या या सगळ्याचा समावेश तुमच्या जेवणात करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं खाण्यावरही नियंत्रण येतं आणि तुमची भूक नियंत्रणात राहून तुम्ही खाल्लेलं ताजं अन्न हे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात लागतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी साठत नाही. गोलो डाएटचा हा सर्वात मोठा फायदा आहे. भूक कमी झाल्याने वजनवार आपोआपच नियंत्रण येते. गोलो डाएटमध्ये भूकेवर योग्य प्रकारे नियंत्रण कसे ठेवयाचे यावर भर देण्यात येतो. त्यामुळे त्याचे सेवन नक्की कसे करायचे हेदेखील आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. आठवडाभर तुम्ही हा डाएट प्लॅन कसा फॉलो करायचा आहे जेणेकरून तुमचे वजन वाढणार नाही आणि त्याशिवाय तुमचे मेटाबॉलिजमही व्यवस्थित राखले जाईल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  

  गोलो डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा करावा समावेश

  Shutterstock

  गोलो डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन, कार्ब्स आणि भाज्या यांचा अधिक समावेश करून घ्यायला हवा. तुम्ही पॅकेट फूड, साखर, अन्य प्रकारचे गोड पदार्थ, प्रोसेस्ड फूड या सगळ्याचा आपल्या रोजच्या खाण्यातून समावेश काढून टाकायला हवा.  नेहमीच्या जेवणात तुम्ही चिकन, मासे, डेअरी फूड, सुका मेवा, अंडी, डाळ, हिरव्या भाज्या, फळं, बाजारात लवकर उपलब्ध होणाऱ्या भाज्या यासारख्या सगळ्या पदार्थांचा वापर करून घ्या. तसंच तुम्ही स्टार्चसाठी बटाटा, पालेभाज्या आणि प्रत्येक दिवशी किमान एक फळ याचा समावेश या गोलो डाएटमध्ये करून घेऊ शकता. यामुळे तुमची भूकही मिटेल आणि वजनही वाढणार नाही.  तसंच सहसा ब्रेड आणि इतर बाहेरील तेलकट पदार्थ खाणं तुम्ही टाळा. घरातील जास्तीत जास्त ताजे पदार्थ खाण्यावर तुम्ही भर द्यायला हवा. त्यातही तुम्ही पौष्टिक पदार्थांवर अधिक भर देऊन गोड पदार्थ आणि तेलकट पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. 

  वजन कमी करायचं असल्यास फॉलो करा 'हा' वेट लॉस डाएट चार्ट

  गोलो डाएटचा आठवड्याचा प्लॅन (Golo Diet Plan)

  गोलो डाएट नक्की कसे करायचे याचा एक सँपल आठवड्यासाठीचा प्लॅन आम्ही तुम्हाला देत आहोत. सोमवारपासून ते रविवारपर्यंत गोलो डाएट फॉलो करताना तुम्ही नक्की तुमच्या आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा ते जाणून घ्या. हे अतिशय सोपे आणि बाजारातही लवकर मिळणारे पदार्थ आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगळे काही शोधत बसण्याचा नक्कीच त्रास होणार नाही. 

  सोमवार

  नाश्ता - ब्रोकोली आणि सफरचंदाच्या  तुकड्यांमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि ऑम्लेट

  दुपारचे जेवण -  ग्रील्ड चिकन, दोन पोळ्या, थोडासा भात आणि डाळीची आमटी 

  रात्रीचे जेवण - उकडलेले बटाटा अथवा उकडलेल्या पालेभाज्या 

  मंगळवार

  नाश्ता - शिजलेले पालक अथवा तेल जास्त नसलेला पालक पराठा, स्क्रम्बल्ड एग, ब्लूबेरी आणि बदाम 

  दुपारचे जेवण - ऑलिव्ह ऑईलमधील एखादी फळभाजी अथवा पालेभाजी 

  रात्रीचे जेवण - अक्रोड, द्राक्ष आणि उकडलेली एखादी पालेभाजी 

  बुधवार

  नाश्ता - ओट्सचा उपमा, रात्रभर भिजवलेले ओट्स अथवा अंडं

  दुपारचे जेवण - तुमच्या आवडीची कोणतीही पालेभाजी, सलाड, संत्र

  रात्रीचे जेवण - उकडलेले बटाटे, गाजर ऑलिव्ह ऑईलसह आणि तुम्हाला आवडत असेल तर कोणतेही मांसाहरी पदार्थ ज्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त नसेल

  गुरूवार

  नाश्ता - अक्रोड, द्राक्ष अथवा कोणतेही तुमच्या आवडीचे फळ, केळं, ऑम्लेट 

  दुपारचे जेवण -  बदाम, फळभाजी, पोळी, भात, आमटी 

  रात्रीचे जेवण - कडधान्य, फ्रूट सलाड 

  शुक्रवार

  नाश्ता - पिस्ता, अंडी, ब्राऊन ब्रेड सँडविच (घरचं लोणी लावा)

  दुपारचे जेवण -  चिकन, सलाड, सफरचंद, पोळी

  रात्रीचे जेवण - टॉमटो सलाड, एखादे फळ, उकडलेल्या पालेभाज्यांचे सूप

  शनिवार

  नाश्ता - स्ट्रॉबेरी, संत्री, केळं 

  दुपारचे जेवण -  ब्राऊन राईस, टॉमेटो सलाड, संत्री 

  रात्रीचे जेवण - चिकन,  फरसबी भाजी, उकडलेले बटाटे, ऑलिव्ह ऑईल

  रविवार

  नाश्ता - ओटमील, फ्रूट सलाड, अंडी 

  दुपारचे जेवण -  ब्राऊन राईस, सलाड, पोळी

  रात्रीचे जेवण - ब्रोकोली, अक्रोड, एखादे फळ

  कोणते अन्न खावे (Foods to Eat)

  Shutterstock

  गोलो डाएट करताना कोणते अन्न खावे हा प्रश्न मनात उपस्थित होणं साहजिक आहे. म्हणजे नक्की कोणते प्रोटीन्स, कार्ब्स आपण आहारात समाविष्ट करून घ्यायला हवेत हे आपल्याला जाणून घेणं गरजेच आहे. त्यामुळे पाहूया नक्की काय खाता येईल. 

  • प्रोटीन्स - अंडी, मांस, चिकन, मासे, सुका मेवा, डेअरी उत्पादने 
  • कार्ब्स - बेरीज, ताजी फळे, यम्स,  बटरनट स्क्वॅश, रताळे, बटाटे, फरसबी, धान्याचे प्रकार (पोळी, भाकरी)
  • भाजी - पालक, माठ, ब्रोकोली, कडधान्ये, कोबी, फ्लॉवर, काकडी,  टॉमेटो
  • फॅट्स - ऑलिव्ह ऑईल, नारळाचं तेल, सुका मेवा, आळशी, सलाड 

  वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लॅन

  कोणते अन्न खाऊ नये (Foods to Avoid)

  ज्याप्रमाणे कोणते अन्न खायचे आहे हे आम्ही सांगितले त्याचप्रमाणे गोलो डाएटमध्ये कोणते अन्न खाणे टाळावे हे पाहणंदेखील गरजेचं आहे. तुम्हाला गोलो डाएट नियमित फॉलो करायचे असेल तर तुम्ही या गोष्टी आपल्या पदार्थांमध्ये समाविष्ट करणं शक्यतो टाळा. तुमचं वजन खूपच वाढलं असेल तर तुम्ही हा प्लॅन नक्की फॉलो करा आणि आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण आणा. 

  • प्रोसेस्ड फूड - बटाटा वेफर्स, क्रॅकर्स, कुकीज, बेकरी पदार्थ उदाहरणार्थ बिस्किट्स, पाव, ब्रेड 
  • लाल मांस - बीफ, डुकराचे  मांस आणि मटण हे तीनही मांसाहारी पदार्थ तुम्ही खाणं काही काळासाठी थांबवा 
  • साखर असलेले पदार्थ - कोल्ड ड्रिंक्स, सरबत, विटामिन वॉटर्स आणि कोणत्याही प्रकारचे साखर घातलेले रस  
  • धान्य - ब्रेड, भात, ओट्स, पास्ता, मैदा (मैद्याचे सर्व पदार्थ)
  • डेअरी उत्पादने - चीज, दूध, दही, बटर, आईस्क्रिम (काही काळापुरते)

  या दोन्ही गोष्टी तुम्ही नियमितपणे पाळल्यास, तुम्हाला गोलो डाएटचा नक्की फायदा होईल. इतरही डाएटप्रमाणे तुम्हाला यासह नित्यनियमाने व्यायाम करणं भाग आहे.  कारण तुम्ही व्यायाम न केल्यास, तुमच्यावर कोणत्याही डाएटचा तितका परिणाम होणार नाही. त्यामुळे या डाएटसह तुम्ही व्यायाम करा. नियमितपणे योग्य प्रमाणात पाणीही पित राहा. तर तुमच्या शरीरावर या डाएटचा योग्य परिणाम होईल.

  प्रश्नोत्तरे (FAQs)

  1. नॉर्मल डाएट आणि गोलो डाएटमध्ये काय फरक आहे?

  नॉर्मल डाएटमध्ये बऱ्याचदा फॅट्स खाणं टाळण्याचे सांगण्यात येते. मात्र गोलो डाएटमध्ये फॅट्स असणारे पदार्थ संपूर्णतः बंद करण्यात येत नाही. तसंच इतर डाएटमध्ये बऱ्याचशा गोष्टी न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. 

  2. गोलो डाएट केल्याने काही फरक पडतो का?

  गोलो डाएट केल्याने वजन कमी झाल्याचे अभ्यासात सिद्ध झाले आहे. मात्र तुम्ही हे डाएट व्यवस्थित फॉलो करायला हवे तरच त्याचा तुमच्या शरीरावर योग्य  परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. 

  3. गोलो डाएट करत असताना तुम्ही ड्रिंक्स करू शकता का? 

  बऱ्याच लोकांना ड्रिंक्स करण्याची सवय असते. पण यामुळे वजनावर जास्त  परिणाम होत असतो हे कळायला हवं. त्यामुळे गोलो डाएट करत असतानाही तुम्ही ड्रिंक्स न घेणं जास्त योग्य आहे. तुम्हाला जर मनापासून तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही योग्य तऱ्हेने गोलो डाएट फॉलो करा. 

  2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

  देखील वाचा - 

  किटो डाएट कसं करावं आणि त्याचे आरोग्यावर होणारे फायदे अवश्य वाचा