तुमच्या चपलांवरुन कळतो तुमचा स्वभाव, जाणून घ्या तुमचा स्वभाव

तुमच्या चपलांवरुन कळतो तुमचा स्वभाव, जाणून घ्या तुमचा स्वभाव

ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात एखादी व्यक्ती टीपटॉप आली असेल तर आपल्या नजरा लगेचच त्यांच्याकडे वळतात. आपण लगेचच त्यांना टॉप टू बॉटम पाहतो. त्या व्यक्तीचा चेहरा, मेकअप, कपडे आणि सगळ्यात शेवटी त्याचे पाय आणि पायात घातलेली चप्पल. तुमच्या चपला जर तुमच्या सगळ्या लुकला शोभणारा नसेल तर मात्र तुम्ही घेतलेली मेहनत वायाच असते म्हणा. तुम्हाला माहीत आहे का तुमच्या चपलांवरुन तुमचा स्वभाव कळतो ते? हो ही गोष्ट खरी आहे. तुमच्या चप्पलांवरुन तुमचा स्वभाव कळू शकतो. जाणून घेऊया तुमच्या चपला तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतात ते

लग्नाआधी नक्की का जुळवली जाते पत्रिका, ही आहेत प्रमुख कारणे

झकपक चप्पल

Instagram

काही जणांना कायम चकचकीत चप्पल घालायला आवडतात. त्यांचे कपडे बघण्याआधीच त्यांच्या चपला आपले लक्ष वेधून घेतात. अशा व्यक्ती या मोकळ्या मनाच्या असतात. त्यांच्याअंगी अनेक कला असतात. त्यांना सोशल कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला फार आवडते. त्यांच्या झकपक चपला कधी कधी तुम्हाला वेगळ्या वाटत असल्या तरी त्यांच्यातील चांगुलपणा तुमचे मन जिंकून घेतो. त्यामुळे झकपक चपला असलेल्या व्यक्ती मनाने मोकळ्या, सोशल आणि जुळवून घेणाऱ्या असतात.

उंच टाचांच्या चपला

Instagram

खूप जणांना उंच टाचांच्या चपला घालायचे फार आवडते. मग या हिल्सच्या प्रकारामध्ये बूट असोत किंवा सँडल्स अशा चपला घालणाऱ्या या व्यक्तिंना नेतृत्व करायला फार आवडते. अशा व्यक्ती अशी संधी मिळवतातसुद्धा. त्यांच्या चालण्याच्या आवाजावरुनच त्यांचा दबदबा कळू शकतो. अशा व्यक्तिंना कायमच चारचौघात उठून दिसायला आवडते. त्यांच्या अशा शूजची निवड त्यांना कायमच वेगळे ठरवते. 

सपाट चपला

Instagram

खूप जण  उंची असो किंवा नसो सपाट चपला घालणे पसंद करतात. अशा व्यक्तींना सतत पुढे पुढे करायला आवडत नाही. त्यांच्या कामातून ते त्यांना सिद्ध करतात. कामाच्या ठिकाणी अत्यंत शांत राहून त्यांना त्यांचे काम करायला आवडते. आता शांत राहायला आवडते याचा अर्थ असा नाही का या व्यक्तिंना एकमेकांमध्ये मिसळायला आवडत नाही असे नाही. पण त्यांना त्यांचा फार गवगवा करायला आवडत नाही. पण अशा व्यक्ती उत्तम लीडर असतात. 

जाणून घ्या, मुलींना जोडीदाराकडून नेमकी कशाची असते अपेक्षा

स्पोर्टस शूज

Instagram

कोणतेही कपडे असो काही जणांना स्पोर्टस शूज घालायला फारच आवडते. त्यांची ही फॅशन तुम्हाला आवडत नसली तरी या व्यक्ती फारच फोकस असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात काय करायचे ते माहीत असते. त्या भयंकर आत्मविश्वासू असतात. त्यांना सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट लागतात. आणि ही लोक सगळ्या गोष्टी परफेक्ट करतात सुद्धा

स्लिपर्स

Instagram

काही जणांना स्लिपर्स घालायला फार आवडतात.  आता सार्वजनिक कार्यक्रमात स्लिपर्स या चांगल्या दिसत नाहीत. पण तरीही या व्यक्ती स्वभावाने फारच वेगळ्या असतात. कोणत्याही गोष्टी समजून घेण्याची त्यांची क्षमता जास्त असते. कोणतेही कठीण प्रसंग आले तरीही या व्यक्ती अगदी सगळ्या समस्यांना सामोरे जायला तयार असतात. 


तर आता तुम्ही अशा प्रकारच्या चपला घालत असाल तर तुमचा स्वभाव साधारण असाच असेल असा आमचा अंदाज आहे. तुम्हाला पटल्या का या गोष्टी?

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जाणून घ्या व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आणि सोप्या टिप्स