सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत करा नाश्ता नाहीतर…

सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत करा नाश्ता नाहीतर…

सकाळी उठल्यानंतर कामाची इतकी घाई असते की, आंघोळ, डबा, तयारी करणं यामध्येच आपला अर्धा वेळ निघून जातो. यामध्ये नाश्ता करायला वेळ असतो कुठे? रिकामी पोटी घराबाहेर पडायचं नाही म्हणून आपण थोडीशी साखर खाऊन घराबाहेर पडतो. पण सकाळी उठल्यानंतर जर 30 मिनिटांमध्ये तुम्ही काही खात नसाल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हीही उठल्यानंतर सगळी कामं करुन नाश्ता करत असाल तर तुम्हाला काही त्रास होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया याविषयीच अधिक माहिती

नेहमी तरूण दिसण्यासाठी, नियमित प्या हे ज्युस

पित्ताचा त्रास होण्याची शक्यता

shutterstock

तुम्ही साधारण रात्रीच्या जेवणानंतर 7 ते 8 तास झोपता. त्यानंतर तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया मंदावलेल्या असतात. पण तुम्ही उठल्यानंतर तुमच्या शारीरिक क्रिया पुन्हा सुरु होतात. जर तुम्ही योग्य वेळी खाल्ले नाही तर मात्र तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला पिक्ताचा त्रास असेल तर या गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक आहे. जर उठल्यानंतर तुमच्या शरीरात अन्न गेले नाही आणि तुम्ही उशीरा खाल्ले तर तुम्हाला पिक्ताचा त्रास होऊ शकतो.

जेवणाचे गणित बिघडू शकते

काही जणांना खूप उशीरा उठायची सवय असते.  जर तुम्ही 9 ते 10 वाजता उठत असाल तर तुम्हाला तुमचा सकाळचा नाश्ता वेळेत करण्याची फारच गरज आहे याचे कारण असे की, तुम्ही उशीरा उठल्यामुळे तुमच्या वेळेचे गणित आधीच बिघडलेले असते. तुमच्या नाशत्याची वेळ आणि जेवणाची वेळ ही जवळ असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. पचनासंदर्भातील विकार तुम्हाला होऊ शकतात. जर तुम्हाला लवकर उठणे शक्य नसेल तर तुम्ही उठल्यानंतर लवकरात लवकर आणि योग्यवेळी आहार घ्या. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. 

वजन वाढण्याची शक्यता

shutterstock

वजन वाढीचा त्रास हा अनेकांना असतो. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे तुमचे वजन वाढू शकते हे तुम्हाला माहीत असेलच. सकाळी उठल्यानंतर तुम्ही योग्यवेळी खाल्ले नाही तर तुम्हाला वजन वाढीचा त्रास होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रोटीन मिळेल असा आहार घ्यायला हवा. जर तुम्ही अशा आहाराचे सेवन केले तर फारच चांगले. पण सकाळी तुम्ही खायचे म्हणून काहीही खात असाल उदा. चिप्स किंवा गोड पदार्थ तर तुम्हाला याचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे.पण जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही पहिल्या 30 मिनिटांत चांगले काहीतरी खा. जर तुम्हाला सकाळी खूप भूक लागली नसेल तर तुम्ही बदाम किंवा फळांचे सेवन केले तर चालू शकेल. 

Breast चा आकार वाढवण्यासाठी उपयुक्त 'हे' सुपरफूड्स

डोकेदुखी आणि गॅसेसचा त्रास

आता वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पित्ताचा त्रास उपाशी राहिल्यामुळे होऊ शकतो.जर तुम्ही सकाळचा नाश्ता योग्यवेळी केला नाही तर तुम्हाला डोकेदुखी आणि गॅसेसचा त्रासही होऊ शकतो. पोट रिकामी राहिल्यामुळे तुम्हाला हे त्रास उद्भवण्याची शक्यता अधिक असते. 


आता जर वर होणारे त्रास तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्ही 30 मिनिटांच्या आत नाश्ता करायला हवा. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.