वयाच्या तिशीनंतर आई व्हायचंय, जाणून घ्या 5 गुंतागुंतीच्या गोष्टी

वयाच्या तिशीनंतर आई व्हायचंय, जाणून घ्या 5 गुंतागुंतीच्या गोष्टी

पुरुषाच्या  खांद्याला खांदा लावून बऱ्याचदा त्यांच्याही पुढे करिअरमध्ये सध्या महिला दिसत आहेत. त्यामुळेच लग्न आणि कुटुंब सुरू करण्यासाठी मुली बराच विचार करतात. पण या सगळ्यात मुलींचं वय हे तिशीच्या पार निघून जातं. एका  बाजूने पाहिलं तर 30-40 हे वय कुटुंबाची सुरूवात करण्यासाठी नक्कीच चांगलं आहे कारण तुमची मॅच्युरिटी लेव्हल खूपच चांगली असते. तुम्ही आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय सेटल झालेले असता. अशावेळी कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचं सामर्थ्य तुमच्यात नक्कीच असतं. पण यामध्ये एकच अडचण येते ती म्हणजे वयाच्या तिशीनंतर आई बनण्याची. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही  आई होऊ शकत नाही. पण साधारण वयाची 30 वर्ष उलटली की, मुलाला जन्म देण्यात गुंतागुंतीच्या काही गोष्टी असतात. यापैकी काही गोष्टी या साधारण असतात तर काही गोष्टी या नक्कीच जीवावर बेतणाऱ्या असतात. पण या नक्की कोणत्या गोष्टी आहेत हे प्रत्येक स्त्री ला माहीत असायला हवे. जेव्हा तुम्ही तिशी पार करता तेव्हा मुलाला जन्म देतात कोणत्या गुंतागुंतीच्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

स्वतःच्या मनाची करा आधीपासूनच तयारी

30 वर्ष पूर्ण केल्यानंतर गरोदर राहणं हे काही अशक्य नाहीये. पण विशीच्या तुलनेत तिशीमध्ये गरोदर राहणं हे थोडंफार त्रासदायक ठरतं. या गोष्टीमुळे घाबरण्याची अथवा पॅनिक होण्याची अजिबातच गरज नाही. पण या गोष्टी प्रत्येकाला माहीत असायला हव्यात त्यामुळे आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत. यासाठी तुम्ही तुमच्या मनाची आधीपासूनच तयारी करून घ्यायला हवी. गरोदरपणाच्या काळात कोणताही तणाव घेऊ नये त्यामुळे गुंतागुंत कमी होईल. आता जाणून घेऊया नक्की कोणकोणत्या गुंतागुंतीच्या गोष्टी या काळात असू शकतात. 

1. प्रिमॅच्युर डिलिव्हरी होण्याची शक्यता

Shutterstock

गरोदरपणाच्या काळात 37 व्या आठवड्यात जर बाळाचा जन्म झाला तर त्याला प्रिमॅच्युअर डिलिव्हर अथवा प्री-टर्म लेबर या श्रेणीत ठेवण्यात येतं. ही एक गंभीर समस्या आहे कारण बाळाचा जन्म जर वेळेच्या आधी झाला तर त्याच्याशी संबंधित समस्या होऊ शकतात. कारण गर्भ राहिल्यापासून बाळाचा जितका आणि ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा तो प्रिमॅच्युअर डिलिव्हरीच्या वेळी होऊ शकत नाही. त्यामुळे तिशीनंतर तुम्ही गरोदर राहिलात तर शरीरातील होणाऱ्या बदलावर तुम्हाला नेहमी लक्ष देऊन राहावं लागतं. जेणेकरून प्रिमॅच्युअर बाळाचा धोका टळू शकेल. 

2. गरोदरपणात मधुमेहाचा धोका

साधारण 30-40 दरम्यान गरोदर राहणाऱ्या महिलांना जेस्टेशनल डायबिटीस अर्थात गरोदरपणादरम्यान होणाऱ्या मधुमेहाचा धोका वाढतो. साधारण 5% टक्के महिलांना हा मधुमेह होतो. एखाद्या स्त्री ला मधुमेह नसला तरीही गरोदरपणाच्या काळात रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्हाला गरोदरपणात जर सारखी तहान अथवा भूक लागत असेल अथवा सतत लघ्वीला जावं लागत असेल तर तुम्हाला त्यावेळी मधुमेहाची चाचणी करून घ्यावी लागते. गरोदरपणात तुम्हाला मधुमेह झाल्यास, बाळाचा जन्म वेळेच्या आधी होण्याची शक्यता असते. तसंच या  काळात बाळाचे वजन अधिक अथवा त्याला टाईप 2 मधुमेह असण्याचा धोकाही असतो. 

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

3. प्रिक्लॅम्प्सिया अर्थात उच्च रक्तादाबाचा धोका

Shutterstock

गरोदरपणाच्या काळात जर उच्च रक्तदाब सुरू झाला तर हीदेखील एक मोठी समस्या आहे आणि यामुळे शरीरातील इतर अवयवांना धोका पोहचण्याची शक्यता असते. या स्थितीला प्रिक्लॅम्प्सिया असं म्हटलं जातं. तुम्हाला तिशीनंतर गरोदरपणाच्या काळात जर जास्त सूज,  वॉटर रिटेन्शन, सतत डोकेदुखी, दिसायला त्रास, श्वास घेण्याची समस्या होत असेल तर तुम्ही ही गोष्ट गंभीरपणे घ्यायला हवी. त्वरीत डॉक्टरांना याबाबत सांगायला हवे. प्रिक्लॅम्प्सियाचा धोका हा 30-40 दरम्यान गरोदर राहणाऱ्या महिलांना जास्त असतो. यामुळे होणाऱ्या बाळालाही धोका असतो हे लक्षात घ्या.  

गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या (After Pregnancy Tips In Marathi)

4. जन्माच्या वेळी बाळाचं वजन कमी असू शकते

Shutterstock

जन्माच्या वेळी बाळाचं वजन हे 2.5 किलो पेक्षा कमी असेल तर त्या बाळाला लो वेट बेबी असं म्हटलं जातं. बऱ्याचदा प्रिमॅच्युअर बाळांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त दिसते. तिशीनंतर गरोदरपणा असल्यास, ही बाब दिसून येते. त्यामुळे सुरूवातापासूनच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वतःची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक आहे. 

गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय...तर करा नैसर्गिकरित्या उपचार

5. एक्टोपिक प्रेगनन्सीचा धोका

एखादी महिला 35 वर्षानंतर गरोदर राहिली तर तिला एक्टोपिक अर्थात अस्थानिक गरोदरपणाचा धोका निर्माण होतो. या समस्येमध्ये फर्टिलाईज्ड एग, गर्भाशयाच्या बाहेर अटॅच राहतो आणि त्यामुळे भ्रूण पूर्ण स्वरूपात विकसित होत नाही. त्यामुळे मिसकॅरेजचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसात चक्कर येणे, शारीरिक थकवा, डोकेदुकी, अंगदुखी आणि व्हजायनल ब्लिडिंग अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे चेकअप करणं अत्यंत आवश्यक आहे.