ADVERTISEMENT
home / मनोरंजन
लहानपणी शक्तिमान, सलमान आणि माधुरी बनून काढले आहेत का असे फोटो

लहानपणी शक्तिमान, सलमान आणि माधुरी बनून काढले आहेत का असे फोटो

लहानपणीच्या आठवणी फारच खास असतात. फार क्वचितच अशी लोकं असतील कदाचित जी लहानपणी फार छान दिसत असतील. पण काहींचे लहानपणीचे फोटो पाहिले की, ही व्यक्ती तिचं आहे हे ओळखणेही कठीण असते. लहानपणी तुम्ही ही कधी असे कपडे घातले आहेत का? जे लहानपणी ट्रेंडमध्ये होते. म्हणजे लहानपणी सगळ्यांचाच लाडका असलेला शक्तिमान किंवा सलमान खानसारखे कपडे तुम्ही घातले आहेत का? तुमच्या काही जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी हा आजचा विषय आम्ही निवडला आहे.

वेबसिरीज आल्या तरी या 5 जुन्या मालिका अजूनही हव्याहव्याशा

शक्तिमानचे असे कपडे तुम्ही घातले होते का?

शक्तिमान

Instagram

ADVERTISEMENT

आताच्या नवीन पिढीकडे अनेक सुपर हिरो असतील. पण 90 च्या काळात शक्तिमान हा सुपर हिरो सगळ्यांच्याच आवडीचा होता. त्याची जादू इतकी होती. त्या काळात अगदी त्याच्यासारखेच हुबेहूब पोषाख बाजारात विकत मिळायचे.लहान मुलांना तर हे कपडे अगदी  हवेच असायचे. म्हणून कित्येकांनी रडून पालकांकडून असे कपडे मागून घेतले असतील. अनेकांनी त्यांच्या वाढदिवसाला हे असे कपडे अगदी हमखसा घातले आहेत. तुम्ही लहान असताना असे कपडे कधी तरी घालून पाहिले आहेत का? तुम्ही नाही तर तुमच्या ओळखीच्या कोणीही. तरच तुम्हाला या फोटोमागील आनंद कळू शकेल.

या जुन्या मालिकांचे टायटल ट्रॅक तुम्हाला आजही आवडतात का? 

सलमानचा तो खास सूट

सलमान खानचा तो सूट

Instagram

ADVERTISEMENT

हम आपके है कौन ? या चित्रपटासारखा कोणताही चित्रपट होणे नाही. या चित्रपटाशी निगडीत अनेकांच्या काही ना काही आठवणी असतील. तुम्हाला आठवत असेल तर सलमानने या चित्रपटात मोईनिश बेहलच्या लग्नाच्या सीनमध्ये एक चॉकलेटी आणि बेज अशा रंगाचा एक सूट घातला होता. हा थ्री पीस सूट तुम्हाला आठवत नसेल तर हा फोटो पाहून हा सूट नक्कीच आठवला असेल. या सूटच्या बाबतीतही अगदी तसेच आहे बरं का! लहानपणी खूप जणांनी हे असे कपडे घातले आहेत. आता शक्तिमानसारखा ड्रेस वाढदिवसाला घालण्यापेक्षा हा सूट थोडा बरा होता म्हणा. पण तरीही अनेकांना हा सूट खूप आवडत होता. खूप जणांनी लहानपणी त्यांचे या कपड्यावर फोटो काढले आहेत. 

जुन्या मालिकांमधील स्टार्स आता दिसतात असे, पाहा फोटो

माधुरीचा तो हिरवा ड्रेस

माधुरी दीक्षितचा हम आपके है कौन मधला लुक

Instagram

ADVERTISEMENT

हम आपके है कौन?  या चित्रपटातील माधुरी दीक्षितचे कपडेही फारच प्रसिद्ध झाले. तिची साडी, तिचा लाँग गाऊन अशा सगळ्या कपड्यांची त्यावेळी चांगलीच चलती होती. आता तुम्हाला जर सलमानचा वर घातलेला सूट आठवला असेल तर हा हिरवा कंच ड्रेस आठवल्यावाचून राहणार नाही. हा ड्रेससुद्धा त्यावेळी खूप जास्त प्रसिद्ध होता. त्यामुळे या ड्रेसवरही अनेकांनी असे कपडे घालून फोटो काढला आहे. 

आता हे काही ड्रेस आम्हाला माहीत होते. जे अनेक लहान मुलांनी म्हणजे 90 च्या काळात जन्मलेल्या लहान मुलांनी घातले होते. पण या व्यतिरिक्तही तुम्हाला जर असे काही खास कपडे माहीत असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि तुमचे असे काही फोटो असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा.

 घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी.

07 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT