तुमची प्रिय मैत्रीण 'आई'ला पाठवा मातृदिनाच्या शुभेच्छा (Aai Quotes In Marathi)

तुमची प्रिय मैत्रीण 'आई'ला पाठवा मातृदिनाच्या शुभेच्छा (Aai Quotes In Marathi)

आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई… आपल्यावर मनापासून प्रेम करते. कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते अशा आईवर तुम्ही किती प्रेम करता हे तिला माहीत नसेल तर तिच्यावर असलेले तुमचे प्रेम व्यक्त करा. 12 मे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी तुमच्या आईला तुमच्या मनातील भावना कळू द्या. तुमच्या भावना कळू देण्यासाठीच आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आम्ही आईसाठी काढलेले खास शुभेच्छा संदेश, स्टेटस नक्की पाठवा आणि आजचा दिवस साजरा करा.

Table of Contents

  मातृदिनासाठी खास कोट्स (Aai Quotes in marathi)

  1. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई
  2. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. मातृदिनाच्या शुभेच्छा
  3. गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची
  4. आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही
  5. तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.
  6. आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग  आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. मातृदिनाच्या शुभेच्छा! - किर्ती देशकर
  7. आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु… आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार...सर्वांना सुखदा पावे… अशी  आरोग्यसंपदा आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  8. सगळे दिले मला आयुष्याने … आता एकच देवाकडे मागणे.. प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय हवे...

  वाचा - Mother’s Day...आईसाठी करा खास आईच्या कविता (Poem On Mother In Marathi)

  1. जन्म दिला तू मला.. माणूस म्हणून घडवले.. तुझ्याशिवाय या जगात काहीही नाही चांगले
  2. रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.. आईच्या प्रेमाची माय काहीही केल्या कमी होत नाही . मातृदिनाच्या शुभेच्छा
  3. आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा… आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!
  4. जगाच्या बाजारात सगळे काही मिळते… पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.
  5. घराला घरपण आणते ती आई… आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते  ती म्हणजे आपली आई
  6. माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई… आई तुला मात-दिनाच्या शुभेच्छा!
  7. आई तुला किती काय काय सांगायचे असते.. तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते.. पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  मातृदिनासाठी शुभेच्छा संदेश (Mothers Day Wishes In Marathi)

  1. दु:खात हसवी..सुखात झुलवी… गाऊनी गोड अंगाई.. अशी ही माझी आई
  2. जगात असे काही नाही... जशी माझी प्रिय आई… ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी
  3. कितीही चुकीचे वागलो तरी मोठ्या मनाने माफ करणारी एकमेव व्यक्ती आहे माझी आई… तीच माझी सर्वस्व.. तिच माझी मैत्रीण
  4. जगात तुमच्यावर प्रेम करणारे शोधत बसण्यापेक्षा तुमच्यावर नि:स्वार्थपणे प्रेम  करणाऱ्या आईला जवळ करा.. तुम्हाला कधीच कोणाची गरज भासणार नाही.
  5. जी माझ्यासाठी खूप काबाडकष्ट करते अशा माझ्या माऊलीला मातृदिनाच्या  शुभेच्छा!
  6. आभाळाएवढी माया जिची… ईश्वरासमान कृपा तिची.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  7. ‘आई’ या दोन शब्दांनी सारे विश्व व्यापून टाकणाऱ्या वात्सल्यरुप आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

  1. आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेल्या माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!
  2. जगातील सगळीजण तुम्हाला एकदिवस सोडून जातील.. पण आई तुमची साथ कधीच सोडणार नाही.
  3. आईची माया शब्दा मांडू शकेल असा कोणीही नाही.. जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  4. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आईसाठी तुम्ही कायम लहान असता .. तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  5. आई असतो एक दिवा जो सतत तुमच्या मनात तेवत असतो… क्षणोक्षणी तो तुमच्या मनात सकारात्मकता वाढवत असतो. 
  6. असा एकही दिवस जिच्या आठवणीशिवाय जात नाही… ती व्यक्ती म्हणजे फक्त आई
  7. सगळ्या जगाने तुम्हाला नाकारले तरी तुम्हाला आहे त्या रुपात प्रेम करणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे आई.. आई तुला मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!
  8. जन्म दिलास तू मला.. मला अजून काय हवे….तुझ्या आई आता तुझ्याशिवाय आयुष्यात आणखी काय हवे..

  लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश

  आईसाठी स्टेटस (Marathi Status For Mother)

  1.  आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा… पण कोणासाठी आईला सोडू नका. 
  2. ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं. मातृदिनाच्या शुभेच्छा!
  3.  माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई
  4. गल्ली गल्लीत असतील भाई… पण माझी आई जगात सगळ्यात भारी 
  5. जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.
  6. चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.
  7. घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.
  8.  ‘आ’ म्हणजे आत्मा… आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या शुभेच्छा!
  9.  सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात..  तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात.
  10.  ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी.. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’
  11. आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.
  12. घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते. 
  13.  कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास
  14. तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.
  15. जगात असे एकच न्यायालय आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

  मातृदिनाला आईला पाठवा हे संदेश (Mothers Day Messages In Marathi)

  1. आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फिटणार नाही.. आई लाख चुका होतील मजकडून तुझं समजावणं मिटणार नाही. मातृदिनाच्या शुभेच्छा!
  2. देवा सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला..आई मातृदिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!
  3. आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम, हृदयाच्या किती कप्प्यात मीत ते साठवू मी, कितीदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  4. आई तुझ्या संस्कारातून कोवळ्या रुपाचे तरु झालो, मी कसा गं विसरेन तुला,तुझ्यामुळेच मी झालो महान.. मातृदिनाच्या शुभेच्छा! 
  5. हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोन अक्षरे ती म्हणजे ‘आई’
  6. नातं मायेचं, छत्र छायेचं… मातृदिनाच्या शुभेच्छा!
  7. हात तुझा मायेचा, असुदे मस्तकावरी,
   झेलली आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी....
   आपणा सर्वांना मातृदिनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा!
  8. आई असते जन्माची शिदोरी ..सरतही नाही आणि उरतही नाही.. मातृदिनाच्या शुभेच्छा!
  9. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी…आई या शब्दात सगळे विश्व सामावलेले आहे.. मातृदिनाच्या शुभेच्छा!
  10. देव हा कोणी पाहिला माहीत नाही.. पण आईमध्ये सर्वांनाच देव दिसतो… जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  11. आई हा जगातील सर्वश्रेष्ठ शब्द आहे… सगळ्या आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा!
  12. तुमच्याकडे सगळे असेल पण आई नसेल तर तुम्ही सगळे असूनही अभागी आहात
  13. तुझ्या ओठांवरील हसू असेच कायम असू दे आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ असू दे.. मातृदिनाच्या शुभेच्छा!
  14. कोठेही न मागता मिळालेले भरभरुन दान म्हणजे ‘आई’. विधात्याच्या कृपेचे निर्भेळ वरदान म्हणजे ‘आई’
  15. ‘आई’ या शब्दात फक्त दोन अक्षरे आहेत.  पण या शब्दात नभाइतके सामर्थ्य आहे.

  वाचा - वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)

  आईसाठी खास चारोळ्या (Short Quotes On Mother In Marathi)

  1.  मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’ मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे ‘आई’
  2. एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी.. पण आईचे चरण हेच श्रेष्ठ.. माझ्यासाठी पंढरीहून भारी
  3. पूर्वजन्माची पुण्याई असावी.. जन्म जो तुझ्या गर्भात घेतला.. जग पाहिलं नव्हतं पण श्वास स्वर्गात घेतला होता. 
  4. शोधून मिळत नाही पुण्य… सेवार्थाने व्हाने धन्य…कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’
  5. आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला? जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.. जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  6. देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला..माझ्या प्रत्येक जन्मी  तिचाच गर्भ दे मजला
  7. या  जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु.. त्यानंतर माझे जीवन झाले सुरु.. मातृदिनाच्या शुभेच्छा
  8. आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही.. तिचे उपकार फेडायला सा जन्मही पुरणार नाहीत. 
  9.  पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!
  10. माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही… कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही… कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही… म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.

  आईची आठवण येतेय मग तिला पाठवा हे मेसेज (Miss You Aai Messages In Marathi)

  1. आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते...निर्दयी या जगापासून खरचं दूर जावेसे वाटते.
  2. रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो...आई तुझा आवाज मला तुझी खुसाली सांगत असतो.
  3. कातर होऊन जातो स्वर.. दबून जातो हुंकार...भेटीला जीव तळमळतो.. जेव्हा येतो तिचा आवाज
  4. आकाशाचा जरी केला कागद… अन् समुद्राची केली शाई… तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही
  5. आईच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे.. तिने दिलेले हृदयरुपी फूल सुकले तरी सुंगध त्याचा सुकणार नाही रे… आई तुझी खूप आठवण येते..
  6. मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.. ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
  7. काय करु आई आज तुझी खूप आठवण येते… मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते.
  8. कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई तर मला माफ कर.. पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे. तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाहीए
  9. आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली.. का ग तू मला लवकर सोडून गेलीस.. मातृदिनाच्या शुभेच्छा!
  10. रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती.. आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी  नसण्याची किंमत कळली आई...मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  मग या मातृदिनाला तुमच्या आयुष्यातील या मातृतुल्य व्यक्तींना पाठवा हे शुभेच्छा संदेश. आणि आईचा हा खास दिवस करा खास पद्धतीने साजरा.

  देखील वाचा - 

  आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश (Shradhanjali Message In Marathi For Mother)