या अभिनेत्रींनी प्रेग्नंट असूनही घेतला नव्हता अभिनयातून ब्रेक

या अभिनेत्रींनी प्रेग्नंट असूनही घेतला नव्हता अभिनयातून ब्रेक

कोणत्याही व्यक्तीला जर त्याच्या कामात यशस्वी व्हायचं असेल तर पूर्ण झोकून देऊन काम करणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीही आपल्या करियरमध्ये पुढे जाताना आपल्या कामासोबत पूर्ण न्याय करत असते. बॉलीवूडच्या बाबतीचं बोलायचं झाल्यास इथले कलाकारही वरील गोष्टींना अपवाद नाहीत.

आपण जो सिनेमा बघतो त्यामागे खूप मोठ्या टीमची कठोर मेहनत असते. दिवसरात्र मेहनत घेतल्यानंतर एक सिनेमा बनतो आणि मग तो रिलीज होतो. पण अनेकदा या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्यासमोर आपल्या सेलेब्सच्या काही अशा गोष्टीही येतात. ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. हो...आज आम्ही अशा काही अभिनेत्रींबाबत सांगणार आहे. ज्या सिनेमाच्या शूटींगदरम्यान प्रेग्नंट होत्या पण कोणाला कळलंच नाही. हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्यही वाटेल. वाचा कोण होत्या या अभिनेत्री ज्या शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होत्या.

जया बच्चन

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की. 1975 साली आलेल्या सुपरहिट चित्रपट शोलेच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री जया बच्चन या गर्भवती होत्या. जया आपल्या पांढऱ्या साडीमागे बेबी बंप लपवत असत आणि जया फिल्म रिलीज होईपर्यंत प्रेग्नंट होत्या.

श्रीदेवी

बॉलीवूडची चांदणी श्रीदेवी जी अचानक निखळली. असं म्हटलं जातं की, 1997 साली आलेल्या जुदाई या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्रेग्नंट झाली होती. हा चित्रपट श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी प्रोड्यूस केला होता. असंही म्हटलं जातं की, यातील उर्मिलाचा भूमिकेवरून श्रीदेवीने आपल्या मुलीचं नाव जान्हवी ठेवलं होतं.

काजोल

हो.. या लिस्टमध्ये काजोलचं नावंही सामील आहे. 2010 साली आलेल्या वी आर फॅमिली या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान काजोल प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंट असूनही काजोलने तिचं शूटींग पूर्ण केलं. या चित्रपटात काजोलने तीन मुलांच्या आईची भूमिका केली होती.

जूही चावला

2001 साली आलेल्या आमदनी अठन्नी खर्चा रूपय्या या चित्रपटादरम्यान जूही पहिल्यांदा प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंट असूनही तिने शूटींग पूर्ण केलं. यानंतर जेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा तिने झंकार बीट्स या सिनेमाच शूटींगही केलं होतं.

ऐश्वर्या राय बच्चन

तुम्हाला 2012 साली आलेला हिरोईन हा चित्रपट तर आठवत असेलच. ज्यामध्ये करिना कपूरने मुख्य भूमिका केली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्याला घेण्याबाबत चर्चा सुरू होती. पण चित्रपटाच्या निर्मात्यांना ऐश्वर्याच्या प्रेग्नंसीबाबत कळताच त्यांनी ऐश्वर्याला रिप्लेस करून करिनाला फायनल केलं.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.