ट्रक ड्रायव्हर्समध्ये आजही प्रसिद्ध आहेत ही अजय देवगणची गाणी

ट्रक ड्रायव्हर्समध्ये आजही प्रसिद्ध आहेत ही अजय देवगणची गाणी

'सिंघम' अजय देवगण हा अगदी पहिल्या सिनेमा फूल और कांटे पासून चर्चेत आहे. कारण हिरो म्हणून त्याची एंट्री होतीच तशी भारी. आठवतेय ना दोन बाईकवर उभा राहून येणाऱ्या अजयची एंट्री. आपल्याला जरी त्याच्या काहीच चित्रपटातली गाणी लक्षात असली तरी एक वर्ग असा आहे. ज्यांच्या सोबतीला आजही कित्येक वर्ष झाली तरी अजयच्या चित्रपटातली गाणी असतात. हो...अनेक ट्रक ड्रायव्हर्स जे रात्री मैलोनमैल प्रवास करतात. त्यांच्या मनोरंजनाचा अविभाज्य भाग आहेत.

Instagram

प्यार के कागज पे...

अजय देवगणच्या जिगर या 1992 साली आलेल्या चित्रपटातलं हे लव्ह साँग ट्रक ड्रायव्हर्सच्या फेव्हरिट लिस्टमध्ये सर्वात आधी आहे. या चित्रपटात अजयसोबत होती लोलो म्हणजेच करिना कपूर.

प्यार के लिए चार पल कम नहीं थे

रात्रीच्या प्रवासादरम्यान गतकाळातील प्रेम आठवणं साहजिक आहे. अशा वेळी तंतोतंत लागू होणार काजोल आणि अजयच्या जोडीचं हे गाणं. दिल क्या करे चित्रपटातलं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.

मैंने प्यार तुम्ही से किया है

फूल और कांटेमधून बॉलीवूडमध्ये धमाकेदार एंट्री करणाऱ्या अजयच्या या चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली होती. तेव्हा तर केबलच्या काळात हा चित्रपट वारंवार टीव्हीवर दाखवला जात असे.

धीर धीरे प्यार को बढाना है

फूल और कांटेमधलंच हे दुसरं गाणं. लव्हस्टोरीनंतर लग्नापर्यंत गेलेल्या प्रेमावर फुलणाऱ्या कळीचं हे गाणं आहे.

अजनबी मुझको इतना बता

1998 साली आलेल्या प्यार तो होना ही था चित्रपटातलं हे गाणं आजही अनेकांचं फेव्हरेट आहे. अजय आणि काजोलच्या जोडीचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

जीता था जिसके लिए

प्रत्येक देवदास असणाऱ्याचं हे आवडतं गाणं आहे. 1994 साली आलेल्या 'दिलवाले' चित्रपटातलं हे गाणं आहे.

मौका मिलेगा तो हम बता देंगे

दिलवाले चित्रपटातलंच हे दुसरं गाणं. यामध्ये झळकली होती रवीना टंडन आणि अजय देवगणची जोडी.

जान ओ मेरी जान

ट्विंकल खन्ना आणि अजय देवगण यांचा आलेला हा सिनेमा जरी त्या काळी चालला नसला तरी हे गाणं मात्र आजही आवर्जून ऐकलं जातं. 1996 साली आलेल्या जान चित्रपटातलं हे गाणं आहे.

आईए आपका इंतजार था

एकेकाळी चर्चा होती की, अजय देवगण आणि तब्बूचं लग्न होणार. पण नंतर अजयच्या आयुष्यात आली काजल आणि तब्बू मात्र आजही अविवाहीत आहे. असो त्यांच्या जोडीचा विजयपथ चित्रटातलं हे गाणं.

कितना हसीन चेहरा

अजय-रवीनाच्या दिलवाले चित्रपटातलं गाजलेलं अजून एक गाणं हे आहे.

मग तुम्ही कधी ट्रकमधून प्रवास केलात तरी तुम्हाला ही गाणी नक्कीच ऐकायला मिळतील. कसा वाटला हा लेख आम्हाला जरूर कळवा.