हाताच्या रेषा सांगतात, तुम्ही श्रीमंत होणार की नाही

हाताच्या रेषा सांगतात, तुम्ही श्रीमंत होणार की नाही

ज्योतिष शास्त्र, हस्तरेषा शास्त्र, समुद्री शास्त्र अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आपल्याकडे होत असतो. त्यामध्येच हस्तरेषेचा अभ्यास हादेखील एक असा विषय  आहे जो आपल्याला नेहमी आकर्षित करत असतो. आपल्या हाताच्या रेषांवरून आपल्याला आपले आयुष्य कळते. या रेषांच्या मदतीने आपण आपल्या आर्थिक स्थितीचाही अंदाज लावू शकतो. हस्तरेखा शास्त्रामध्ये हातावरील अशा काही रेषा आहेत ज्यांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. अशा रेषा तुमच्या हातावर योग्य प्रकारे अस्तित्वात असतील तर तुम्ही नक्कीच पैशाच्या बाबतीत भाग्यवान असता. आपल्या हातावर असणाऱ्या रेषा आपल्यासाठी किती भाग्यवान असतात आणि तुम्ही श्रीमंत होणार की नाही याची माहितीही देऊ शकतात. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती. 

धनरेषा जर येत असेल शनि पर्वतावरून खाली तर

Shutterstock

तुमच्या हातावर मध्यभागी शनि पर्वताचे एक चिन्ह असते. या शनि पर्वातावरून जर एखादी रेषा सरळ खाली येत असेल तर ती तुमची धनरेषा तुमच्या भाग्यावरून जात असून तुम्ही अतिशय भाग्यवान असल्याचे दर्शवते. हस्तरेषेच्या अभ्यासानुार अशा स्थितीमध्ये रेषा दिसणं म्हणजे तुम्ही पैशाच्या बाबतीत खूपच भाग्यावान असता. आपल्या पूर्वजांनी केलेल्या  चांगल्या कामामुळे तुम्ही भविष्यात धनलाभ मिळवू शकता. तसंच मेहनत न करताही अशा व्यक्तींना श्रीमंती मिळते. 

जर तुमच्या हातावर होत असेल त्रिकोण

तुमच्या हातावर भाग्य रेषा आणि हृदय रेषेच्या मदतीने जर एखादा त्रिकोण तयार झालेला दिसून येत असेल तर तुम्हाला धनलाभ असण्याचा हा संकेत आहे. याचा अर्थ तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमधून पैसे कमावणार आहात. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातून धनलाभ होण्याची शक्यता असते. 

हातांच्या रेषा सांगतील कसं असेल तुमचं वैवाहिक जीवन, जाणून घ्या

अंगठ्याजवळ जर असेल वक्राकार रेषा

Shutterstock

तुमच्या हाताच्या अंगठ्याजवळ जर तुमच्या तर्जनीजवळ वक्राकार रेषा दिसत असेल तर ती व्यक्ती अतिशय समजूतदार आणि बुद्धिमान असते.  अशी व्यक्ती आपल्या नेतृत्व आणि आपल्या मेहनतीने आपल्या आयुष्यात पैसे मिळवते. अशा व्यक्तींना कोणाचाही पाठिंबा लागत नाही तर स्वतःच्या हुशारीने या व्यक्ती श्रीमंत होतात. पैसा कमावतात. 

श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत

अंगठा आणि करंगळी जोडणारी रेषा

तुमच्या  हातावर अशी रेष असेल ती अंगठ्यापासून सुरू होते आणि त्याचा शेवट सर्वात लहान बोट अर्थात करंगळीजवळ होतो तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पैशाचा लाभ मिळतो. आपली पूर्वपरंपरागत  असलेली संपत्ती तुम्हाला मिळते आणि त्याशिवाय तुम्हाला लग्न झाल्यानंतरही पैशाचा लाभ मिळतो. 

भाग्यरेषेला फुटले असतील दोन फाटे

तुमच्या हातावरील भाग्य रेषेला जर दोन फाटे फुटले असतील आणि जर ते फाटे शनि पर्वतापर्यंत पोहचत असतील तर तुम्ही आर्थिक बाबींमध्ये भाग्यवान समजले जाता. तुम्हाला आर्थिक अडचणी न येता नेहमी आर्थिक लाभ होत राहातो. त्याशिवाय तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्येही प्रसिद्ध होता. 

हाताच्या रेषा दर्शवतात तुमचं करिअर

अंगठ्यापासून रेषा जात असेल शनि पर्वतापर्यंत

जर तुमच्या अंगठ्याच्या खालच्या भागापासून रेषा सुरू होऊ शनि पर्वतापर्यंत रेष पोहचत असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करू शकता. त्याबद्दल तुम्ही विचार करण्याची गरज आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या मते अशी रेषा हातावर असणाऱ्या व्यक्ती  या व्यापार क्षेत्रामध्ये खूपच प्रगती करतात. तसंच ही रेषा धनरेषा म्हणूनही कार्य करते. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा