आपल्या किचनमध्ये इतके वेगवेगळे जिन्नस असतात. ज्यांचा उपयोग फक्त जेवणासाठी होत नाही तर तुम्हाला त्याचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही करता येतो. बेसन,तांदूळ पीठ, कोथिंबीर, कडीपत्ता,बटाटा या सगळ्याचा उपयोग आपल्याला सौंदर्यासाठी करता येतो. आता फळांच्या बाबतीत सांगायचे झाले तर फळांच्या गराचा उपयोगही त्वचेसाठी केले जातो. फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन C तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. केळं हे असं फळं आहे जे तुम्हाला 12 महिने उपलब्ध असते. केळ्यामध्ये पोटॅशिअम,मॉईश्चर आणि व्हिटॅमिन A असते. केळं तुमच्या त्वचेला मॉश्चराईज करण्याचे काम करते. या शिवाय तुमच्या त्वचेच्या अन्य समस्याही दूर करते. म्हणूनच आज आपण केळ्यापासून तयार होणारे फेसपॅक पाहणार आहोत. ज्याचा उपयोग करुन तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवू शकता. मग जाणून घेऊया त्वचेसाठी फायदेशीर असे हे फेसपॅक
सौंदर्यवर्धक केळ्याचे त्वचेसाठी भरपूर फायदे आहेत. जर तुम्हाला घरीच राहून केळ्याचा उपयोग करुन फेसपॅक बनवायचे असतील तर तुम्ही हे काही सोपे फेसपॅक बनवू शकता.
केळ्याचा उपयोग त्वचेवरील डाग काढण्यासाठी होतो. तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी झाले की, तुमची त्वचा उजळते.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करुन घ्या. त्यावर फेस पॅक लावा. साधारण 15 मिनिट हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर असू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
फेसपॅकचे फायदे :
लिंबू हे लाईटनिंग एजंट आहे. शिवाय केळ्यामध्ये मॉश्चरायझर असल्यामुळे तुमची त्वचा फेसपॅक लावल्यानंतर छान दिसते. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करा पुरेसे आहे.
तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स खूप असतील. तर तुमच्यासाठी हा बनाना फेस पॅक उत्तम आहे.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
तयार फेसपॅक चेहऱ्याला लावा. साधारण 20 मिनिटं हा पॅक चेहऱ्यावर ठेवा. मस्त थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. साधारण काही दिवस हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा.
फेसपॅकचे फायदे:
कडुनिंबाच्या वापरामुळे तुमच्या ओपन पोअर्समध्ये साचलेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळते. हळदं अँटीसेप्टीक असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जखमा भरुन काढते. त्यामुळे पिंपल्स सुकण्यास मदत मिळते.
चिरतरुण त्वचा हवी असेल तर तुमच्यासाठी केळं वरदान आहे. कारण केळ्यामधील घटक तुमच्या त्वचेची इलास्टिसिटी वाढवून तिचा पोत सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुमची त्वचा तुम्हाला सैल वाटत असेल तर तुम्ही हा फेसपॅक ट्राय करायला हवा
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्या. तयार फेसपॅक चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिटं हा पॅक चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
फेसपॅकचे फायदे:
दही आणि संत्र्याचा रस तुमच्या चेहऱ्यावर तजेला आणण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात.
जर तुमच्या त्वचेवर सुरुकुत्या असण्याची भीती असेल तर तुम्ही रिंकल रिमुव्हिंग बनाना फेसपॅक नक्कीच वापरायला हवे.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
हा पॅक फारच स्मुथ असतो. त्यामुळे हा लावणे फार सोपे आहे. कोरड्या चेहऱ्यावर तुम्ही हा पॅक लावा. 15 मिनिटं तरी ठेवा. हा पॅक लावल्यानंतर छान आराम करा. चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
फेसपॅकचे फायदे:
मध तुमची त्वचा नितळ करते. या शिवाय तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करते.
प्रदूषण, थकवा या सगळ्यामुळे तुमची त्वचा डल दिसू लागते. तुमच्या त्वचेवरील सगळे तेज निघून गेल्यामुळे तुमच्या त्वचेवर तजेला आणण्याचे काम हे नरिश्मेंट बनाना फेस पॅक करते.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
चेहरा स्वच्छ करुन तयार मास्क तुमच्या चेहऱ्याला लावा. व्यस्थित वाळल्यानंतर एक टर्कीश टॉवेल घेऊन तो गरम पाण्यात बुडवा. हा टॉवेल तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. आता फेसपॅक पुन्हा थोडा ओला होईल. आता तो पॅक पाण्याचे घुवून काढा
फेसपॅकचे फायदे:
मध, संत्री तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले घटक पुरवण्याचे काम करते. त्यामुळे तुमची त्वचा तजेलदार दिसू लागते.
आता तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्यासाठी तुम्ही केळयाचा उपयोग करुन हा फेसपॅक तयार करा तुम्हाला नक्की फायदा होईल.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार मास्क चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिटं हा मास्क चेहऱ्यावर ठेवून द्या. साधारण 15 मिनिटांनी तुम्ही तुमचा चेहरा कोमट पाण्याचे धुवून घ्या.
फेसपॅकचे फायदे:
कोरड्या त्वचेला आवश्यर असलेले मॉश्चरायझर पुरवण्याचे काम हा फेसपॅक करतो. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही हा फेसपॅक वापरायला हवा.
अनेकदा आपल्याला काही क्विक पार्टीसाठी तयार व्हायचं असत अशावेळी तुम्ही हा स्किन ग्लोईंग बनाना फेसपॅक तयार करु शकता.
असा तयार करा फेसपॅक:
अर्ध केळं कुस्करुन त्यात एक मोठा चमचा दही घाला. तुमचा फेसपॅक तयार.
फेसपॅक लावण्याची पद्धत:
तयार फेकपॅक स्वच्छ चेहऱ्यावर लावून साधारण 5 मिनिटं ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
फेसपॅकचे फायदे:
दही तुमच्या त्वचेला अगदी पटकन तजेला आणण्याचे काम करते. यात असलेले घटक तुमची त्वचा स्वच्छ करते. शिवाय त्वचा चमकदारही करते.
जर तुमच्या चेहऱ्यावर मोठे मोठे पोअर्स असतील तर तुमचे पोअर्स स्वच्छ राहणेही फार गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही हा फेसपॅक वापरायला हवा.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
चेहरा पाण्याने स्वच्छ करुन घ्या. तयार पॅक हा एक प्रकारे स्क्रबसारखा आहे. फेसपॅक लावल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर तो चांगला चोळा. स्क्रब करा. फेसपॅक तसाच साधारण 15 मिनिटांसाठी ठेवा.
फेसपॅकचे फायदे:
ओट्स तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये जाऊन तुमचे पोअर्स स्वच्छ करण्याचे काम करते. तसेच तुमच्या पोअर्सचा आकारही कमी करते.
केळ्याचा हा फेसपॅक बनवणे फारच सोपे आहे. तुमच्या रोजच्या वापरासाठी तुम्ही हा फेसपॅक बनवू शकता.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
चेहरा स्वच्छ करुन तुम्हाला हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे. यामध्ये विशेष काही मेहनत घेण्याची गरज नाही.
फेसपॅकचे फायदे:
केळ्याचे सगळे फायदे तुम्हाला या फेसपॅकच्या माध्यमातून होतात. त्यामुळे तुमची त्वचा अधिक स्वच्छ दिसते.
तुम्हाला केळ्याचा उपयोग करुन जर फेशियल करायचे असेल आणि त्यासाठी तुम्ही डीप क्लिनझिंग फेसपॅक शोधत असाल तर तुमच्यासाठी हा फेसपॅक एकदम परपेक्ट आहे.
असा तयार करा फेसपॅक:
फेसपॅक लावण्याची पद्धत:
तयार फेस पॅक हा स्क्रब आहे. त्यामुळे चेहरा स्वच्छ करुन तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावून अगदी हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या.
फेसपॅकचे फायदे:
हा पॅक तुमच्या त्वचेच्या आत पर्यंत जाऊन तुमची त्वचा स्वच्छ करतो. त्यामुळे तुमची त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसते.
केळ्यापासून वेगवेगळे फेसपॅक बनवण्याचा तुम्ही निर्णय घेतला असेल तर तुम्हाला केळ्याचे तुमच्या त्वचेसाठी असलेले फायदेही माहीत हवे. जाणून घेऊया केळ्याच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला नेमके काय फायदे होतात ते
अनेकांच्या डोळ्याखाली झोपेतून उठल्यानंतर सूज येते. तुमच्या त्वचेला अशी सूज आली की, तुमची त्वचा अजिबात प्रसन्न दिसत नाही. केळ्याच्या वापरामुळे तुमच्या डोळ्यांखाली आलेली सूज कमी होते. तुमच्या डोळ्यांखाली आलेला काळेपणाही दूर होतो. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास असेल तर तुम्ही याचा वापर करायला हवा.
तुमची त्वचा कोरडी असेल किंवा तेलकट असूनही शुष्क असेल तर तुम्ही केळ्याचा वापर त्वचेसाठी करायला हवा. कारण केळ्याच्या फेसपॅकमुळे तुमची त्वचा छान फ्रेशन दिसते. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला तजेला तुम्हाला केळ्याच्या फेसपॅकमुळे मिळतो. त्वचेला अगदी कोणत्याही सीझनमध्ये मॉश्चराईज करायचे काम केळ्यामधील आवश्यक घटक करते.
जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर त्यावरही केळं अत्यंत उत्तम काम करते. तुमचे पोअर्स स्वच्छ करुन पिंपल्स तयार करणारे घटक तुमच्या त्वचेतून काढून टाकते. तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही केळ्याचा फेसपॅक करुन चेहऱ्याला लावा तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. तुम्ही एक दिवस आड जर केळं त्वचेला लावलं तर तुम्हाला हा फरक नक्की जाणवेल.
केळ्याचा आणखी एक फायदा असा की, केळं तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते. जर पिंपल्स किंवा अन्य काही कारणामुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग राहिले असतील तर तुम्ही त्वचेसाठी केळ्यता उपयोग करायला हवा. साधारण दोन ते तीन आठवडे सलग वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी झालेले दिसतील.
वार्धक्याच्या खूणा म्हणजे तुमच्या कपाळावरील सुरकुत्या, ओठांच्या आजुबाजूला असलेल्या सुरकुत्यांना कमी करण्याचे काम केळं करते. केळं हे अंँटी एजिंग असून केळ्याच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या तमी होतात.
1. केळ्यामुळे तुमची त्वचा उजळते का?
केळ्यामधील घटक तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करतात. त्यामुळे तुमची त्वचा आपोआपच उजळते. त्यामुळे स्किन वाईटनिंग हा एकमेव फायदा तुम्हाला केळ्याचा उपयोग करुन होत नाही. तर तुमची त्वचा चांगली दिसू लागते. त्यामुळे तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही याचा उपयोग करु शकता.
2. त्वचेसाठी केळ्याचा उपयोग करु शकतो का?
केळ्याचा उपयोग रोज करायला काहीच हरकत नाही. कारण त्याचा दुष्परिणाम होत नाही. पण जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर तुम्ही याचा खूप वापर करु नका. कारण तुमच्या त्वचेला मॉईश्चर करण्याचे काम केळं करते. पण काही जणांना याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वापर करताना जपून करा.
3. केळ्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात का?
केळ्यामध्ये असलेले पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन A तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करते. मुळात केळ्याचा वापर हा चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठीच केला जातो. जर तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर तुम्ही अगदी हमखास केळ्याचा वापर तुमच्या त्वचेसाठी करायला हवा.
आता तुम्हालाही त्वचेच्या समस्या असतील तर तुम्ही आजपासूनच केळ्याचा उपयोग सुरु करा. तुम्हाला त्वचा अधिक सुंदर झालेली नक्की दिसेल.